Uk madhe भाडेकरू म्हणून रहात असताना आलेला अनुभव

Submitted by द़क्षा on 30 May, 2015 - 04:09

परदेशात (UK) भाड्याच्या घरात राहत असताना अनेक अनुभव आले . इथे घरमालक घर भाडेकरूच्या ताब्यात दिल्यावरही महिन्या दोन महिन्यातून आपले घर भाडेकरूने व्यवस्थित मेंटेन केले आहे का पाहण्यासाठी फेरी मारत असतात. घर स्वछ नीटनेटके ठेवावे लागते. तसे आपण आपले घर स्वच्छ नीटनेटके ठेवण्याचा रोजच प्रयत्न करतो. परंतु येथे खरतर चकचकीत हा योग्य शब्द आहे. भिंतीला / कार्पेटला एकही डाग असता कामा नये. खिडक्याही पुसून लक्ख केलेल्या हव्यात. Toilet Bathroom ही ब्लीच टाकून नव्यासारखी वाटतील इतकी चकचकीत करावी लागतात. त्या दिवशी असे झाल की पाणी गरम होण्याचा Boiler बिघडला. त्यामुळे गरम पाण्या अभावी आमची महत्वाची अशी काही कामे खोळंबली  इकडच्या थंडीत गरम पाणी नाही म्हणजे कठीणच. आम्ही मालकाला फोन केला व Boiler चालत नाही इतकेच सांगितले. Working Day असूनही दुसर्या दिवशी मालक Boiler सोबत मिळालेले माहिती पुस्तक घेऊन हजर झाला आणि त्याने Boiler दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु Boiler काही सुरु होईना. तो उद्या माहिती पुस्तकातून होम वर्क करून येउन Boiler सुरु करण्याचे आश्वासन देऊन गेला. दुसरया  दिवशी सकाळीच हजर झाला आणि परत एक तास भर दुरुस्तीचे काम करत होता. मधून मधून पुस्तकाचीहि मदत घेत होता. नंतर म्हणाला याचा एक part गेला आहे, मी उद्या आणून लावूrन देतो. आज इथे जवळपास पार्ट मिळणे शक्य होणार नाही. आम्ही न राहवून शेवटी त्याला म्हणालोच की Boiler  बंद असल्याने आमची सगळी कामे खोळंबली आहेत. आंघोळी, भांडी सर्वच. त्यावर तो म्हणाला "मी तुम्हाला एक इलेक्ट्रिक किटली आणून देतो तात्पुरती, don't worry" आम्ही पण ओके म्हणालो आणि तो निघून गेल्यावर काही कामानिमित्त बाहेर पडलो. रात्री आल्यावर पाहतो तो काय तो मालक किचनच्या ओट्यावर एक मोठी इलेक्ट्रिक किटली ठेवून गेला होता. त्याच्याकडे जी स्पेअर चावी असेल त्याने दार उघडून त्याने ही किटली ठेवली असणार हे आमच्या लगेच लक्षात आले. आमची मोठी अडचण दूर केली होती त्याने. त्यानंतर दुसर्यादिवशी त्याने तो पार्ट बसवून अर्ध्या तासात Boiler सुरू करून दिला. घडलेल्या घटनेवरून माझ्या मनात विचार आला आपले भारतात एखादे घर भाड्याने दिलेले असेल तर आपण खरोखरच इतकी देखरेख करतो का आपल्या घराची? की agreement झाले आणि भाडे मिळतय ना नेमाने म्हणून निश्चिंत असतो? त्याबरोबर भाडेकरुलाही इतकी आपुलकीची treatment मिळते का आपल्याकडे की "एक दोन दिवसात होईल सुरु जरा कळ काढा की " असा कलच अधिक दिसून येतो घरमालकाचा ? आपल्याकडे कधी मालक भाडेकरू एकमेकांना इतके सहकार्य करणार?

( ता. क. यात  दोन देशांची तुलना करून स्वदेशाला कमी लेखणे असा कोणताही उद्देश नाही हे कृपया लक्षात घेणे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>( ता. क. यात दोन देशांची तुलना करून स्वदेशाला कमी लेखणे असा कोणताही उद्देश नाही हे कृपया लक्षात घेणे)<<<

का बरे? मी तर म्हणेन जेथील जे स्तुत्य आहे त्याची प्रामाणिकपणे स्तुती करायला काय हरकत आहे? कदाचित स्वच्छतेचा आढावा तो मालक ह्यासाठीही घेत असेल की त्याचे स्वतःचे घर स्वच्छ राहावे असे त्याला वाटत असेल. पण किटली ठेवून जाणे हे नक्कीच व्यावसायिकतेचे व 'कस्टमर डिलाईटचे' उदाहरण मानावे लागेल.

केनयामधे दोन महिन्याचे भाडे डिपॉझिट म्हणून घेतात आणि घर सोडताना, दुरुस्तीचा जो खर्च होईल तो त्यातून वजा करतात. मधे असे बघत नाहीत.

घरमालक घरात नसताना, आपल्याकडच्या चावीने घरात गेल्यास मला वाटतं भारतात हा ट्रेसपासिंगचा गुन्हा होईल.

खुप वर्षांपुर्वी आम्ही पिंपरीत भाड्याच्या घरात रहाण्यास गेलो तेव्हा घरमालकाने आवर्जून दारात उभे राहून दोन महिन्यांचे भाडे आगाऊ घेतले, खुपशा सुचना दिल्या, घर स्वच्छ ठेवा म्हणाला नि निघुन गेला. आम्ही आत शिरताच दारामागे प्रचंड झुरळे पाहिली आणि घर बघून न घेतल्याचा प्रचंड पश्चात्ताप झाला. एक महिना कसेबसे राहून पैसे परत घेऊन घर सोडले.

दक्षा, खुप छान आहे हा अनुभव. घरमालक घराची काळजी घेतो आणि भाडेकरुही काळजीने घराचे जतन करतो हे पाहुन डोळे पाणावले अगदी. Happy

सगळीकडचे घरमालक घराची काळजी घेत असतील कारण घर त्यांचे आहे. पण आपण ज्या घरात राहतोय त्याची आपलेच घर आहे असे समजुन काळजी घेणारे भाडेकरु सगळीकडे असतील का?

पण आपण ज्या घरात राहतोय त्याची आपलेच घर आहे असे समजुन काळजी घेणारे भाडेकरु सगळीकडे असतील का?>>

या प्रश्नाचे उत्तर दक्षांनी द्यावे भारतात पण त्यांनी भाड्याचे घर असे चकचकित ठेवले असते का?

चांगला अनुभव आहे Happy

पण हा अनुभव तिथे प्रत्येक (वा बहुतांश) घरमालकांबाबत येतो का?

भारतातही कितीतरी माणुसकीचे सहृदयतेचे अनुभव आपल्याला येतातच की.. किंबहुना तेथील पेक्षा जास्तच येत असावेत.. फरक असलाच तर प्रोफेशनलिझमचा.. आणि तो आहेच.. अर्थात, आपल्याकडे त्याचा अभाव आहे असे नाही, पण तसा अनुभव घेण्यासाठी चोख पैसे मोजावे लागतात, स्वस्तात मिळत नाही Happy

दक्षा,

त्या घरमालकाने खरंतर तुम्हाला झुलवत ठेवलंय. हिवाळ्यात दोन दिवस गरम पाणी नाही तर तुम्ही ट्रेडिंग स्टँडर्ड्सकडे तक्रार नोंदवायला हवी होती. त्याने किटली ठेवली हे सभ्यतेला धरूनच आहे. घरमालक साधारणत: बॉयलरचा विमा घेतातच. त्याने तो न घेता त्यावर पैसे वाचवले आणि तुम्हाला मात्र फुकट दोनतीन दिवस त्रास सहन करायला लागला.

आ.न.,
-गा.पै.

हे मात्र खरंच माझ्या मनात आले होते बरं का? Happy

बॉयलर बंद आहे तर त्याबद्दल काही नुकसान भरपाई वगैरे नको का, असे! अर्थात, प्रतिसाद लिहिताना ते विसरून गेलो.

Happy

गा. पै. शी सहमत!
युस मधे हिटिंग्,कुलिंग, बॉयलर, कुकिंग रेंज, फ्रीज हे लगेच दुरुस्त करणे किंवा त्या जागी दुसरे उपकरण बसवणे अपेक्षित असते.
माझा अनुभव फ्रीज फोन केल्यावर १ तासात दुसरा, बिघडलेला एसी ४ तासात दुरुस्त, फर्नेस क्रिसमस इवला ४ तासात दुरुस्त(रात्री १२ ला फोन केला पहाटे ३:३० ला येवून दुरुस्ती) कुकिंग रेंज्/ओवन १ तासात रिप्लेस तेही असेच क्रिसमसच्या दोन दिवस आधी, बॉयलर बदलून ५ तासात.
घर ताब्यात घेताना मुव इन इस्पेक्शन करुन घ्यायचे आणि तशीच पद्धत मुव आउट करताना. काही खराब झाले असेल त्याचे सविस्तर बील देवून पैसे डिपॉझिट मधून वळते + उरलेले तुमच्याकडून वसूल. अधे-मधे फक्त फायर एक्टिंग्विशर आणि अलार्म चेक करायला आधी सुचना देवून.

भारतात भाड्याने राहिलो तेव्हा भाड्याच्या घराची, आवाराची काळजी अगदी स्वतःच्या घरासारखी घेतली. यात पावसाळा संपला की नियमीत अंगण सारवणे , बागेची नीगा वगैरे व्हायचे. घरमालकही दुरुस्ती तत्परतेने करायचे. पावसाळा संपला की बेणायला माणूस यायचा. कौलारु घर असल्याने पावसाळ्याआधी पहाणी डागडुजी व्हायचे. गरज पडल्यास असावी म्हणून एक्स्ट्रा कौले वगैरे देवून ठेवायचे.

गा पै +१
तुमच्या घरमालकाने खरतर तुम्हाला गंडवले आहे Sad एव्हढ़या कडाक्याच्या थंडीत बुकं वाचून water heater रिपेयर करण्याचे काम तो आपल्या घरी करेल का? की त्वरीत रिपेयर करून घेईल? तसेच इ केटल मुळे वाढलेल्या इलेक्ट्रिसिटी बिलाचे काय? ते कोण भरणार???

त्याने स्वतः रिपेअर करायचा प्रयत्न केला पैसे वाचवाय साठी. त्यात काही वाईट नाहीए. पण काही तासा नंतर त्याने तो उतर्वायला हवा होता अन नवा लावायला होता.
भारतात माझ्या घरमाल काने नवा पंखा लगेच बसवला होता.

दक्षा ,customer satisfaction हि गोष्ट बऱ्यापैकी 'western countries' मध्ये follow केले जाते.
पण , unfortunately भारतात एवढे महत्त्व दिले जात नाही म्हणून भारताबाहेर ह्या गोष्टी लगेच जाणवतात .

तुमचा अनुभव चांगला आहे घर मालका संदर्भात!

भारतात आम्ही राहतो एका गावात आणि घर दुसर्या गावात, त्यामुळे दोन्ही बाजू बघितल्या आहेत… घर भाड्याने देण्या आणि घेण्याचा दोन्हीचा बरा-वाईट अनुभव आहे...

भाड्याने घेताना बाजूलाच राहणारे आणि आमच्या झाडाखाली पडलेला पेरू तुमच्या मुलाने का उचलला म्हणून भांडणारे सुद्धा घर मालक बघितले आहेत आणि वर्षातून एकदा केवळ अग्रीमेंट रिन्यू करायला येणारे आणि घरात उत्तम सोयी करून देणारे पण बघितले आहेत…

आणि देतानाही, घर एकदम चकाचक ठेवणारे, घर अस्वच्छ ठेवणारे, घरात अनंत खिळे ठोकून भिंती खिळखिळ्या करणारे, घर सोडून जाताना अगदी ट्यूब-पंखे काढून नेणारे, भाडं वेळेवर देणारे, न देणारे असे सगळे एकमेकांशी पर्म्युटेशन-कॉम्बिनेशन करून पहा… हे सगळे अनुभव गाठीशी आहेत…

मला वाटतं हा माणसा-माणसातला फरक आहे…. सगळ्या प्रकारची माणसं आहेत… निदान भारतात तरी जनरलायझेशन करू शकत नाही

दक्षा यु. के. मध्ये घर स्वच्छ आणि नीटनेटके (अगदि स्वतःचे घर असल्याप्रमाणे) ठेवणे ही भाडेकरूची जबाबदारी असते. त्याचप्रमाणे घराच्या नियमित देखभालीचा (दुरुस्त्या वैगेरे) खर्च मालकाने करायचा असतो. भाडेकरूच्या चुकीमुळे काही तोडफोड झाल्यास मात्र त्या दुरुस्तीचा खर्च भाडेकरूने करायचा असतो. इथे सगळीकडे हा नियम पाळला जातो.

हिवाळ्यात दोन दिवस गरम पाणी नाही तर तुम्ही ट्रेडिंग स्टँडर्ड्सकडे तक्रार नोंदवायला हवी होती. त्याने किटली ठेवली हे सभ्यतेला धरूनच आहे. >>>> ज्याप्रमाणे मालकाने आपुलकीने वागावे असे आपणास वाटत असेल तर तिच आपुलकी भाडेकरूने दाखवायला नको का? प्रत्येक बाबतीत असे नियमावर बोट ठेवून कसे चालेल?? जर मालक सभ्यता दाखवित असेल तर आपणही थोडा संयम ठेवायला नको का? बॉयलर दुरुस्त करण्यामागे काय कारण असेल ते जाणून घ्यावयास नको का? कदाचित बॉयलर नविन असेल म्हणून रिप्लेस केला नसेल. बॉयलर स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला असेल कारण आयत्या वेळेस त्याला माणूस मिळाला नसेल. बॉयलर रिप्लेस करण्याकरितासुद्धा साधारण दुरुस्त करण्याइतकाच वेळ लागणार. तेव्हा थोडा बेनिफिट ऑफ डाउट दिलात तर कायदेशीर कटकटी टळतील......नाही का?? अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

मी यु.के. मध्ये एकाच गेली सात वर्षे घरात भाड्याने रहात आहे. मालक अतिशय चांगला आहे त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा अशा दुरुस्त्यांच्या बाबतीत संयम पाळलेला आहे. दोन्हीकडून समजूतदारपणा असेल तर घरातील आपले वास्तव्य सुखाचे होते असा माझा आजवरचा अनुभव आहे!!

सुमुक्ता,

>> ज्याप्रमाणे मालकाने आपुलकीने वागावे असे आपणास वाटत असेल तर तिच आपुलकी भाडेकरूने दाखवायला नको
>> का? प्रत्येक बाबतीत असे नियमावर बोट ठेवून कसे चालेल??

मालकाने बंबाचा (बॉयलर) आपत्कालीन विमा उतरवला नव्हता. हे नीतिमत्तेत बसतं का? उत्तर, हो आणि नाही दोन्ही आहेत. ब्रिटीश गॅसकडून विमा उतरवला असेल तर २४ तासांत बंब दुरुस्त व चालू करून मिळतो. विमाहप्त्याचा खर्च घरमालकास करायचा नसेल तर त्याचा त्रास भाडेकरूने का भोगायचा? ऐन हिवाळ्यात बंब बंद पडणे म्हणजे काय ते तुम्हाला सांगायला नकोच. झालेल्या त्रासाबद्दल भरपाई मिळाली असेल तर गोष्ट वेगळी.

माझा बंबही असाच हिवाळ्यात बंद पडला होता (फर्मीचा नियम आठवा). तेव्हा मला घरमालकाला कळवावंही लागलं नाही. थेट ब्रिटीश गॅसला फोन लावला. त्यांचा माणूस चार तासांत आला आणि पाचव्या तासाला बंब सुरू.

आ.न.,
-गा.पै.

गामांनी डायरेक्ट बंब म्हटलयावर माझ्या डोळ्यासमोर गोवरी आणि कोळसे घेऊन बंब पेटवायचा प्रयत्न करणारा फिरंगी आला...........