कंबोडिया

कंबोडियातील एक छत

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

कंबोडियामधे जिथे बान्ते सराई आहे तिथे मी हे एक छत पाहिले आणि मला ते फार आवडले. कुठल्या तरी पानांपासून हे छत तयार केलेले आहे. ह्या छताचे एक वैशिष्ट हे की रणरणत्या उन्हात ह्या छताखाली बसलो की ह्या छताची गार गार सावली हवीहवीशी वाटते. इथे मग एसीसी गरज नाही.

ह्या छताची काही छायाचित्रे:

हा छताचा वरचा भागः

विषय: 
शब्दखुणा: 

कंबोडियन न्यू ईयर

Submitted by सुमुक्ता on 9 September, 2014 - 08:50

बरोबर एक वर्षापूर्वी नाताळ च्या सुट्टी मध्ये फिरायला कोठे जायचं हा गहन प्रश्न आम्ही सोडवत होतो. नवीन अनुभव हवा होता नवीन प्रकारचे पदार्थ खायचे होते. आणि मला कंबोडिया चे अंगकोर वॉट (जगातील सर्वात मोठे देऊळ आणि UNESCO ची World Heritage Sight) पहायची फार दिवसापासून इच्छा होती. आम्ही थायलंड, कंबोडिया आणि चीन अशी ट्रीप ठरवली. ३१ डिसेंबर आम्ही कंबोडिया ची राजधानी फ्नॉम पेन्ह इथे साजरा करणार होतो. तेव्हा माहीतच नव्हते कि ही ३१ डिसेंबर ची रात्र आमच्या मानसिकतेमध्ये फार मोठे बदल घडवून आणेल. थायलंड मधून कंबोडिया मध्ये गेल्यावर दोन्ही देशामध्ये जमीन अस्मानाचे अंतर जाणवते.

विषय: 
Subscribe to RSS - कंबोडिया