कंबोडियातील एक छत

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

कंबोडियामधे जिथे बान्ते सराई आहे तिथे मी हे एक छत पाहिले आणि मला ते फार आवडले. कुठल्या तरी पानांपासून हे छत तयार केलेले आहे. ह्या छताचे एक वैशिष्ट हे की रणरणत्या उन्हात ह्या छताखाली बसलो की ह्या छताची गार गार सावली हवीहवीशी वाटते. इथे मग एसीसी गरज नाही.

ह्या छताची काही छायाचित्रे:

हा छताचा वरचा भागः

आपल्याकडे पत्रावळी वा द्रोण तयार करताना बारीक काडीने जसे पानांना एकमेकांशी जोडतात तशी ही पाने एकमेकांना नीट जोडली आहेत.. शिवली आहेत.

छत उंच आहे अगदी आपल्याकडील माजघरासारखे:

इथे सिंगापुरमधे, मलेशियामधे, कंबोडियामधे पाण्यात अडकलेल्या वस्तू अशा बाहेर काढल्या जातात आणि पाण्यासाठी वाट मोकळी केली जाते:

हे दोन फोटो कंबोडियासारख्या भारतापेक्षाही गरीब देशातील आहे. आपल्याकडे हा प्रकार अजून आलेला नाही/नसावा:

विषय: 
शब्दखुणा: 

धन्यवाद.
हर्पेन, हे छत आधीच तयार उभ होत. त्यामुळे छत बनवन्याचे विडीयोज नाहीत.

अंग्निपंख, इतके घर्षन नाही होत पानांचे आणि बांबूचे इथे की आग लागेल. आग सहसा बांबूंमधे घर्षन निर्माण होऊन लागते.

छान आहे .. फोटोही नेमके काढलेत.

आपल्याकडे हा प्रकार अजून आलेला नाही/नसावा
>>>
असता तर मुंबईत २६ जुलै झाले नसते.
आपल्याकडे गाळ उपसण्यापेक्षा त्यात भर टाकून ईमारत उभारणे सोयीचे पडते.

अगदी नैसर्गिक बिल्डींग मटेरियल.. पाने कुठली आहेत ते कळले का ? लवकर न सडणारी, उन्हा पावसात तगणारी दिसताहेत !