प्रशासन
तडका-ठाव मना-मनाचे
तडका - आरोप-प्रत्यारोप करताना
तडका - शुभ-अशुभ
ते आणि आम्ही ?
परवाच " चीन " ह्या विषयावरच्या काही डॅाक्युमेंट्रीज पाहिल्या ...........
६००००००० ओफिशियल मेंबर्स असणारी कम्युनिस्ट पार्टी ..,
ओरिजिनल प्रॅाडक्ट बनवणा-या प्रत्येक MNC मॅन्युफॅक्चरिंग युनिट च्या शेजारीच असलेले त्या प्रॅाडक्ट च्या काउंटरफीट' चे मेकींग युनीट........,
४-४, ५-५ चौरस मैलात पसरलेल्या नी एका वेळेस ४० ते ५० हजार लोकांना रोजगार देणा-या कंपन्या असोत,
तडका - हे नवल नव्हे,...
हे नवल नव्हे,...
सरळ सरळ चालणारे
सरळ सरळ ठकू शकतात
कधी धनुष्याच्या बाणाचेही
इथे नेम चुकू शकतात
विश्वासाचे विश्वासही केवळ
इथे फक्त भासुन जातात
अन् कमलपुष्पातही म्हणे
घड्याळी काटे दिसुन येतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
तडका - घेरलेलं बजेट
घेरलेलं बजेट,...
बजेट जाहिर करताना
भावना म्हणे दूजी आहे
महा-बजेट वरती सुध्दा
कुठे महा-नाराजी आहे
बजेट आणि नाराजीचं
असं हे सुत्र ठरलेलं असतं
प्रत्येक-प्रत्येक बजेटला
नाराजीनं घेरलेलं असतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
१९ मार्च २०१५ दै. प्रजापत्र
पुण्यातला कचरा
पुण्यातल्या कच-याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. गेले काही महीने कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी साठलेले कच-याचे ओंगळवाणे ढीग पाहून आपण एका सांस्कृतिक राजधानीच्या शहरात राहतो हे खरे आहे का असे वाटू लागलेले आहे. ठिकठिकाणी रस्ते कच-याच्या ढिगाने अडले आहेत. पाश्चात्य देशातले नागरीक आश्चर्याने कचरा व्यवस्थापनाकडे पाहतात. काही ठिकाणी कच-याला रात्री आग लावून दिली जाते. नागरी वस्तीत कचरा जाळायला मनाई आहे, कारण त्यामुळे घातक वायूंची निर्मिती होते. पण असा साठवून ठेवण्याने आरोग्याला धोका होतोच आहे.
तडका- अविश्वासी ठराव,...
अविश्वासी ठराव,...
कुणी जोडला जाऊ शकतो
कुणी तोडला जाऊ शकतो
विश्वासावर विश्वास ठेऊन
अविश्वास घडला जाऊ शकतो
आकड्यांच्या संख्ये भोवती
साट्या-लोट्यांचा घेराव असतो
अन् विश्वासावर घाला घालुन
कधी अविश्वासी ठराव असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
१७/०३/२०१५ दै. प्रजापत्र
बळी, गुन्हेगार, रक्षक आणि इतर
निर्भया बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याच्या वक्तव्याचा समावेश असलेला लघुपट 'इंडियाज डॉटर' बीबीसी तर्फे प्रसारित झाला आणि देशभरात मोठी खळबळ माजली. त्याच्या वक्तव्यामुळे भारताची मान खाली गेली वगैरे असेही मत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होऊ लागले. मुकेश सिंहचे "रात्री अपरात्री निर्जन स्थळी बाहेर पडणारी स्त्री बलात्कारपात्र आहे" हे मत त्याचे वैयक्तिक मत आहे. त्याचे हे मत व्यक्त झाल्याने भारतातील १३० कोटी जनतेची मान खाली कशी जाऊ शकते? यावर अनेकांनी असाही युक्तिवाद केला की मुकेश सिंहचे मत ही बहुसंख्य भारतीय पुरुषांची मानसिकता आहे.