परवाच " चीन " ह्या विषयावरच्या काही डॅाक्युमेंट्रीज पाहिल्या ...........
६००००००० ओफिशियल मेंबर्स असणारी कम्युनिस्ट पार्टी ..,
ओरिजिनल प्रॅाडक्ट बनवणा-या प्रत्येक MNC मॅन्युफॅक्चरिंग युनिट च्या शेजारीच असलेले त्या प्रॅाडक्ट च्या काउंटरफीट' चे मेकींग युनीट........,
४-४, ५-५ चौरस मैलात पसरलेल्या नी एका वेळेस ४० ते ५० हजार लोकांना रोजगार देणा-या कंपन्या असोत,
मुस्लीम बहुल जिंझियांग प्रांतात मुस्लीमांचं प्राबल्य कमी व्हावं म्हणुन सरकारनी सुरु केलेला लाखोंच्या संख्येन बिगर मुस्लीमांच्या त्या भागात स्थानांतरित होण्याचा कार्यक्रम नी त्याची भलामण करणारा नी " मी लहानपणी कुराण वाचलंय पण कम्युनिस्ट पार्टीत आल्यावर मी इस्लाम पाळणं बंद केलं.." असं म्हणणारा इस्माइल तालिवाडी नामक जिंझियांगचा मुसल्मान गव्हर्नर ............
रातोरात सेझ' साठी गावंच्या गावं गायब करणारी नी बिजींग सारख्या दिड करोड लोकसंख्येच्या शहरात मेट्रो/ हायवे बनवण्यासाठी दोन दिवसात अख्खी ४ किमी अंतरात पसरलेली झोपडपट्टी गायब करणारी सिस्टम असो..
वा हो-हँग-हो नी यांगत्सेच्या खो-यात दरसाल येणा-या पुरामुळे जीवित व वित्त हानी होत असल्याने निर्णय घ्यायला कमिटी बसवुन महीनाभरात ४-४ अजस्त्र धरणं बांधायचा निर्णय घेउन सुमारे २ कोट लोकांना पुढल्या सहा महीन्यात स्थलांतरीत करणं ...........
डोकं सुन्न झालंय..!
मोदी साहेब.. तुम्ही प्रयत्न करताय हे ठीक..
पण आपल्या इथल्या " स्वातंत्र्यामुळे" झालय काय की गल्ली गल्लीतच ओंगळपणा इतका वाढलाय की एक काय १०० मोदी जरी दिल्लीत आले तरी ते ही आम्हाला सुधारु शकतील का? असा प्रश्न पडतो .
अजुन ५ वर्षांनी २०१९ ला , " अमकं फुकट दिलं नाही, तमक्याचे भाव वाढवले, अच्छे दिन आलेच नाहीत.. " असल्या फुटकळ कारणानी आम्ही तुमची सत्ता घालवणार की काय ?
आम्हाला फुकट/ विनासायास नी कुठल्याही बांधीलकी विना पुरोगामीपण/ आरक्षण वगैरे ची झुल पांघरुन नी ' स्वैराचाराचा नंगा नाच' रुपी स्वतंत्र राहुनच सगळं मिळवायचंय.. जे की अशक्य आहे..
हल्ली, रोज संध्याकाळी दिवे लागणीला माझ्या एक वर्षाच्या पोराला कडेवर घेउन देवासमोर उभं राहुन "शुभं करोती" बरोबरच " नमस्ते सदा वत्सले मातृभुमे" सुद्धा म्हणतोय..
नी फक्त मनात असलेल्या ( नी १५ आगस्ट/ २६ जानेवारी सोडुन इतरत्र कधी ही न दिसणा-या) तिरंगी ध्वजाला
" ध्वज प्रणाम..
एक
दो
तीन .." म्हणुन सलाम ठोकतोय..
सद्ध्या तेवढंच हातात आहे माझ्या..!
*Edited
तर्कशुद्धपणे मांडण्याऐवजी
तर्कशुद्धपणे मांडण्याऐवजी विचार जास्त भडकपणे मांडल्यामुळेच लेख पटलेला नाहीये. असो. शेकड्यांनी प्रतिसाद यावेत असा विषय आहे.
बर मग तुमचे म्हणणे काय आहे
बर मग तुमचे म्हणणे काय आहे बुवा नक्की ? भिडस्त पण बाजूला ठेवून नक्की काय हवे आहे ते सांगा कि ..
आशा आहे की हा धागा राजकारणावर
आशा आहे की हा धागा राजकारणावर जाणार नाही.
काही विषय भावनातिरेकाने लिहावेसे वाटतात व ती निवड लेखकाची असते. उर्मी येईल तसेच माणूस लिहितो. त्यामुळे एखादा विषय तर्कशुद्धपणे न लिहिता भावनिकपणे लिहिला म्हणून मला तरी त्यात काही वावगे वाटत नाही.
रमेश भिडे - राजकारण, पक्ष, नेते वगैरे विषय एका बाजूला. पण नुसती भारतीय नागरिकांची मानसिकता इतर अनेक देशांतील नागरिकांशी कंपेअर केली तरी आपले लोक किती फुकटखाऊ, कष्ट टाळणारे, नुसत्याच अपेक्षा करणारे, देशभक्तीची भावना नसलेले वगैरे आहेत ते लक्षात येईलच! असेच लोक पुढे सरकारमध्ये जातात आणि सरकारेही तशीच होतात ह्यातहीकाही नवल नाही. चीनचे काय घेऊन बसायचे? छोटे छोटे टीचभर देश नुसत्या टूरिझमवर इकॉनॉमी उभी करून पुन्हा शिस्तबद्धपणेही वागताना दिसतात.
@ बेफ़िकीर, << काही विषय
@ बेफ़िकीर,
<< काही विषय भावनातिरेकाने लिहावेसे वाटतात व ती निवड लेखकाची असते. उर्मी येईल तसेच माणूस लिहितो. त्यामुळे एखादा विषय तर्कशुद्धपणे न लिहिता भावनिकपणे लिहिला म्हणून मला तरी त्यात काही वावगे वाटत नाही. >>
मान्य. पण तरीही,
आपण १९४७ ला आणि चीन १९४९ ला असे जवळपास एकाच वेळी स्वतंत्र झालो. दोन्ही देश आशिया खंडातले, दोन्ही सुरुवातीपासूनच गरीब, दोघेही लोकसंख्याबहूल असे असतानाही ते आपल्या पेक्षा आज बर्याच आघाड्यांवर प्रगत आहेत, इतपत मान्य. पण त्याकरिता व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी देणे, दडपशाही, हुकूमशाहीचा वापर करणे अमान्य. अर्थात हे सारे न करताही आपण आज आहोत त्यापेक्षाही नक्कीच जास्त प्रगत होऊ शकलो असतो म्हणजे आपण कुठेतरी चुकलो हेदेखील मान्य. पण, या खालच्या वाक्यांमधून
<< मोदी साहेब.. तुम्ही प्रयत्न करताय हे ठीक..
पण आपल्या इथल्या " स्वातंत्र्यामुळे" झालय काय की गल्ली गल्लीतच ओंगळपणा इतका वाढलाय की एक काय १०० मोदी जरी दिल्लीत आले तरी ते ही आम्हाला सुधारु शकतील का? असा प्रश्न पडतो . >>
मोदी एकटेच विकासाकरिता झटताहेत आणि बाकी कुणालाच विकासाची काळजी नाही हा जो आशय डोकावतो आहे तो अमान्य.
एक काय १०० मोदी जरी दिल्लीत
एक काय १०० मोदी जरी दिल्लीत आले तरी ते ही आम्हाला सुधारु शकतील का?>>> कोणीतरी (इथे तुम्हाला आवडेल त्याचे/तिचे नाव टाका) आमचा उद्धार करेल या भ्रमातून बाहेर आल्याशिवाय काहीच होणार नाही.
चीनबद्द्ल आधी जे लिहिले आहे ते इतके ओपन टू इंट्रप्रिटेशन का आहे?
थोडा खुल के आ जाओ!!!
कसले बेक्कार आहेत ना चिनी लोक
कसले बेक्कार आहेत ना चिनी लोक ? कशाला त्यांना पाळण्यावर बसवून गाई गाई करायचं ?
भारतात एकच विकासपुरुष
भारतात एकच विकासपुरुष आहे
मोदी लवकर देशात कम्युनिस्ट आणा हुकुमशाही आणा. अजस्त्र धरणे बांधा झोपडपट्ट्या घरे तोडुन टाका (या कापड लावुन झाकुन टाका जसे तुम्ही करतातच) एकदम चकाचक करा. भुमी अधिग्रहण करा मस्त त्यावर टोलेजंग कारखाने उभा करा त्याच कारखान्यात तुटपुंज्या पगारावर त्या शेतकार्यांच्या मुलांना कामावर लावा आणि लोकांना सांगा बघा कशी रोजगार निर्मिती झाली. मस्त मस्त आता भारताला विकास करण्यावाचुन कोणीच रोखु शकत नाही.
जय हिंद
एकंदरीतच आज पुढील पिढीला
एकंदरीतच आज पुढील पिढीला भारतात राहणे आशेचे वाटू नये, याला सबळ कारण आहे.
अभिनंदन! धागा सहजरीत्या
अभिनंदन! धागा सहजरीत्या राजकारणावर वळवणार्यांचे!
बेफी धागाकर्त्यानेच ते केले
बेफी धागाकर्त्यानेच ते केले आहे उगाच आरडाओरड करु नका
खुश का?
(अर्थात तुमची सवय आहेच
(अर्थात तुमची सवय आहेच ती)<<<
वैयक्तीक दोषारोप टाळा. संयमाला मर्यादा असतात. सगळ्यांच्याच!
धन्यवाद!
बेफी आमच्या देखील संयमाला
बेफी आमच्या देखील संयमाला मर्यादा असतात हे देखील लक्षात ठेवत जावा.
खुश का?<<< बेफी आमच्या देखील
खुश का?<<<
बेफी आमच्या देखील संयमाला मर्यादा असतात हे देखील लक्षात ठेवत जावा.<<<
बाकीचे प्रतिसाददाते म्हणजे लहान पोरे वाटली का गोळ्या देऊन खुष का म्हणायला?
असो! माझ्याकडून विषयांतर होऊ नये म्हणून मी थांबत आहे. तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणत राहिलात तरीही!
मोदींवरच्या धाग्यावर कृपा
मोदींवरच्या धाग्यावर कृपा करून अध्यात्मिक प्रतिसाद द्यावेत अथवा सहमत आहे असे म्हणावे. मनमोहनसिंग,राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, शरद पवार यांच्यावर टीका करायला, मुक्ताफळांचे धागे काढण्यास परवानगी आहे हे लक्षात घेण्यात यावे. सूचना संपली.
राजकारणावर वळवणार्यांचे! <>
राजकारणावर वळवणार्यांचे! <> हे तुम्ही असे लिहिले आहे की भिडे यांनी फारच निष्पापमनाने धागा काढला आहे
स्वतः लिहायचे आणि दुसर्यांवर आरोप लावायचे. छान
तर्कशुद्धपणे मांडण्याऐवजी
तर्कशुद्धपणे मांडण्याऐवजी विचार जास्त भडकपणे मांडल्यामुळेच लेख पटलेला नाहीये.
" तर्कशुद्धपणे " मांडून गेल्या ६० वर्षात कोणाचा आणि कसा विकास झाला ते पण एकदा आम्हाला सांगाच !!
६५ वर्षांनंतर नेत्र दिपक परगती करुनही भारतीय जनता शेवटी विकासाच्या गमजा करणार्या फेकुचंदच्या मागे का
लागली हे सुद्धा कळु देत.
गेल्या ६५ वर्षात १०० % पैकी ९७% जागा आरक्षित केल्या, शेवटी कोर्टाला काही आरक्षण रद्द कराव लागल. अस
आरक्षण करुन समाजाचा कोणता भाग विकसीत झाला ? का भारतातील कुपोषणातील संख्या कमी झाली ?
तेच गुजरात मधे कुपोषणाची
तेच गुजरात मधे कुपोषणाची संख्या वाढत गेली कुठे झाला विकास सांगा पाहु काय केले १५ वर्ष
ए शांटे
नमस्ते सदा म्हणताना मनात
नमस्ते सदा म्हणताना मनात किंवा समोर तिरंगा लावतात का ?
जळ्ळ्ळी एकाची
जळ्ळ्ळी एकाची
६५ वर्षे म्हंटली की जळ्ळ्ते
६५ वर्षे म्हंटली की जळ्ळ्ते त्यांची
गुजरातचे नाव काढल्या बरोबर आग
गुजरातचे नाव काढल्या बरोबर आग निघायला सुरुवात
पासष्ट वर्षांपूर्वी देशात
पासष्ट वर्षांपूर्वी देशात सुबत्ता होती. सामाजिक एकोपा होता. जगात अनेक ठिकाणी आढळणारे अस्पृश्यता, गुलामी असे लक्षण भारतात चुकूनही आढळत नसे. ब्रिटीशांचा जरी अंमल होता तरी ब्रिटीशांमधे आढळणारे पुरोहीत वर्गाचा वरचष्मा आणि इतरांना शिक्षणबंदी हे व्यवच्छेदक लक्षण देशात स्विकारले गेले नाही. सतराव्या शतकात देशात औद्योगिक क्रांती झाली, विज्ञानाचा प्रसार झाला. वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली आणि आधुनिक वैद्यकीय शाखेने जन्म घेतला. ब्रिटीशांनी हे ज्ञान आपल्याकडून तिकडे नेले. समाजात सर्वत्र आनंदीआनंद होता. देशाचे खजिने भरभरून वाहत होते. राजेशाही नावाला नव्हती. जनतेला वैचारीक स्वातंत्र्य असे. मूठभर लोक शिकलेले असल्याने त्यांची सांस्कृतिक, वैचारीक दडपशाही इथे दिसत नसल्याने चिनी विचारवंतांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्याचे आढळते.
असे असताना १९४७ नंतर अचानकच दारीद्र्य आले ते गेल्या ६५ वर्षातील तर्कशुद्ध विचारांनीच. म्हणूनच एका वर्षातच राष्ट्रभक्तांनी ठो असा आवाज काढला.
देशभक्ती शिकवायचा संघवाल्याना
देशभक्ती शिकवायचा संघवाल्याना इतका पुळका असेल तर आधी संघात तिरंगा लावायला सुरु करा
६५ वर्षांनंतर नेत्र दिपक
६५ वर्षांनंतर नेत्र दिपक परगती करुनही भारतीय जनता शेवटी विकासाच्या गमजा करणार्या फेकुचंदच्या मागे का
लागली हे सुद्धा कळु देत. >>> फेकुचंद कोण ? आतल्या गोटातले नाव असेल तर कृपया जनतेला कळावे.
http://www.bhaskar.com/news-f
http://www.bhaskar.com/news-fpaid/UT-DEL-NEW-world-leaders-salaries-modi...
अभिनंदन इथे प्रचंड विकास करत चीनला मागे टाकले गेले आहे
चायवाला > चायनावाला
चायवाला > चायनावाला
हिंदी चिनी भाई भाई !! १९६२
हिंदी चिनी भाई भाई !! १९६२ चा फियास्को ईसरले काय " काउ " ?
ज्याला त्याला भाई भाई !!
:G:
:G:
:G:
:G:
उन्मत्त महासत्ता , उद्ध्वस्त
उन्मत्त महासत्ता , उद्ध्वस्त ध्रुव
http://www.meltdownintibet.com/
मयेकर, अहो, हे काय लिंकत
मयेकर,
अहो, हे काय लिंकत आहात??
कोंढा जरी ६२ च्या फियास्को बद्दल बोलत असले तरी त्या सो कॉल्ड 'फियास्को'चा अर्थ नेहरू मूर्ख होते, इतकाच आहे. त्यावेळीच भारतीयांनी संघाला सत्तेवर बसवलं असतं तर आज चीनदेखिल अखंड भारताच्या आय मीन हिंदुस्थाणाच्या नकाशात सामिल झालेला पहायला मिळाला असता. पण आपलं नशीबच फुटकं.
बाकी इतर बाबी विचारात घ्याल, तर चीन हे आदर्श राष्ट्र आहे. तिथे मूर्खांचा विरोध मोडून काढला जातो. चीनमधील "लोकशाही" फडतूस आदिवासी, 'विकासाआड येणारे तथाकथित फॉरेन फंडेड पर्यावरणवादी' 'मानवाधिकार'वाले इ.ची समजूत घालण्यात वेळ घालवत नाही. इन फॅक्ट असले लोक तिथे सापडले की ताबडतोब गायब केले जातात.
परिणाम? अहो बघा!! किती तो विकास! जगभरात चिनी बनावटीच्या (बनावटी? च्या) वस्तूंनी बाजारपेठ काबीज केलिये!! किती प्रगत देश आहे!
(अॅव्हरेज चिनी व्यक्ती अन अॅव्हरेज इतर देशीय नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दल बोलायचे नाही. मला मुले किती व कोणत्या लिंगाची असावीत, मी लग्न कुणाशी करावे?, मी कोणता व्यवसाय कुठे करावा, हे 'पक्षाचे' अधिकारी ठरवतात म्हणे. अन तसेच असायला हवे. उग्गंच नाही ते त्या पदावर पोहोचले? ते सांगतील ते बाबावाक्य प्रमाण मानलेच पाहिजे, अन्यथा पुढल्या जन्मी तुम्हाला... असो. श्शऽऽऽऽ
)
तेव्हा,
ते वर भिडे सांगताहेत ना?
चला, आपल्या पितृभूला ऐश्वर्याप्रत पोहोचवू या! हाच निर्धार या हिंदू नववर्षदिनानिमित्ताने करूयात. ६१-६२ वर्षांनी का होईना, पुन्हा त्याच आपल्या उज्ज्वल भूतकाळात जाऊया!
उत्तिष्ठ! जाग्रत!!
भारताचा विकास झाला पण चीनचं
भारताचा विकास झाला पण चीनचं पाहीलंत का असं तुणतुणं कुठल्या गोटातून वाजायचं गेल्या दहा वर्षात ?
१९६२ चा इतिहास सुद्धा जनतेला ठाऊक नाही. हिंदी चिनी भाई भाई म्हटल्यावर चीनने आक्रमण केले. त्यानंतर नेहरू गर्भगळीत झाले. हे पाहून संघनेतृत्व खवळले. राष्ट्रप्रेमाची प्रखर भावना असलेल्या एका संघटनेचं नेतृत्व ते. त्यांनी ताबडतोब आपल्या सैन्यास आदेश दिला. स्वयंसेवक दंड घेऊन धावले. संघनेतृत्व पिस्तूल शोधू लागले, पण ४८ साली ते भारत सरकारने जप्त केले होते. तेव्हां मनोनिग्रह आणि दृढनिश्चयाच्या जोरावर ते चिनी सैन्यावर चालून गेले. पुढे चालणारे बाळासाहेब देवरस हे साक्षात नेपोलियनप्रमाणे भासत होते. नेपोलियनने पेशव्यांपासून प्रेरणा घेऊन फ्रान्सला ऑस्ट्रीयन आणि इंग्रजांच्या आक्रमणापासून वाचवले तसेच संघाने चिनी सैन्यावर हल्ले केले. हे हल्ले इतके भयंकर होते की त्या वेळी भारतात आलेला एक चिनी प्रवासी स्युं फुंग फूइस लिहीतो की आकाशात काळ्या मेघांची दाटी व्हावी तसे हिमालयाच्या शुभ्र हिमावर स्वयंसेवकांचे ते अर्धवेषधारी सैन्य भासत होते. त्यांचा वेष पाहूनच चिनी गर्भगळीत झाले होते. त्यानंतर या सैन्याने त्यांना अनेक आवेषपूर्न भाषणे ठोकून जेरीस आणले. या शस्त्राने चिनी गांगरून गेले आणि भीक नको पण... या भीतीने ते सैरावैरा धावू लागले. अशा रीतीने युद्ध संपुष्टात आले.
हा अध्याय मुद्दामच लिहीला गेलेला नाही.
Pages