पुण्याचे (गायब असलेले ) सायकल ट्रॅक -
पुणे हे पुर्वीपासून सायकलचे शहर म्हणून ओळखले जाते, आजही कामासाठी, छंद म्हणून आणि व्यायामाच्या निमित्ताने पुण्यातील सायकलस्वारांची संख्या वाढत आहे ,जे पर्यावरणासाठी एक चांगले पाऊल आहे. हा लेख पुण्यात अस्तित्वात असलेल्या सायकल ट्रॅकची दयनीय अवस्था आणि गैरवापर याबाबत सांगणारा आहे.
विकासाच्या समस्या
प्रत्येकजण आपली बाजु
आपल्या परीनं पटवुन देतो
कुणी काय केले याचाही
प्रत्येक क्षण आठवुन देतो
विकासाच्या नावानं कित्तेकवेळी
निवडणूकाही लढलेल्या असतात
मात्र येणार्या प्रत्येक निवडणूकीत
विकासाच्या समस्या वाढलेल्या असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
प्रतिष्ठा,...
आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी
प्रतिष्ठा सदैव पेलावी लागते
प्रतिष्ठा जपण्यासाठी कधी
प्रतिष्ठा पणालाही लावावी लागते
प्रतिष्ठा अशी जपली जावी की
प्रतिष्ठेची कधीच चेष्ठा नसावी
प्रतिष्ठा आपली असली तरी
त्यावर इतरांचीही निष्ठा असावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
निवडणूकीय मुद्दे
कधी आर्थिक,कधी भावनीक
कधी जातीचा आधार असतो
निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने
कधी अश्वासनीय बाजार असतो
प्रत्येका कडून प्रत्येकावर
आरोप-टिकांचे गुद्दे असतात
प्रत्येक-प्रत्येक निवडणूकीत
तेच-तेच ठरेल मुद्दे असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
एक्झिट पोल,...
निकाल जाहिर होण्याआधीच
तर्क-वितर्काचे बोल असतात
प्रत्येक -प्रत्येक निवडणूकाचे
इथे एक्झिट पोल असतात
अंदाजे बांधलेल्या अंदाजाचीही
कुणाला भलतीच धास्ती असते
कारण एक्झिट पोल म्हणजे
रंगीत तालमीतली कुस्ती असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
टोल बंद,...?
कुठे-कुठे आंदोलनं झाली
तर कुठे निदर्शनंही झाली
टोलच्या टोलवा-टोलवीत
वैचारिक घर्षनंही झाली
पण ना टोल हटला गेला
ना संघर्षही बारिक आहे
टोल बंदच्या धोरणासाठी
अजुन पूढची तारिख आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
नियम,...
कुठे लादले जातात तर
कुठे लादून घेतले जातात
माणसांसाठीचे नियम कधी
माणसांकडूनही कातले जातात
कधी नियम वाढवले जातात
कधीे ते तुडवले जाऊ शकतात
तर कधी-कधी नियम सुध्दा
हवेत उडवले जाऊ शकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
प्रशासकीय कृपा,...?
मोबाईल वापरण्याची हौस
प्रत्येकाच्या मनी दिसु शकते
मात्र कुठे मोबाईल वापरणे
हि अराजकता असु शकते
हल्ली तर जेलमधील कैद्यांचाही
मोबाईल वापराचा सोहळा आहे
कैद्यांच्या या मोबाईल वापरावर
प्रशासनाचाही काना डोळा आहे,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तंबाखु,...!
कुणी विरोधात आहेत तर
कुणी-कुणी हितचिंतक आहेत
तंबाखु टिकवण्याच्या बाता
आता भलत्याच भंपक आहेत
तंबाखुच्या योग्य-अयोग्यतेवरती
अकलेचे कांदे ना फूत्करले जावे
ज्यांनाही तंबाखुने बरबाद केले
त्यांनाच वास्तव विचारले जावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३