अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुरुवात करते ...
१) प्रींट करताना जिथे जिथे शक्य आहे तिथे डबल साईड प्रींट करणे (काही प्रोटोकॉल सिंगल पेजवरच प्रींट डॉक्यूमेंट करावे लागतात ते सोडून) कामाच्या ठिकाणी देखील मी अनेकांना ही सवय लावत आले आहे/ लावते.
घरात लिहायला, यादी करायला, निरोप लिहायला वगैरे आणि कामाच्या ठिकाणी रफ वर्क करता 'पाठकोरे' कागद वापरणे.
अश्या कागदांच्या मी वह्या करून ठेवते. आणि कामाच्या ठिकाणी देखील सगळ्यांना त्या वापरायला देते.
(घरात तर 'आमच्याकडे मेल मधे येणार्‍या कूपनांची मागची बाजूच जास्त वापरली जाते' हा नेहेमीचा मारण्यात येणारा जोक आहे)
२) भांडी घासताना, दात घासताना वगैरे पाण्याचा नळ तसाच वाहता न ठेवणे.
३) जुन्या शर्टांचा, टीशर्टचा वापर ओटा , फर्निचर, कार , सायकली पुसायला करणे. कार, सायकलीच्या बाबतीत २-३ वेळा घुवून अनेकदा टाकून द्यावे लागतात, पण शक्य तितका पेपर टॉवेलचा वापर कमी.
४) माझ्याजवळ माझी एक पाण्याची बाटली कायम असते. मी त्यात रिफील करून पाणी पिते, प्रवासात देखील शक्यतो. जेणेकरून पाण्याच्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा वापर कमी
५) ग्रोसरीला पिशव्या घेऊन जाणे. गरज असेल त्याप्रमाणे ग्रोसरी करणे ( पालेभाज्या, सॅलड, फळे लगेच संपली नाहीत तर खराब होतात)
६) दूधाचा कॅन संपल्यावर तसाच टाकून न देता, विसळून ( rinse करून) त्यातले पाणी झाडांना घालणे (भारी वाढतात मनी प्लांट वगैरे)
७) कमीत कमी आवश्यक तितक्याच गोष्टी विकत घेणे... उगाच पीयर प्रेशर किंवा कॅपीटलीझमला बळी पडण्याच्या पलिकडे गेले आहे मी. काही विकत घ्यायचा मोह झाला की घरात त्याच प्रकारची वस्तू आहे तीचा आपण नीट पुरेपुर वापर केला आहे का? वापर होतो का हा विचार केला की जाणवतं अनेक गोष्टी आपण केवळ 'इंपल्स' ने खरेदी करतो. त्याची गरज नसते.
(माझ्यासारखी व्यक्ती कॅपिटलीझमला धोका आहे, असं मला वाटतं अनेकदा ..लोल)
८) घरात एका खोलीतून दुसरीकडे जाता-येताना दिवे, पंखे वगैरे त्या त्या वेळी बंद करणे

बाकी बरंच काही... नंतर लिहिते.

(मला वाटतं ह्यातल्या खूप सार्‍या गोष्टी कोणत्याही देशात करता येतील आणि मी कुठेही राहिले तरी हेच करीन. असेच अनेक मुद्दे लोक मांडायची शक्यता आहे. त्यामुळे हेडींगमधे ' अमेरिकेतील' असं म्हणून रीस्ट्रीक्ट न करता 'पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना' असा विषय मांडला तरी चालेल असं मला वाटतंय)

रार ने लिहिलेल्या पोस्टला मम फक्त सहावा मुद्दा सोडून. आता तो ही अमलात आणेन.याशिवाय,
डिशवाशर आणि वाशिंग मशीन पूर्ण भरल्याशिवाय वापरत नाही.
शाळेत मुलांना सोडताना किंवा आणताना गाड़ी एक ब्लाक अलीकडे लावते.
माझ्याकडे कडधान्य साठवायला जूस च्या काचेच्या बाटल्या आहेत.
इंडियन ग्रो मधून आणलेल्या दहयाच्या डब्यांचा वापरही मी ग्रोसरी साथवायला करते.
आत्तापर्यन्त एका शेफ मित्राने दिलेल्या चीज़ च्या रिकाम्या डब्यांतुन डाळ तांदुळ साठवत होते पण ते डबे खूप जून झाल्याने अलीकडेच मुलीच्या शाळेत दिले( त्यांच्या शाळेत फाइव सेंट्स ड्राइव असतो. ते सुट्टे पैसे गोळा करायला)
ग्रोसरी साठी घरून पिशव्या घेऊन जाते. पण कधी तिथल्या पिशव्या घरी आणल्या तर त्या परत देऊन येते.(त्यांनी recycle bin ठेवले आहे )
अति shopping (कपड़े, चपला, cosmetics) करत नाही!

अति shopping (कपड़े, चपला, cosmetics) करत नाही! >> Biggrin आवडलं.
भारतात दोन माणसात मिळून एक गोदरेजचे कपाट वापरणारे लोक्स परदेशी आल्यावर मात्र अडीच गोदरेजचे कपाट मावेल अशा वॉक-इन क्लॉजेट मध्ये एका माणसाचा स्टफ अशा पद्धतीने राहताना पाहिले आहेत. नो जजमेंट पसंद अपनी अपनी. पण ज्या ऑफीस स्टाफ आजीने "कॅपस्यूल वॉर्डरोब" ही संकल्पना मला विद्यार्थीदशेतच समजावली आणि तो एस्टॉब्लिश करायला राईड देणे इ इ अगदी मनःपूर्वक साहाय्य केले तिची मी रुणाईत (रू!!) आहे.

मी पर्यावरणवादी स्वतःला म्हणू शकेन का ह्याबद्दल मला शंका आहे पण 'फ्रुगली' (जसे ३५ हँगर वार्ड्रोब) रहाणे जमते. उपकरणांच्या बाबतीत मॅन्यूअल वाचते, कंझ्युमर रेकमेंडेशन्स वाचते, पाळते. त्यामुळे किंवा लक असेल म्हणून लॅपटॉप्स ६+ वर्षे चांगले चालले आहेत. फोन्स ३+ वर्षे चांगले चालले.

कार ट्रंक व कार साफ ठेवते - दर २५ किलोला १% इंधन अधिक लागते सांगतात. एक वर्षापासून आता पब्लिक ट्रान्स्पोर्ट जास्त वापरत आहे.

मागच्या वर्षी ह्याच महिन्यात जे वीज बिल होते (अनेक वीज कंपन्या ऑनलाईन खात्यात ही माहिती देतात) त्याच्या ५% वीज बिल कमी यावे असे ध्येय ठेवते आणि ५०% पेक्षा अधिक महिन्यात यशस्वी होते.

स्टायरोफोमचा वापर टाळते ("टू गो" बॉक्स विशेषतः!). कॅन्ड फूड टाळते. कागदी पुस्तके वाचणे बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे.....

माझी पण यादी
१. ग्रोसरीच्या पिशव्या ह्या पहिल्या वर्षी एका career fair ला मिळाल्या त्याच वापरते आहे. आता तर ऑस्टिन मध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदीच घातली आहे. अजून एक आयडिया..ग्रोसरी करताना बरेचदा प्रत्येक भाजी एका वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत घालून तिच्यावर लेबल लावावे लागते जे बिल करताना स्कॅन करतात (इथे तरी). त्याऐवजी मी एकच प्लास्टिकची पिशवी घेते आणि त्यावर सगळी लेबल्स चिकटवते! आणि भाज्या डायरेक्ट ग्रोसरीच्या पिशवीत! अशाने बिल करणे पण सोपे जाते आणि प्लास्टिकच्या पिशव्या देखिल कमी वापरल्या जातात.
२. मी अपार्टमेंटमध्ये राहते आणि घरात नसताना एसी बंद ठेवते. एका खिडकीची छोटीशी फट उघडी ठेवायची की हवा खेळती राहते. इथे हवामान इतकं हार्श नसल्याने वर्षातले ८ महिने तरी हे सहज जमतं. CFL चेच दिवे वापरते.
३. junk paper mail recycle bin मधेच टाकते. शक्यतोवर काही प्रिंट करत नाही केलं तर double-sided.
४. माझ्याकडे कार नाही. सगळीकडे बस किंवा सायकलने प्रवास करते. आणि जर लांब जायचं झालं तर कार पूल!
५. ही pot luck ची कल्पना आहे. pot luck च्या वेळी किंवा इतर वेळी सुद्धा plastic cutlery शक्यतोवर वापरत नाही. त्या ऐवजी येणारी मंडळी स्वतः ताटे-वाट्या-भांडी घेऊन येतात!
६. ही कल्पना मी एकांकडे पाहिली होती. त्यांच्या पार्टीत प्रत्येकाच्या ग्लास वर मार्कर ने नाव लिहिलं होतं. म्हणजे disposable cup असला तरी एकच ग्लास पूर्णवेळ वापरला जाईल.
७. रेस्टरूममधे हात धुतल्यावर कमीत कमी पेपर टॉवेल वापरते. (TED Talk: https://www.youtube.com/watch?v=2FMBSblpcrc)

8. Buy local, eat local-Austin मध्ये सुदैवाने ह्या बाबतीत बरीच जागरुकता आहे. मी Wheatsville co-op ह्या co-operative society ची मेंबर आहे. त्यांचे ग्रोसरी स्टोर आहे जिथे बऱ्याचशा locally made गोष्टी/भाज्या मिळतात. थोड्या जास्ती महाग असतात. शक्य तितक्या गोष्टी मी तिथूनच घेते. स्पेशली दूध, दही आणि पोळ्या (सुरेख ताजे organic wheat tortillas मिळतात!). तुम्ही मेंबर असाल तर थोडा डिस्काऊंट मिळतो. आणि त्यांचा food bar पण खूप छान आहे!
९. शक्यतोवर लोकल जागी जेवायला जाते. Food chains मध्ये जात नाही. इथे go local नावाचे कार्ड मिळते. काही पैसे भरून ते विकत घेतले की बऱ्याच locally owned businesses च्या इथे १०% डिस्काऊंट मिळतो!
१०. माझ्याकडे कार नाही पण माझ्या घरासमोर car wash आहे आणि तिथला पाण्याचा अपव्यय पाहून माझा जीव जळतो! कोणीतरी त्या विषयी पण लिहा प्लीज!

अभी के लिये इतना ही! अजून सुचलं की लिहीन! काही मुद्दे रारने लिहिले आहेत.
रार, मला वाटतं की काही गोष्टी जरी सारख्या असल्या तरी भारतात आणि अमेरिकेत/युरोप/ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी जीवनशैलीत बराच फरक आहे. त्यामुळे हवं तर वेगळा धागा काढू (मला वाटते already आहे). हा भारताबाहेरच्या लोकांसाठी राहू दे. At least पहिले काही दिवस तरी..मग बघू!

रार +१
१. फर्नेस आणि AC चा thermostat प्रोग्रॅम करून आपण ज्यावेळी घरी असू तेंव्हाच ते चालू होतील ते बघतो. थंडीत तापमान २१- २२ डि. से. आणि उन्हाळ्यात प्लेझंट तापमानापेक्षा एखाद डिग्री जास्त ठेवतो. त्याने बरीच वीज/ gas वाचतो.
२. जेव्हा थंड वाटत असेल तेव्हाच तात्पुरतं तापमान बदलतो, जेणेकरून तेव्हा कम्फर्ट वाटेल, पण पुढचं शेड्युल सेट तापमानावरच टिक होईल.
३. गरम पाण्याचा हिटरचं तापमान अगदी कमी (लोअर साईड) ठेवतो. अन्यथा दिवसभर गरज नसताना ते पाणी उकळ उकळ उकळते, ज्याची काहीही गरज नसते. पाहुणे आले की/ घरच्यांनी अगदीच किती थंड पाणी येतंय असा ओरडा केला की वाढवतो (जेणेकरून एकावेळेला, सलग जास्त पाणी वापरता येईल.)
३. झाडांना पाणी घालताना नळीला स्प्रे टाईप स्प्रिंकलर लावून हाताने घालतो. अगदीच स्प्रिंकलर लावायची वेळ आली तर न विसरता तो हलवतो आणि वेळेत बंद करायचा प्रयत्न करतो.
४. घरात येणारे सगळे कागद - काचा- प्लास्टिक वेगळं करून रिसायकल करतो. गारबेज कमीतकमी टाकण्याकडे कल. दुधाच्या पिशव्या धुवून त्यापण रिसायकल करतो (ते पाणी फेकत होतो आता ते झाडांना घालीन :). ज्ये ना असले की ते पाणी चहाला वापरले जाते:) )
५. घरात प्रत्येक वस्तू नवी-कोरी आली पाहिजे, असं न करता काही प्रकारच्या वस्तू उत्तम स्थितीत कोणी विकत असेल तर ती आणतो. (किजीजी वापरतो, नको त्यावास्तु डोनेट करतो, गुडविलला चक्कर मारतो)
६. लाईट बंद करणे मी विसरतो, ते सुधारायला activity सेन्सर वाले स्वीच आणायचा विचार आहे.
७. इनक्यांडेसंट दिवे वापरण्या विवाजी CFL/ लेड वापरतो.
८. डिश washer / washing मशीन पूर्ण लोड झालं की च लावतो.

९. पॉटलक ला स्वतःचे ताट घेऊन जाणे जमले नाहीये, पण घरी असेल तेव्हा बायोडीग्रडेबल कप, प्लेट वापरतो.
१०. गाडी आळसामुळे सठीसामाशी धुतो (आता गो ग्रीन ब्र्याग करतो Happy )
११. कार आहे, कधी लांब एकट्याने जायचे असेल तर कार पूल करतो, बरेचदा केलंय आणि अजूनतरी एकाही वाईट अनुभव आलेला नाही. आपले किंवा त्यांचे gasचे पैसे निघतात, टोटली डिफरंट व्यक्तींशी ओळख होते, गो ग्रीन Happy
१२. ग्रोसरी करताना बिलिंग कौन्टर जवळ काही दुकानात रिकामे खोकडे ठेवलेले असतात त्यात समान भरून आणतो. जेणेकरून ट्रंक मधून घरात समान आणणे सोयीचे होईल, आणि ते खोकडे गारबेज डेला रिसायकल करून फुकटच पुण्य मिळेल.
आता लक्षात आलं वर ३ नंबर पण रिसायकल झालाय Proud आता बदलत नाही.

मी पण प्लास्टिकच्या ताटल्या वगैरे वापरत नाही. माझ्याकडे बरेच वर्षांपूर्वी घेतलेल्या स्टील आणि काचेच्या ताटल्या/ताटें/ वाट्या असा २५ ते तीस माणसांना पुरेल असा सेट आहे. तोच वापरते. डिस्पोजेबल ग्लास वापरायची वेळ आली तर सोबत मार्कर ठेवते आणि लोकांना त्यावर नाव लिहून वापरायला सांगते. हातरुमाल अजूनही वापरते!

लोक्स बरंच कलेक्शन झालंय त्यात माझे दोन पैसे

१. मुलांच्या वाढदिवस्/कुठल्याही पार्ट्यांसाठी डॉलर शॉप किंवा तत्सम दुकानातल्या प्लास्टिकच्या छोट्या छोट्या वस्तु भेट म्हणून न देणे. ते समोरच्याकडून न स्वीकारणे हाही एक पर्याय आहे पण तो फार उद्धटपणा वाटेल त्याऐवजी सौम्य शब्दात मी आजकाल प्लास्टिक कमी करतेय असं सांगते म्हणजे होपफुली त्यांना पुढच्या वेळी बोध घेता यावा.
२. सिंगल सर्विंग गोष्टी विशेषतः प्लास्टिकच्या कंटेरनमधून विकत घेतल्या जाणार्^या जमेल तेवढं टाळते. जसं सिंगल सर्विंग सोडा पाणी, पार्टीसाठी लागणारं पाण्याच्या बाटल्या, इ. घेण्यापेक्षा मोठी बाटली, जार वगैरे घेतलं तर बरं.
३. अजून पॉटलक साठी स्वतःचं ताट घेऊन या म्हटलं नाही पण ग्लासेसवर नावं घालायला लावणे आणि मुख्य म्हणजे प्लास्टिक ऐवजी कागदाचे पेले वापरणं म्हणजे निदान थोडा बायोडिग्रेडेबल कचरा होईल.
४. दोन-तीन कुटुंब असतील तर घरचीच ताटं वापरणे.
५. आणखी एक काम मी नेहमी करायचा प्रयत्न करते आणि त्याने कदाचीत मी काही लोकांच्या हेट लिस्टमध्ये गेले असेन ते म्हणजे ज्यांना अजीबात अवेअरनेस नसतो त्यांना रिसायकलिंगसाठी सांगणे. सौम्य भाषेतच पण प्रयत्न करते. समजा दहापैकी एकाला तरी त्याने घरी जाऊन थोडं काही करावं लागलं तरी चालेल.
६. ऑफिसमध्ये चहा/कॉफीसाठी स्वतःचा कप वापरणं आणि पाण्यासाठी स्वतःचा ग्लास. कुणाला ऑफिसमध्ये गिफ्ट द्यायचं असेल तर हेच कॉफी कप वगैरे सजेस्ट करते म्हणजे अनायासे ती व्यक्ती ऑफिसमधे ते वापरू शकेल. (हे स्पेशली इतरवेळी डिस्पोजिबल वापरणारी व्यक्ती असेल तर)
७. माझ्याकडून रिटर्न गिफ्ट्स वगैरे द्यायची वेळ असेल तर बरेचदा मी ग्रोसरी बॅग दिली आहे आणि ती का दिली आहे हेही सांगितलं आहे. मला आश्चर्य वाटतं ते हे की बरेच देशी लोकं पण आम्ही बॅगा विसरतो म्हणून सरळ सांगतात म्हणजे आपल्याकडे तर आपण पिशवी घेऊन बाजारला जाणे करतो तरी, असो. सांगायचं काम करते.
८. आणखी एक आपण जे काही रिसायकलिंग/गो ग्रीन गोष्टी करतो ते आपल्या मुलांना आवर्जून सांगा, मोठ्यांपेक्षा ती लवकर शिकतात. जसं आमच्याकडे विकांताला दुकानात जायचं झालं तर मुलगाही विचारतो आई बॅग्ज घेतल्या का? अजून वरचे दिवे सुरू राहिले तर बंद करायला पुन्हा जायला टंगळमंगळ करतात पण हळुहळु शिकतील. आपणच त्यांच्यासमोर चांगलं उदा. ठेऊ शकलो नाही तर त्यांच्याकडून अपेक्षा करू शकणार नाही.
९. जिथे जिथे फीडबॅक देता येईल तिथे तिथे तो देणे. मी आत्ता एका कॉन्फरंसला गेले होते तिथे सगळा कचरा एकत्र करत होते. कदाचित नंतर मॅन्युअली सॉर्ट करणार असतील कल्पना नाही. पण मुदलात त्यातल्या बर्^याच गोष्टी कमी करता आल्या असत्या. त्यांच्या फीडबॅकमध्ये अदर मध्ये मी हा मुद्दा लिहिला. माझ्याबरोबर आणखी तीन-चार ओळखीची मंडळी होती त्यांनाही ते लिहायला लावले (एकाच्या बोलण्याने काय होणार म्हणून आणि त्यांनाही ते पटले होते म्हणून) हे उदा. मी अशासाठी दिलं की जसं घरगुती प्रमाणावर गो ग्रीन करणं महत्त्वाचं आहे तसंच बिग कॉर्पोरेट्सनी देखील ते करणं महत्वाचं आहे आणि त्यांना ते शक्यही आहे. आपण सामान्य माणूस म्हणून त्यांना सांगितलच नाही तर ते आम्हाला काय करायचं त्याचं म्हणून गप्प बसतील.
१०. अजुनही मला कुठल्याही कॅफेमध्ये साखर्,क्रीमर वगैरेचे छोटे सॅशे ठेवले असतात त्याऐवजी सरळ ओतल्या जाणार्ञा डब्यात किंवा दुसर्^या पर्याय का वापरत नाहीत हा प्रश्न पडतो. त्यामागे हायजेनिकपणाचा मुद्दा असला तरी त्याला फाटे फोडता येतीलच. असो. अमेरिकेला तेवढा विचार करायला अजून वेळ लागेल बहुतेक.

१) कितीही उपासमार झाली तरी शाकाहारी राहतो.

पर्यावरणस्नेही असा शब्द कधी ऐकला नाही. पर्यावरणप्रेमी जास्त योग्य वाटतो.

हापिसात साखर बारक्या पुड्याऐवजी जारमध्ये चमचा ठेवून आणि क्रीमर बारके वापरण्याऐवजी १ लिटर मधून ओतून वापरतात आमच्याकडे.

जिज्ञासा, चांगला धागा पण रार + १. हा धागा फक्त अमेरिकेपुरता न ठेवता सर्वसमावेशक ठेवावा. कारण मी भारतात राहते आणि वरच्या जवळजवळ सगळ्या गोष्टी इथेही लागू होतच आहेत. निदान इथल्या शहरांत तरी. अगदी टॉयलेट पेपर / किचन रोलसकट !

जे पाळतो त्यातले बहुतांशी मुद्दे येऊन गेले आहेत त्यामुळे ते रिपीट करत नाही.

१. आम्ही थंडीत घर थंड ठेवू शकत नाही ( म्हणजे पर्यावरणस्नेहाचा विचार न करता परदेशात भरपूर हीटर वापरला ! ) पण थोडंसं उकडलेलं सहन करु शकतो. त्यातून सुदैवाने भारतातलं घर पश्चिमेचं डायरेक्ट ऊन येत नसल्याने अतिरिक्त तापत नाही त्यामुळे एसी ( कूलिंग ) बसवलेला नाही. परदेशात राहतानाही उन्हाळ्याच्या दिवसांत एसी शक्य तितका कमी वापरला किंवा टेंपरेचर ७६-८० फॅ. च्या मध्ये ठेवून विजेची बचत केली ( म्हणजे बाहेर ८५/९० फॅ च्या वर असताना एवढे तापमान ठेवून एसी, बाहेरचे तापमान ८५ च्या खाली असताना एसी नाही )

२. कामवाल्या बाईला मोठ्ठा वाहता नळ सोडून भांडी घासायची नाहीत असे शिकवले आहे. तसेच बाल्कनीत बादल्याच्या बादल्या पाणी ओतून धुण्यापेक्षा ओल्या फडक्याने पुसून घ्यायला सांगते. मी स्वतःही भांडी घासताना पाण्याची धार शक्य तितकी कमी ठेवते.

३. अन्न वाया जाऊ नये ह्यासाठी खूप जागरुक राहते.

४. ह्यात माझे श्रेय काहीच नाही कारण सोसायटीत ओल्या कचर्‍यापासून खत बनवण्याचा प्लँट आहे आणि त्या खताची विक्रीही केली जाते. त्यामुळे ओला कचरा आणि सुका कचरा असे नियमित विभाजन होते. पुण्यात बर्‍याच सोसायट्यांत होते आता ते.

५. लिफ्टचा वापर जागरुकपणे करते. उतरताना लिफ्ट कधीच वापरत नाही. चढतानाही ३ र्‍या मजल्यापर्यंत शक्यतो वापरत नाही. मागून कुणी येतेय असे वाटले तर घाईत पुढे जाण्यापेक्षा त्यांच्यासाठी दोन मिनिटं थांबते.

रार +१

हे केवळ अमेरिकेपुरते मर्यादित ठेवू नये असे मलाही वाटते. पण अर्थात अमेरिकेतली माणसे असे करताहेत हे बघून बाकीचे (अंध) अनुकरण करतील हे मात्र नक्की Happy

एक रिक्षा
http://www.maayboli.com/node/51270

टेन कमांड्मेंट्स ऑफ एकोफ्रेंडली लिव्हिंग
१. रिसायकलः पुनर्वापर
२. अपसायकलः फेरबदल करुन पुनर्वापर
३. बॉरो: उसने / तात्पुरत्या वापरा साठी इतरांकडून घेणे
४. सॅल्व्हेजः वाया जाणार्‍या वस्तु त्यावर प्रक्रिया / संस्करण करून वापरणे
५. रिपेअरः दुरुस्त करणे
६. डू विदाऊटः च्याशिवाय काम चालवणे
७. बाय सेकंड हँडः इतरांनी वापरलेली वस्तु विकत घेणे
८. क्रिएटः बनवणे
९. स्वॅपः अदलाबदल करणे
१०. ग्रो: पिकवणे / उगवणे (विशेषतः फळे भाजीपाला)

दोन्ही धाग्यांवर उत्तम चर्चा! मागच्या महिन्यात दिलीप व पोर्णिमा कुळकर्णी ह्यांची कार्यशाळा केली तसेच केतकी घाटेच व्याखान ऐकलं ... तिघांनीही हेच मुद्दे मांडलेत.... ४ R' s त्यातला पहिली आर रिफियुज - गरज आहे का किंवा त्याला पर्याय आहे का? .... वर लिहीलेल्या अनेक गोष्टी करते व लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करते ... अर्थात नम्रपणे...

हर्पेन, रिक्षाबद्दल धन्यवाद. वाचते नक्की.
१) मी आत्ता इथे 'क्रीएट' बद्दलच लिहायला आले होते. ह्या 'रीयूझ' प्रकाराने मला स्वतःला क्रीएटीव्हीटीला खूप चालना मिळते.
प्रत्येक गोष्ट वापरून टाकून देण्यापूर्वी ह्यातून काय बनवता येईल असे विचार मनात येत असतात.
ह्याचं एक उदाहरण म्हणजे गेली अनेक वर्ष मी ' टी बॅग्स च्या बॉक्स मधल्या डीव्हायडर्स वर वारली चित्र, डूडल आर्ट किंवा असंच काही ' करून अनेक मित्रमंडळींना, छोट्या दोस्तांना, कलीग्सला भेट देते.
ह्याचं एक उदाहरण हे -

२) शिवाय ज्या मुलांना खेळणी नाहीत किंवा शास्त्रीय उपकरणे सहज उपलब्ध नाहीत, त्यांसाठी साधी, सोपी खेळणी किंवा प्रयोगाची उपकरणे, चार्ट्स बनवणे ह्यात मला रस आहे. अजून म्हणावा तितका वेळ न मिळाल्याने ह्या कामाला फार गती नाहीये, पण होईल एक दिवस. त्यासाठी अने गोष्टी 'रीयूझ' करता येतात, आणी त्या करण्यात मला चॅलेंज वाटतं.

३) इथे सायंटीफीक कॉनफरन्सला गेलं की एक बॅग अशा अनेक बॅग्स साठतात. मी त्या बॅग्स दर भारत ट्रीपला घेऊन जाऊन गरजू मुलांना दप्तर म्हणून देण्याची व्यवस्था करते. आमच्या ओळखीचा एक लेदरवर्क वाला माणूस त्या कॉनफरन्सचं नाव मिटवणारा पॅच त्यावर लावून देतो. माझ्या घरच्यांना / काही मित्रमंडळींना देखील ही आयडीया आवडल्याने अनेक बॅकपॅक्स, कॉनफरन्सला मिळालेल्या बॅग्स, ते पण असेच भारतात लहान मुलांना दप्तर म्हणून देतात.

जिज्ञासा तुम्ही छान धागा सुरु केला आहे, त्याबद्दल धन्यवाद....

पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. मी तिन आर चे तत्व अवलम्बतो प्रथम वापर टाळण्यावर जोर ठेवतो (Reduce), ते शक्य नसेल तर वस्तू पुन्हा पुन्हा कशी वापरता येईल यावर भर देतो (Reuse), सर्वात शेवटी वस्तू मधे आवश्यक बदल करुन पुन्हा वापरता येते का हे बघतो (recycle).

पर्यावरण र्‍हासाला जबाबदार कोण आहे, कुठला देश आहे हा वादाचा मुद्दा असेल पण त्यामुळे होणार्‍या परिणामान्ना सर्वान्नाच सामोरे जावे लागणार आहे. जगामधे सर्वात जास्त नैसर्गिक साधनान्चा वापर हा विकासित देशात होतो. सरासरी कॅनडा-अमेरिकनवासी अविकसित देशवासी पेक्षा ३० पटीने जास्त नैसर्गिक साधने वापरतो. याचे आष्वर्य वाटणे सहाजिक आहे पण मी ज्या भागात रहातो तेथे मागच्या सबन्ध वर्षात सतत ६ महिने तापमान -१० से. कमी होते, पैकी दोन महिने -२५ से पेक्षा कमी. आता -२५ से पासुन +२२ से. पर्यन्त सबन्ध घर गरम करायला ऊर्जा (नैसर्गिक वायू, लाकडे, विज..) खर्च होणारच पर्यावरणाचा र्‍हास आणि विकास या दोन गोष्टी सोबतच जातात. कितीही नाही म्हटले तरी विकासाची किम्मत चुकवावीच लागते. तुम्हाला परवडते म्हणुन तुम्ही घरात AC लावाल पण प्रत्येक मुम्बईकरानी (१.८ कोटी) AC लावला तर बाहेरचे तापमान वाढणारच. विकास म्हणजे रस्ते, डाम्बरीकरण, सिमेन्टीकरण आले आणि या सर्व गोष्टीमुळे पाऊसाचे पाणी मुरायला मिळणारी जमिन कमी होते... परिणामाला सर्वान्नाच सामोरे जावे लागते.

आपण किती काटकसर केली तरी जगाची लोकसन्ख्या ७,३००,०००,००० आहे आणि होणारी वाढ exponential आहे हे लक्षात ठेवायला हवे. उपलब्द साधने, नैसर्गिक स्त्रोत (मग तेल, वायू, पाणी, अन्न, जागा काय वाट्टेल ते असेल) यान्चा साठा मर्यादित स्वरुपात आहे. या दोघान्चाही मेळ घालणे अत्यन्त आवश्यक आहे... हे जोवर शक्य होत नाही तोवर सर्व उपाय (three R`s आणि काटकसर) हे वरवरची मलमपट्टी आहे.

मला न जमलेल्या गोष्टी:
*घरी असले तर शावर चार ते पाच मिनीटात संपतनाही Sad जॉब ला जातअसेल तर पटकन होतो.
*थंडीत नळातून सुरुवातीला येणारे अतिथंड पाणी हिवाळ्यात वाया जाते Sad एका हिवाळ्यात मी ते पाणी साचवून झाडांना/स्वयंपाकात वापरन्याचा प्रयोग केला होता पण फार कटकटीचे होते..
तुमच्यापैकी कोणी यावर काही उपाय शोधला आहे का?

खूप छान धागा आहे. प्रत्येक पोस्ट मधून खूप काही शिकता येण्यासारखे आहे!!

कितीही उपासमार झाली तरी शाकाहारी राहतो.>>> शाकाहार हा environment friendly आहे की नाही ह्यावर बरीच मोठी debate होउ शकते. शेतीसाठी दररोज किती जंगलतोड केली जाते ह्याची कदाचित आपल्याला कल्पना नाही. दरवर्षी एकट्या ब्राझिलियन अ‍ॅमे़झॉन जंगलाचा जवळजवळ लंडन शहराच्या चौपट भाग शेतीसाठी नष्ट होत चालला आहे!!!

१. मी घरात शक्यतोवर हीटर लावत नाही किंवा कमीत कमी लावते गरम कपडे घालते.
२. वॉशिंग मशीन चा ड्रायर संपूर्ण वापरत नाही. ड्रायर मध्ये कपडे अर्धवट वाळवून बाहेर कपडे वाळत घालते.
३. गरज नसताना शॉपिंग करत नाही.
४. अन्न वाया न घालविण्याचा प्रयत्न करते
५. युज बाय डेट उलटून गेली आणि वस्तु खराब झाली नसेल तर बिनधास्त वापरते.

तरीही अजून अशा खूप गोष्टी आहेत ज्या मी बदलू शकते!! हा धागा आणि प्रतिसाद वाचून प्रयत्न करायचे ठरविले आहे.

रारची पहिली पोस्ट +१

माझे २ पैसे:

पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरते. शक्य तेवढं चालत फिरते
ग्रोसरीसाठी कापडी पिशव्या वापरते (युनि. च्या करिअर फेअरला मिळालेल्या आता उपयोगी पडतायत Proud )
घरात एसी अजिबातच वापरत नाही. फारच थंडी असेल तर हीटर वापरला जातो. पण खूप वापर नाही.
अन्न जेवढं हवं तेवढंच शिजवते. अजिबात वाया जाऊ देत नाही.
पाण्याचा काटकसरीने वापर करते. जर एखादं भांडं केवळ विसळून ठेवून चालणार असेल तर घासायचा अट्टाहास करत नाही.
बिलं, रिसीट्स शक्य तेवढ्या ऑनलाईन असतील असं पाहते

शेतीसाठी दररोज किती जंगलतोड केली जाते ह्याची कदाचित आपल्याला कल्पना नाही. >>

शेतीसाठी जंगलतोड फारशी होत नाही जेवढी कत्तल मास मिळवण्यासाठी रोज जगभर होत असते. आणि शेतीसाठी झालेली जंगलतोड पुन्हा हिरवळ निर्माण करते तेंव्हा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

शाकाहार हा environment friendly आहे की नाही ह्यावर बरीच मोठी debate होउ शकते>> डीबेट चा प्रश्नच येत नाही. आपल्याभोवतालची जीवसृष्टीच पर्यावरणाचे समतोल राखते. त्यामुळे मांसाहार मला तरी पर्यावरणाला अत्यंत घातक वाटतो.

सर्वांचे मुद्दे छान आहेत.

इथे जे काही मुद्दे मांडले आहेत त्यापेक्षा अधिक रित्या मला गरीब लोकांकडून पर्यावरणाला मदत होताना जास्त दिसते. माझी बहिण भांडी घासायला चुलीतील राख वापरते. आपण तसे करु शकत नाही. तिच्याकडे गरम पाणी करायला ती झाडाचा पालापाचोळा गोळा करुन वापरते. कोलगेटचे कागदी आवरण, साबनाचे कागदी रॅपर फेकून न देता त्याचाच उपयोग जळणाला करते.

शेतीसाठी जंगलतोड फारशी होत नाही>>> तुम्ही माझे हे वाक्य वाचले नाहीत का? "दरवर्षी एकट्या ब्राझिलियन अ‍ॅमे़झॉन जंगलाचा जवळजवळ लंडन शहराच्या चौपट भाग शेतीसाठी नष्ट होत चालला आहे!!!"

शाकाहारी असण्याबद्दल माझे काहीच म्ह्णणे नाही. तो पर्सनल चॉइस आहे. पण आपल्या food habits चे environmental impacts माहित नकोत का? शिवाय मांसाहार environment friendly आहे असे मी कुठेच म्हटलेले नाही. Environment friendly आहार करायचा असेल तर थाई आणि चायनीज लोकांसारखे insects खावे लागतील. ते तर आपण करत नाही...अगदी मांसाहारी असलो तरीही.

२. कामवाल्या बाईला मोठ्ठा वाहता नळ सोडून भांडी घासायची नाहीत असे शिकवले आहे >> हे शिकवून आणि सांगून दमले. आडून आडून कसा पाण्याचा प्रॉब्लेम होतो वगैरे सांगत असते, थोडा फरक पडला आहे.

एकदा मी भांडी घासत होते तर पोळीवाल्या बाईंच्या लक्षात आलं की किती कमी पाण्यात कामं होतयं - ह्यावरून बोध घेतला का कळायला मार्ग नाही.

पुण्यात आमच्या इथे इ-वेस्ट कलेक्ट करणारे महीन्याच्या पहील्या रविवारी येतातं. कोणाला काही द्यायचं असेल तर पुढचं शेड्युल बघून वेळ सांगेनं.

#माझ्या हातून तेवढा एक शाकाहार सोडला तर पर्यावरण स्वास्थ्य राखण्यासाठी इतर कुठेच मदत होत नाही!!

#इथे सुपरमार्केट मधे गेलो की अनेक प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात. मला त्या हव्या असतात जेणेकरुन घरचा कचरा डम्प करायला मला त्याच पिशव्या वापरता येतात.

#दर आठड्याला एक दुधाची बाटली आणतो ती बाटली मी वापरत नाही तर फेकून देतो. फक्त एकच की ती फेकताना ती रिसायकल होईल ह्याची काळजी घेतो. पण रिसायकल वाले नक्की काय प्रोसेस करतात. त्यांच्या हाती ही बाटली लागते का माहिती नाही.

#कपडे घेणे माझे सुरुच असते. वर्षातून एक दोन वेळा तर मी एखाद दोन टी शर्त वा फुलपॅन्ट घेतो.

#मी एका कागदावर एकच पान प्रिन्ट करतो. मला फार बारीक अक्षर दिसत नाहीत.

...माझ्या हातून तेवढा एक शाकाहार सोडला तर पर्यावरण स्वास्थ्य राखण्यासाठी इतर कुठेच मदत होत नाही.

मायबोलिवर कमीच लिहितो. विनोद मुद्दाम टाळतो. कॉपी पेस्ट सहसा करत नाही. जे धागे वाहते नाहीत तिथे लिहित नाही. इथे पण विचार हाच असतो की माबोचे सर्वर फार जागा व्यापू नये.

माझ्या काही additions:
१. शक्य तितक्या यूज्ड वस्तूच वापरतो.माझ्या घरातलं जवळजवळ सर्व फर्निचर हे युज्ड आहे. क्रेग्जलिस्ट झिंदाबाद.
२. बागेत (backyard) लॉन नाही. फक्त नेटीव झाडेच लावली आहेत. त्यामुळे त्याना पाणी घालावे लागत नाही. जितका पाउस पडतो आणि हवेत जितकी आर्द्रता असते (बे एरियात बे जवळ बऱ्यापैकी असते) तेव्हढी पुरते. थोड्या भाज्या लावल्या आहेत. त्याना स्वयंपाकघरातले वापरलेले पाणी घालतो.
३. दुकानातून भाज्या घेताना जी वेगळी (transparent) पिशवी जनरली घेतात ती वापरत नाही. वापरायची असेल तर घरूनच त्यासाठी वेगळ्या छोट्या पिशव्या घेऊन जातो. लोकली प्रोद्यूस्ड ओर्गनिक भाज्या / फळे / अंडी / दूध वापरतो. महिन्याला ३०-४० डॉलर जास्तीचे लागतात.
४. कामासाठी air travel बऱ्यापैकी होतो. दर वर्षी tax deadline ला सर्व एमिशन्स ऑफसेट करतो.
५. हीटर कमीत कमी वापरतो. घरात जर अजून एक लेयर घातला तर बे एरियात पुरतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा एका खोलीपुरता स्पेस हिटर वापरतो म्हणजे सगळं घर हिट करावं लागत नाही.
६. हे जरा ग्रोस वाटेल, पण घरी पाहुणे येणार नसतील त्यावेळी फ्लश चा वापर कमी करतो. एका फ्लश साठी साधारण ३-४ gallons (१२-१५ लिटर) पाणी वापरले जाते. When it's yellow it's still mellow; when it's brown flush it down.

ब्राझिलियन अ‍ॅमे़झॉनचा विषय निघाला म्हणून: यातील सर्व जंगलतोड फक्त शेतीकरिता होत नाही. त्याला animal harvesting, लंबर हार्वेस्टिंग, बायोफ्युएल इ. बरीच कारणे आहेत.
पण शाकाहार = environmentally friendly हे दर वेळेस खरे असतेच असे नाही याला सहमती.

ब्राझिलियन अ‍ॅमे़झॉनचा विषय निघाला म्हणून: यातील सर्व जंगलतोड फक्त शेतीकरिता होत नाही. त्याला animal harvesting, लंबर हार्वेस्टिंग, बायोफ्युएल इ. बरीच कारणे आहेत. >>> हे माहित नव्हते. मी कुठेतरी वाचले होते की शेतीकरता deforestation होते. शोधून लिंक पोस्ट करायचा प्रयत्न करेन. महितीबद्दल धन्यवाद.

पण शाकाहार = environmentally friendly हे दर वेळेस खरे असतेच असे नाही याला सहमती.>>निकित, माझीही सहमती आहे ह्या वाक्याला. पण मासाहाराशी जर तुलना केली तर शाकाहार हा पर्यावरणाशी जास्त मैत्रीपुर्वक आहार वाटतो मला.

सुमुक्ता, थाई आणि चिनी लोक किटक खातात पण ते इतर अनेक जीव सुद्धा खातात. आणि किटक खाणारी व्यक्ती पर्यावरणप्रेमी हे कळले नाही.

मी शाकाहारी नाही पण तरी शाकाहारासाठी जंगलं तुटतात हा मुद्दा मला कळला नाही. सुमुक्ता आणि निकीत, तुम्ही पूर्ण माहितीनिशीच लिहिलं असणार त्यामुळे माझा प्रश्न मूर्खपणाचा वाटू शकतो. पण वरवर विचार करता फळं, फळभाज्या, भाज्या खाताना झाड मारावं लागत नाही. धान्यं दरवर्षी नव्याने त्याच जागेत पेरतात मग जंगलं कशी तुटतील ते लक्षात आलं नाही.

किटक खाणारी व्यक्ती पर्यावरणप्रेमी हे कळले नाही. >>> मांसाहारी लोकांमुळे जो कचरा निर्माण होते (हाडे, अनेक न खाता येण्याजोगे अवयव हे सगळे टाकून दिले जाते. किटक खाल्यामुळे हा कचरा निर्माण होत नाही. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे मांसाहारासाठी गायी, कोंबड्या, मेंढ्या ह्यांचे पालन पर्यावरणावर अधिकाधिक ताण आणणार आहे. किटकांचे farming ह्या प्राण्यांपेक्षा अधिक sustainably करता येउ शकते. ही लिंक वाचा. इथे बरीच माहिती दिलेली आहे. http://www.bbc.com/future/story/20141014-time-to-put-bugs-on-the-menu

मी शाकाहारी नाही पण तरी शाकाहारासाठी जंगलं तुटतात हा मुद्दा मला कळला नाही.>>

अगो, माझ्यामते जिथे जंगल आहे त्या जंगलात जर खाता येतील अशी फळ वा भाज्या नसतील तर ते जंगल हटवून तिथे हवी ती फळझाड पालेभाज्या लावता येईल म्हणून जंगलतोड!!! ह्याच अर्थाने मी वर लिहिले आहे की आहे ती हिरवळ नष्ट करुन परत इथे जर हिरवळच उभी राहणार असेल तर ह्या जंगलतोडीकडे सकारात्मक दृष्ट्या बघता येईल.

अगो वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्न पुरविण्यासाठी नविन शेतजमिनिची गरज भासणार नाही का??? आहे तेवढ्यात कसे भागेल??

ती हिरवळ नष्ट करुन परत इथे जर हिरवळच उभी राहणार असेल तर ह्या जंगलतोडीकडे सकारात्मक दृष्ट्या बघता येईल.>>> जंगलतोडीमुळे eco-systems नष्ट होत आहेत. अनेक species extinct होत आहेत. नुसती हिरवळ महत्वाची नाही.

Pages