कातीलच्या एका फारसी गज़लेचा भावानुवाद सादर करतो आहे. मूळ संकल्पना मराठी संस्कृतीला साजेशा करताना भावार्थ जपण्याचा प्रयत्न आहे. तसंच कातीलच्या गजलेत जे आशयघनता असलेले शब्द आहेत तेच मराठीत आणण्याचा प्रयत्न कृत्रिम झाला असता. म्हणून शब्दसंख्या भरमसाठ वाढवण्यापेक्षा काही शब्द अध्याहृत ठेवलेले आहेत. मूळ गज़ल, भावानुवाद करण्याची प्रेरणा व त्यासाठीचा अर्थ जयंत कुलर्णींच्या या लेखातून मिळाले.
खास बहाणा
नजरशरांनी मारुन, म्हणशी "दोष यमाचा", खास बहाणा!
दुर्लक्षाने मारुन करशी जनलज्जेचा खास बहाणा
३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. तसेच, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगातील भाषांतर व्यवसायाची वाढती मागणी व महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार या व्यवसायास सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे हादेखील यामागील एक विचार आहे.
नमस्कार!! मी नुकतीच जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे. ईथे कुणी जर्मन शिकले असल्यास त्यांच्याकडून मार्गदर्शन हवे आहे.अभ्यासासाठी कुणी जाणकार साइट्स सुचवू शकेल का?? आंतरजालावरिल मुक्त शब्द्कोश, इतर उपयुक्त साईट्स, इपुस्तके वगैरे बद्दल माहिती हवी आहे. अनुवादक असल्यामुळे भाषांतर, व्याकरणात मदत व्हावी अशा साहित्याची अपेक्शा आहे.
धन्यवाद!!