ह्या मराठी वाक्यांचे इंग्रजी भाषांतर काय होईल?

Submitted by स्वान्तसुखाय on 20 September, 2020 - 09:52

मराठी मध्ये "जास्त प्रेम दाखवणे" याला "लाडात येणे" असे संबोधले जाते. "लाडात येणे" या वाक्प्रचाराला इंग्रजी मध्ये समर्पक अशी एखादी फ्रेज आहे का?

१. मालकाला पाहिल्याबरोबर कुत्रा लाडात आला.
२. मिनू लाडात येऊन म्हणाली , "बाबा मला अजून एक चॉकलेट दे ना."
३. आजी चिडून ओरडली, "जास्त लाडात येऊ नका."

या वाक्यांचे योग्य इंग्रजी भाषांतर काय होईल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ingratiate हा त्यासाठी जवळपासचा शब्द वाटतो:

1. Dog ingratiate itself with owner as soon as he saw them
2. Minu ingratiate herself with her father and said, "Baba give me one more chocolate, please"
3. Granny irritated and shouted "Don't try to ingratiate with me"

Google meaning

to make yourself liked by doing or saying things that will please people, especially people who might be useful to you.
तुम्हाला उपयोगी पडू शकतील अशा लोकांना आवडेल असे काही करून किंवा बोलून त्यांच्या नजरेत भरणे किंवा त्यांच्यावर छाप पाडणे, मर्जी संपादन करणे, पोटात शिरणे; आपलेसे करणे, लाळघोटेपणा करणे, पुढेपुढे करणे, लघळपणा करणे.

फार classic English येत नाही पण, लाडात येणे =
cozy up ( to someone)
do tricks / play tricks / try tricks
(being) cupboard love ---- (Source: https://www.theidioms.com/cupboard-love/ ) --- हा बहुतेक तुम्ही दिलेल्या तीनही वाक्यांना चालेल,

यापैकी काही चालतेय का बघा.
माणूस-प्राणी, माणूस-माणूस नाते याप्रमाणे लाडात येण्याचे अर्थ बदलतील आणि शब्द पण.