आरोग्य

स्तनांचा कर्करोग -oncologist सुचवा

Submitted by मृदगंधा on 15 June, 2023 - 10:32

मी मायबोली वर १०-११ वर्षांपासून वाचक आहे. मायबोली वरील कितीतरी लेखक माझ्या आवडीचे आहेत. Dr. खरे, Dr. कुमार यांचे अभ्यासपूर्ण लेखन मी आवडीने वाचते पण कधी सदस्याखाते काढून लिखाण मी नाही केले.
आज प्रसंगाने मला मायबोलीकरांच्या मदतीची नितांत गरज आहे. माझ्या आईला स्तनाचा कर्करोग स्टेज २ झाला आहे. स्तनाचा कर्करोगामध्ये मध्ये surgery madhe speciality असलेले doctor व केमोथेरपी करता उत्तम doctor शोधतांना खूप गोंधळ उडतोय.
कर्करोगाच्या नावानेच घराचे सगळे घाबरून गेलेत व योग्य निर्णय घेणे कठीण होतंय.

एक मुलायम स्पर्शक (२)

Submitted by कुमार१ on 4 June, 2023 - 19:56

पूर्वार्ध इथे: https://www.maayboli.com/node/83490
…………………………………………..
उत्तरार्ध

पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत:

१. गर्भनिरोधनातील यशापयश
२. गुप्तरोगांपासून संरक्षण
३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या
४. विल्हेवाट आणि पर्यावरण

विषय: 
शब्दखुणा: 

नवी सुरूवात, नवा प्रवास!

Submitted by अज्ञातवासी on 2 June, 2023 - 03:24

वेल, मायबोली वरचा माझा मागचा धागा... आणि आज अल्मोस्ट झालेला महिना.
खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केलं, मानसिक आधार दिला, त्याची भरपाई नाही करू शकत...
माझी एक मैत्रीण मला कायम म्हणते...
तू खूप अवघड आहेस.
वेल, हे काही अंशी खरं आहे.
मी अवघड आहे, आणि अती महत्वाकांक्षी सुद्धा...
मी प्रयत्न करतो, करतच राहतो... आणि अजिबात प्रयत्न सोडत नाही...
आणि त्या प्रयत्नांनीच बऱ्याचदा घात होतो...
पण एक आहे, घात झाला तरी चालेल, पण प्रयत्न करणं सोडायचं नसतं...
सो...
आज अजून काहीतरी सांगतो...
एक महिना झाला, मी धागा काढून... आणि आज काही बदललं आहे?

अचानक वाटू लागलेली विमानप्रवासाची भीती

Submitted by sneha1 on 28 May, 2023 - 11:50

तसा विमानप्रवास मला फारसा आवडत नाही, कारण मला उलट्या होतात. पण त्याची भीती अशी कधी वाटली नाही. भारताबाहेर राहत असल्याने कधीच विमानप्रवास केला नाही असे पण नाही. पण तीन वर्षांपूर्वी बीचला जायचे म्हणून विमानाने गेलो, आणि दोन तासाच्या प्रवासामधे कोण जाणे खूप भीती वाटली. नंतर कोव्हीड मुळे कुठे जाणे झालेच नाही विमानाने. आणि आता विमानाने पुन्हा जाण्याची खूप भीती वाटते आहे, मी टाळायलाच बघते आहे. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की असे होते कधी कधी, आणि anxiety ची गोळी तेव्हा घ्यायला सांगितली.

दोघांत 'तिसरा' : एक मुलायम स्पर्शक

Submitted by कुमार१ on 23 May, 2023 - 19:52

स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो. या प्रकारची साधने पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

condom 1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

रक्तात गाठ DVT बद्दल nonmedical माहिती पाहिजे

Submitted by स्वरुपसुमित on 20 May, 2023 - 02:41

नमस्कार
अस्मादिकांना dvt नावाचा आजार आहे
माबोवर श्री सुरेश शिंदे यांचे पण ह्यावर २-३ लेख आले आहेत
रक्तात गाठ असल्याने केव्हा पण हृदय घात होऊ शकतो
पण मला दिव्यांग मध्ये ह्याचा अंतर्भाव करत येईल का कोणी सांगू शकेल ? कारण २९ वय असतानाच मी २ वेळा icu मध्ये गेलो होतो
अमेरिकेत बहुतेक ह्याचा दिव्यांग
मध्ये गणना होते https://www.disabilitylawfirmnc.com/disability-benefits-for-deep-vein-th...

रामराम घ्यावा!

Submitted by अज्ञातवासी on 6 May, 2023 - 03:16

गेले कित्येक दिवस मी लिहितोय. लीहीतच राहतोय.
बऱ्याच कथा बाकी आहेत...
गेले वर्षभर मी आजारी होतो, आता वाटलं ठणठणीत बरा होतोय तर जीवघेणं दुखणं पाठीमागे लागलंय.
यातून बरा होईन का नाही, माहिती नाही... सावरेन का नाही माहिती नाही, जगेन की नाही तेही माहिती नाही.
निराशा नाही, हताशा म्हणू शकतो, काहीतरी खूप सुंदर गमावल्याची...
जे गमावलं ते कधीही परत येणार नाही,
आता राख झालो आहेच, तर स्वतःच स्वतःला विचारतोय... की फिनिक्स होईन की वाहून जाईन...
जस्ट, कथा अपूर्ण ठेवायच्या नाहीयेत, कारण हे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत...

विषय: 

सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)

Submitted by मार्गी on 12 April, 2023 - 10:36

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)

Submitted by मार्गी on 4 April, 2023 - 09:28

Pages

Subscribe to RSS - आरोग्य