रामराम घ्यावा!

Submitted by अज्ञातवासी on 6 May, 2023 - 03:16

गेले कित्येक दिवस मी लिहितोय. लीहीतच राहतोय.
बऱ्याच कथा बाकी आहेत...
गेले वर्षभर मी आजारी होतो, आता वाटलं ठणठणीत बरा होतोय तर जीवघेणं दुखणं पाठीमागे लागलंय.
यातून बरा होईन का नाही, माहिती नाही... सावरेन का नाही माहिती नाही, जगेन की नाही तेही माहिती नाही.
निराशा नाही, हताशा म्हणू शकतो, काहीतरी खूप सुंदर गमावल्याची...
जे गमावलं ते कधीही परत येणार नाही,
आता राख झालो आहेच, तर स्वतःच स्वतःला विचारतोय... की फिनिक्स होईन की वाहून जाईन...
जस्ट, कथा अपूर्ण ठेवायच्या नाहीयेत, कारण हे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत...
पण सध्या तरी, स्वतःवर लक्ष द्यायचं आहे. स्वतःच स्वतःला ओळखायचं आहे.
सो, हा ब्रेक समजा नाहीतर निरोप.
क्षमस्व...

अवांतर : हे इथे धाग्याच्या हेडर मध्ये लिहितोय, कारण नाईलाज आहे. Admin ला मी चार वेळा विनंती करूनही माझ्या कथेचे भाग उडवले नाहीत. ( .) असलेले. प्लीज, माझी मानसिक अवस्था खरच ठीक नाही, त्यात हे नको.
कृपया इथल्या कुणा आयडीचा admin शी सरळ संपर्क असल्यास एवढं करा प्लीज... _/\_

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञातवासी जी
प्रथम आपण आपल्या प्रकृती ची काळजी घ्यावी, देव करो आपण लवकरात लवकर आजारातून बरे होवो.
बाकी आपले लिखाण एक प्रकारची नशाच आहे.
आपल्या लेखनाची आतुरतेने वाट पाहणारा .... एक वाचक .

यातून बरा होईन का नाही, माहिती नाही... सावरेन का नाही माहिती नाही, जगेन की नाही तेही माहिती नाही.>>> अरे यार मरे तुम्हारे दुश्मन! चांंगल्या डॉक्टरकडे जा. आणि ठणठणीत व्हा. कथेचे टेन्शन नका घेऊ. आधी प्रकृति, कथा नंतर.

छान लिहिता तुंम्ही... निराशावादी विचार मनातुन काढुन टाका अन चांगल्या उपचारांनी बरे व्हा...

सर तुम्ही नक्की बरे व्हाल. Positive रहा. काही आमच्या कुणाकडून मदत होवू शकत असेल तर जरूर सांगा.
इथे शक्य नसेल तर व्यनी करून सांगा, पण निरोपाची भाषा नकोच.

शो मस्ट गो ऑन! Happy
लिहीण्यातून आनंद मिळत असेल तर जमेल तसे नक्की लिहा.
पण ब्रेक घेणे गरजेचे वाटत असेल तर स्वल्पविराम जरूर द्या.
सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा. Happy

पण निरोपाची भाषा नकोच.>> खरच ही पोस्ट डिलीट करा, शीर्षक बदला आणि एक मस्त पॉझीटीव्ह पोस्ट लिहा.
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा!

सगळ्यांना धन्यवाद!

मी नेहमी म्हणत असतो, बघुयात काय होतं ते...
यावेळीही बघुयात काय होतं ते... महादेवाला मंजूर असेलं ते होईल...
परत आलो तर नक्कीच लिहीन...
पुन्हा एकदा धन्यवाद!

_/\_

सर्वांना खूप खूप धन्यवाद...
मदत म्हणायला, फक्त खूप वर्षांपासून एकटा राहतोय, त्यामुळे कुणाजवळ सोबत मनसोक्त रडायला मिळालं तर खूप छान होईल... Lol

सर तुम्ही ज्या कल्लोळातून जात आहात तो मला समजतो आहे.
ये भी दिन जायेंगे.
पुन्हा वसंत ॠतू येईल. पुन्हा पालवी फुटेल. पुन्हा फुले फुलतील.
माझ्या सदिच्छा.

ह्यातून लवकर बरे व्हा. आधी आय डी बदला.. उपवनवासी वगैरे घ्या. सगळी हताशा, विमनस्कता पिटाळून लावा.
आम्हां सर्वांना शुभेच्छा आहेतच तुमच्यासोबत.

Health First!
काळजी घ्या अज्ञातवासी. मानस, मोक्ष आणि तुमच्या इतर मानसपुत्रांसाठी तुम्हाला ठणठणीत व्हावं लागेल. लवकर बरे व्हा, शुभेच्छा.

मदत म्हणायला, फक्त खूप वर्षांपासून एकटा राहतोय, त्यामुळे कुणाजवळ सोबत मनसोक्त रडायला मिळालं तर खूप छान होईल... Lol
>>> अनुपम मित्तलचे एक ऍप आहे ते वापरून पहा
------------------

हेल्थ संबधी काही असेल तर संपर्क साधू शकता. त्याच क्षेत्रात कार्यरत असल्याने नक्कीच मदत करू शकेन.

स्वतःवर लक्ष ध्या...
लवकर बरे व्हा...
लवकर पुन्हा लिहा...आम्ही वाट बघतो.
अनेकानेक शुभेच्छा....

अहो काय हे असं?

इतका जबरदस्त माणूस आणि हे असं टोकाचं का बोलतोय. आज एक एप्रिल नाहीये की.
प्रकृती बिघडली आहे , ते होईल की नीट.
काळजी नको.
लवकर बरे व्हा.
काही मदत लागल्यास माबोवर बिनधास्त लिहा. मिळेलच.

तब्येतीचे कारण असेल तर इथे असणार्‍या त्या क्षेत्रातल्या जाणकारांना संपर्क करावा. नक्कीच मदत मिळेल. चार लोकांचा सल्ला उपयोगी पडेल.
असा धागा काढायची वेळ यावी हे दुर्दैवी आहे. गंभीर आजार हे खरंच सर्वांची कसोटी पाहणारे कारण आहे. कुणीतरी तुमचा पत्ता दिला तर जमेल तशी मदत व्हावी ही इच्छा आहे. नाहीतर गिल्ट राहील.

अन्य काही कारण असेल तर प्रांजळपणे सांगा. मन हलके होईल.
क्रिएटिव्ह लोकांच्या रचनांकडे दुर्लक्ष झाले तर अस्वस्थता येते. त्यातून बाहेर पडणे शिकले पाहीजे.
ब्रेकचा निर्णय तुमच्या पथ्यावर पडो. लिखाणामुळे वाचनाला वेळ मिळाला नसेल तर या ब्रेकमधे भरपूर वाचन करा.
शक्य झाल्यास हवापालट करा. छान छान ठिकाणांना भेटी द्या.
मित्र बनवा. सोशल गॅदरिंगमधे सहभागी व्हा.

गेले कित्येक महीने एकच धाग्याचं मटेरिअल लिहायचा प्रयत्न करतोय, पण ते संपेचना. त्यामुळे सातत्याने लिहीत राहणे , एकाच वेळी वेगवेगळ्या कथा आणि त्यांचे भाग पूर्ण करत पोस्ट करणे किती अवघड आहे याची पूर्ण कल्पना आहे. जमल्यास कमी कथा लिहा.
स्वतःसाठी वेळ द्या.
मनापासूनचे सांगणे आहे. बरे व्हा लवकर.
शुभेच्छा !

ता.क : साहेबांनी (ना)राजीनामा मागे घेतला , तेव्हां तुम्ही त्यांचे अनुकरण कराल ही अपेक्षा Light 1

१) शेवटची कथा मालिका खोडली आहे आणि कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा.. ते ठीक आहे. पण जुन्या कथा खोडू नका ही विनंती.

२) प्रोफाईलला एक छान फोटो टाका बघू.
३)एकटेपणाला औषध नाही. ओके.
४) डॉक्टरकडे जाऊ नका. काही उपयोग होत नाही.
५)हवापालट करा असं सुचवणार होतो पण तुम्ही नाशिकमध्येच चांगल्या हवामानात आहात.
६)नाशिकमध्ये कुणा मायबोलीकरांस भेटायला बोलवा. बरेच आहेत. रीले करून भेटत राहतील. तुमची इच्छा असल्यास संपर्क संवाद गुप्त ठेवू. (लेखात मांडणार नाही.)
इथे संवाद साधलाय ते फार आवडले.

सुदृढ आरोग्यासाठी खुप खुप शुभेच्छा>>+१
बाकीही वरील अनेक भावनांशी सहमत.
कधी कधी फोन वर पाचेक मिनिटे गप्पा मारल्या की बरं वाटतं.

Pages