भाग २ : https://www.maayboli.com/node/84250
.. .. ..
हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत :
1. नाडी तपासणी
2. रक्तदाब मोजणी
3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी
4. इसीजी तपासणी
सन 2018 मध्ये मी आपल्या संस्थळावर “ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’वर शिक्कामोर्तब“ हा लेख लिहिला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती( https://www.maayboli.com/node/65025). त्यानंतर ऑगस्ट 2023मध्ये ध्यानीमनी नसताना मायबोलीकर पुरंदरे शशांक यांनी स्वतःच्या हार्ट अटॅकसंबंधी इथे(https://www.maayboli.com/node/83838#new)अनुभवकथन केले. त्यात त्यांनी ट्रोपोनिनच्या त्या लेखाचा जीवरक्षक म्हणून उपयोग झाल्याचे नमूद केलेले आहे.
संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा वाटा मोठा आहे. यापैकी काही आजार विविध प्राण्यांकडून माणसात संक्रमित होतात. अशा आजारांपैकी एक प्राणघातक आजार म्हणजे ‘निपा’(Nipah) विषाणूचा आजार. विसावे शतक संपण्याच्या सुमारास हा आजार मलेशियातील Sungai Nipah या खेड्यात प्रथम आढळल्याने त्या गावाचे नाव त्याला देण्यात आले आहे.
रोगाचा जागतिक इतिहास
यंदाच्या जून महिन्यापासून एल-निनो या वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा तापमानवाढ होताना दिसते. अद्यापही एल-निनोचा हा प्रभाव टिकून आहे. वातावरणातील या महत्त्वाच्या बदलाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत आणि अजूनही होऊ शकतील.
आराध्या शिंदे ही एक वर्षाची मुलगी मुंबई ला नायर हॉस्पिटल मध्ये admit आहे.तिचे उद्या ऑपरेशन असून तिला A Negative blood ची गरज आहे.तिथे जवळपास कुठे उपलब्ध होऊ शकते ?
कुणाला काही माहिती असेल तर please सांगा.
संपर्क क्रमांक देविदास शिंदे +91 83298 03729
मानवी शरीरात स्रवणाऱ्या अनेक रसायनांमध्ये हॉर्मोन्सचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सूक्ष्म प्रमाणात स्त्रवणारी हॉर्मोन्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या यंत्रणा एखाद्या चमत्काराप्रमाणे नियंत्रित करतात. आपल्या शरीरात जवळपास ६० हार्मोन्स विविध अवयवांत कार्यरत आहेत. त्यापैकी इन्सुलिन, थायरॉईड आणि ॲड्रीनल ग्रंथींच्या दमदार हार्मोन्सचा परिचय वाचकांना यापूर्वी करून दिलेला आहे.
डाॅक्टरांनाही चकवा देणारा माझा ह्रदयरोग !!
नुकताच मी हार्ट अॅटॅकमधून केवळ सुदैवाने बाहेर पडलो. अतिशय अभ्यासपूर्ण वैद्यकीय लेख लिहून सर्वसामान्यांमधे वैद्यकीय माहितीचे उत्तम प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध असे मायबोलीकर डाॅ.कुमार1 यांचा ट्रोपोनिन हा लेखच या अॅटॅकमधून बाहेर पडण्याकरता कारण ठरलेला होता.
मला ह्रदयरोगाचा जो अचानकच त्रास झाला त्यासंबंधी काही माहितीवजा लेख लिहित आहे. हा त्रास सगळ्याच हार्ट अॅटॅकवाल्यांना होत असतो का नसतो हे मला माहित नाही, पण केवळ एक केस स्टडी म्हणून वाचकांनी याकडे पहावे ही विनंती.