स्तनांचा कर्करोग -oncologist सुचवा

Submitted by मृदगंधा on 15 June, 2023 - 10:32

मी मायबोली वर १०-११ वर्षांपासून वाचक आहे. मायबोली वरील कितीतरी लेखक माझ्या आवडीचे आहेत. Dr. खरे, Dr. कुमार यांचे अभ्यासपूर्ण लेखन मी आवडीने वाचते पण कधी सदस्याखाते काढून लिखाण मी नाही केले.
आज प्रसंगाने मला मायबोलीकरांच्या मदतीची नितांत गरज आहे. माझ्या आईला स्तनाचा कर्करोग स्टेज २ झाला आहे. स्तनाचा कर्करोगामध्ये मध्ये surgery madhe speciality असलेले doctor व केमोथेरपी करता उत्तम doctor शोधतांना खूप गोंधळ उडतोय.
कर्करोगाच्या नावानेच घराचे सगळे घाबरून गेलेत व योग्य निर्णय घेणे कठीण होतंय.
मला आईची Treatment मुंबई, ठाणे किंवा पुणे ला करायचीय. राहण्याची जास्त चांगली सोय ठाण्याला किंवा पुणे ला होऊ शकेल पण जिथे best treatment milel tithe राहायची तयारी आहे.
कुपया चांगले oncologist सुचवा.

Group content visibility: 
Use group defaults

पुण्यात सर्जरी करायची असेल तर डॉ. शेखर कुलकर्णी
Oncologist - डॉ. अनुराधा सोवनी
अगोदर डॉ. सोवनी यांना भेटणे इष्ट.
क्लिनिक नळ स्टॉप येथे आहे.

Oncologist - डॉ. अनुराधा सोवनी
अगोदर डॉ. सोवनी यांना भेटणे इष्ट.
क्लिनिक नळ स्टॉप येथे आहे.

+1

एका मैत्रिणीकडून पण चांगला अनुभव ऐकला आहे. तिच्या बहिणीवर त्यांनी उपचार केले होते.

आमच्या नातेवाईकास पंधरा दिवसांपूर्वी निदान झालं. तिसऱ्या स्टेजचं. दीनानाथ पुणे येथे ट्रीटमेंट सुरू झाली आहे.
अगोदरची एक नातेवाईक पुण्यात डॉ सतीश पांडे(सह्याद्रीतले पक्षी पुस्तकवाले)यांचेकडे ट्रीटमेंट घेतलेली. तिसरी एक तिथेच ओपरेशन केलेली तिला दहा वर्षे झाली. चांगली तब्येत आहे.
यावरून समजते की ट्रीटमेंट एकच असावी. थोडी मनाने आशावादी आनंदी वृत्ती ठेवणे एवढेच आपल्या आणि आजाऱ्याच्या हातात असते.
तुमच्या आईला बरे वाटेल. विश्वासाने एकाच डॉक्टरकडे जावे. धरसोड,चिंता,शंका ठेवू नका.

प्रतिसाद दिल्या करता सगळ्यांचे मनापासून आभार. आपले सर्व सल्ले खूप उपयोगी आहेत. योग्य Dr. निवडणे खरोखर खूप महत्त्वाचे आहे. पुढची surgery , treatment ची दिशा योग्य असणे हे सगळे त्यावर अवलंबून आहे.

Dr. अनुराधा सोवनी यांची appointment घेणार आहे.
अजून १-२ opinion मुंबई मध्ये देखील घ्यायचे आहेत. कृपया मुंबई /ठाणे मधील Dr. देखील सुचवा.

आपल्या लाडक्या अमा म्हंजे अश्विनी मावशी यांना संपर्क करा जमल्यास. खंबीर मन असेल तर निभावून नेता येते.
मी स्वतः चौथा स्टेज कॅन्सर पेशंट होतो आणि आता उत्तम आहे.
तुम्हाला शुभेच्छा, खंबीर रहा.

टाटा कॅन्सर हॉस्पिटल बघाल का ? पुण्यात डाॅक्टर अनुप ताम्हणकर आहेत ते दिनानाथ ,रूबी अन टाटा ईथे ऊपचार देतात. खाजगी दवाखाना मेहेंदळे गॅरेज समोर आहे. नोव्हो क्लिनिक

Hi please try to visit Dr Jay Anam for surgery and Dr Vasishta Maniyar at Mumbai Onco care centre. Ghatkopar or Thane.

मुंबई ऑन्को केअर ठाणे व घाटकोपर येथे आहे. तिथे संपर्क करा
https://www.practo.com/thane/clinic/mumbai-oncocare-centre-thane-west

घाटकोपर चे सेंटर पण चांगले आहे. सर्वोदय हॉस्पिटलच्या पुढे तीन सिग्नल घाटकोपर इस्ट मध्ये आहे
https://www.practo.com/mumbai/clinic/maniar-oncocare-centre-ghatkopar-east
इथे डॉ. वशिस्ठ मणियार व डॉ. उदीप महेश्वरी पण आहेत.

मुंबई ऑनकोकेअर मध्ये होम केअर सर्विस पण उपलब्ध आहे. म्हणजे जे महिन्यातून एक इंजेक्षन किंवा इन्फ्युजन/ किमो घ्यायची ती घरीच येउन देतत. कारण सेंटर मध्ये नेहमीच खूपच गर्दी असते व वेळ लागू शकतो. अपॉइंट में ट मिळाली त्या पुढे दोन तीन तासांनी डॉ. भेटतात.

घाटकोपर सेंटर च्या वरच सहाव्या मजल्यावर डॉ. जय अनाम ह्यांचे सुपर स्पेशालिटी क्लिनिक आहे. व ते उत्तम सर्जन आहेत. ब्रे. कॅ. च्या बाबतीत.
ट्रीटमेंट लाइन कन्फर्म करायला करेक्ट ऑन्कोलॉजिस्टला भेटा. त्याने फार फरक पडेल. बायोप्सी झाली का? पेट स्कॅन झाला का? त्या अनुसारपुढे जा. बेस्ट लक.

फेसबुक वर कॅन्सर सर्वायवर्स ऑफ इंडिया व ब्रेस्ट कॅन्सर सर्वाय्वर्स सपोर्ट गृप आहेत. स्टेज फोर वाल्यांसाठी एक क्लोज्ड ग्रुप पण आहे. तुमच्या आईंसाठी योग्य तो गृप निवडा.

Sharadg,

मला याविषयी अजून माहिती मिळू शकेल का? माझ्या वडिलांना ऑगस्ट २०२२ मध्ये चौथ्या स्टेजच्या फुफ्फुसांच्या कॅन्सरचे निदान झाले. अमांनी जे सजेस्ट केलेय त्या मुंबई ऑन्को केअरच्या बोरिवली सेंटरमध्ये डॉ. आशिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ट्रीटमेंट सुरु केली. किमोथेरपीच्या ९ सायकल्स झाल्या. त्यात त्यांना प्रचंड त्रास झाला.

मग फेब्रुवारीपासून त्यांची मेंटेनन्स थेरपी चालू केली. ज्यात दर २१ दिवसांनी एक इंजेक्शन (Bevacizumab) दिले जाते. यानंतर वडिलांच्या तब्येतीत छान सुधारणा झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वडील असेपर्यंत हि ट्रीटमेंट चालू ठेवावी लागेल. या एका सेशनचा खर्च २५-३०००० होतो. गेल्या १० महिन्यांची ट्रीटमेंट (केमोथेरपी सायकल्स, त्यातून उद्भवणारे इतर आजार आणि त्यावेळी झालेली वेगवेगळी हॉस्पिटलायझेशन्स, आणि आता मेंटेनन्स थेरपी ) करून आम्ही फायनान्शिअली पूर्ण exhaust झालो आहोत. तर तुम्ही ट्रीटमेंट पुढे कशी कंटिन्यू केली कि स्टॉप केली हे मला जाणून घ्यायचे आहे. किंवा या संदर्भात अजून कुठे काही माहिती मिळू शकेल का तेही जाणकारांनी सांगावे.

वरील सर्वांच्या वेदना समजू शकते.

आतिशा 1305, अशा खर्चिक उपचारासाठी काही वेळा patient support program असतो. तुमच्या डाॅक्टरना विचारून बघा. माझ्या आईसाठी असा support Novartis कडून मिळाला होता, पण वेगळ्या आजारासाठी. औषध कंपनीत पण विचारून बघा.

आतिशा 1305, अशा खर्चिक उपचारासाठी काही वेळा patient support program असतो. तुमच्या डाॅक्टरना विचारून बघा.>> मुंबई ऑन्को केअर मध्ये पण आहे. हेल्थ इन्सुअरन्स असल्यास बरे पडेल. माझा जो हेल्थ इन्सुअरन्स आहे त्यावर मी अजून फार्मसी बिले क्लेम केलेली नाहीत पण आता कर णार आहे. उपचार खर्चिक आहेत खरे. त्या इंजेक्षन चे काही जेनेरिक व्हेरिअंट आहे का? ते विचारून बघा. पालबो सिकलिब हे जानेवारीतच ऑफ पेटंट झाले. त्यामुळे ते आता जरा स्वस्तात उपलब्ध आहे तरीही २० गोळ्या पहिले ५४०० रु होत्या व आता अराउन्ड ३५०० रु ला आहेत.

थँक्स अमा. मी विचारून बघते तिथे. त्यांचा हेल्थ इन्शुरन्स नाहीये हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांना देण्यात येणारे इंजेक्शन MOC मध्ये महाग होते तेव्हा हा खर्च जास्त होत असे. तेच आम्ही बाहेर एका डिस्ट्रिब्युटरकडून Dr. Reddy चे घेतो ते आम्हाला त्यामानाने स्वस्त पडते.

तुम्ही ट्रीटमेंट पुढे कशी कंटिन्यू केली कि स्टॉप केली हे मला जाणून घ्यायचे आहे.>> माझी नवी लाइन ऑफ ट्रीटमेनंट जानेवारीतच चालू झाली आहे. पालको सिकलिब तीन आठवडे रोज एक. व एक आठवडा ऑफ वीक. ह्या गोळी मुळे सेल काउंट एकदम डाउन होतो तो थोडा वर येइपरेन्त दम खायचा मग परत चालू करायचे. प्लस फुल व स्ट्रांट इंजेक्षन असेच महिन्यातून एकदा. ह्याचा खर्च प्रत्येक १८००० रु पडतो आहे. हे बाहेर कुठे मिळेल कि काय ही मी चौकशी केलेली नाही. ह्या दोन्हीचा रिझल्ट खूप चांगला आहे. मी पण स्टेज फोर डी नोवो. प्लस आमची डायग्नोस्टिक लॅब आहे तिथे कॅ नसर पेशंटचा डिस्काउंट मिळतो. पेट स्कॅ न डॉक्टर लिहून देतात डिस्काउम्ट द्या म्हणून त्यामुळे मला परवाच १८००० ऐवजी १२५०० खर्च आला स्कॅनला. जिथे तिथे विचारायचे अंगी बाणवून घ्यावे लागेल. ह्या व्यतिरिक्त सारखे घाटकोपरला जायचे म्हणजे २०० रु एका बाजुने असा रिक्षाचा खर्च आहे. हे सर्व किती दिवस जमेल असे वाट्ते कधी कधी. पण मी खरेतर स्वतःवर कमीच वेळ प्रेम पैसा खर्च केलेला आहे म्हणून आता हात मागे करत नाही. इतर खर्च कमी केलेत. प्रवास करत नाही. पूर्ण व्हेज जेवते. घरीच बनवते.

इन्सुअरन्स चा पाठ पुरावा करायचा इतके दिवस कंटाळा केला पण आता त्यांच्या मागे लागुन पदरात काही पडते का ते बघणार आहे.

<<>हे बाहेर कुठे मिळेल कि काय ही मी चौकशी केलेली नाही>>>
चौकशी करून बघा. दरात फरक पडेल बाहेर. आईची specific औषधे थेट distributor कडून घेत होते तर 27k ची 23k ला मिळत होती- ते पण चेक पेमेंट ने. एका ओळखीच्या बाईना त्यांच्या इंजेक्शन वर distributor कडून जवळपास 50% सूट मिळत होती.

तुम्हाला बळ मिळो आणि बरं होवो..

प्रतिसाद दिल्या करता सगळ्यांचे खूप आभार.
@ अश्विनीमामी - आज आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटल ल भेट देणार आहोत. पेट स्कॅन आणि biospy केली आहे. त्याचे reports आज Dr. रमाकांत देशपांडे (Asian Cancer Institute) la दाखवलेत. Surgery आणि त्या नंतर ६ केमो cycle suggest kelet डॉक्टरनी.
Dr. वशिष्ठ मणियार यांची appointment घेऊन भेटणार आहोत. Dr. Jay Anam यांना पण भेटणार आहोत. ३-४ opinion घेऊन मग मत एकच लाईन वर असले तर mostly मुंबई ला surgery करणार आहोत.
एका नातलगांची breast cancer surgery Pune येथे चुकीची झाली व परत surgery करावी लागणार आहे असे कळल्याने जास्ती ची काळजी (२nd , ३rd ओपियन ) घेत आहोत.

Facebook support group पण join करतेय. खरोखरच मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्टया कस काढणारा आजार आहे हा पण या मधून आईला सुखरूप बाहेर काढायचेच आहे.
आई मनाने खंबीर आहे. मला खात्री आहे की लवकरच हे सगळं ठीक होईल.
तुमचे सगळ्यांचे सल्ले खूप महत्त्वाचे आहे. मनापासून आभार!

फेसबुक वर क्लोज्ड मेटा स्टाटिक ( स्टेज फोर) ब्रेस्ट क्यान्सर सपोर्ट गृप हा आहे. हा क्लोज्ड ग्रूप आहे तुम्ही विनंती सब मिट करू शकता. जेन्युइन मेंबरला ते सभासदत्व देतात.

ब्रेस्ट क्यान्सर सर्वा य वर्स व वॉरिअर्स गृप पण बघा. माहिती दिल्यावर विनंती अप्रुव झाल्यास जॉइन होता येइल.

क्यान्सर सर्वायवरस इन इंडिया हा पण चांगला गृप आहे. अमित मिश्रा व मेहुल व्यास. दोघे अ‍ॅडमिन एकदम जेन्युइन उत्तरे देतात. मेहुल स्वतः सर्वायवर आहे. माझ्या बेस्ट विशेस तुमच्या बरोबर आहेत. मुंबईत काही मदत लागल्यास जरुर इथे मेसेज करा किंवा फोन करा ७७३८८९३११३ वर. हाच नंबर वाट्सॅप ला आहे. आत्ता हपिसात आहे. इथून निघून घरी जाउन कामे उरकून डिटेल्वारी पोस्ट लिहिते.

अमा - खूप धन्यवाद. मी तुम्हाला तुमची सवड विचारून नक्की संपर्क करेन. आईला स्टेज २ cancer detect झालाय. तुम्ही सांगितल्या प्रमाणे स्टेज नुसार योग्य तो group join करेन.

मी पण स्टेज फोर डी नोवो.
>>> अमा, तुम्हालाही निरामय जीवनासाठी शुभेच्छा. खरोखरच वाईट वाटलं वाचून. इतकं स्पष्ट तुम्ही लिहिलं नव्हतं कधी किंवा मी वाचलं नसेल , त्यामुळे कुणकुण असूनही सदिच्छा द्यायचे धैर्य झाले नव्हते.

अमा हे माहीतच नव्हते. शारीरीक तसेच मानसिक त्रास किती झाला असेल याबद्दल कल्पनाच न केलेली बरी. आपल्याला उत्तम आणि निरामय आरोग्याकरता शुभेच्छा - असेच म्हणन.

Thank you Asmita and Samo. I detected first tumour in 2020 but couldn't get mammogram immediately due to lockdown. Treatment at MOC started in Jan 2021. Very supportive people at MOC and excellent doctors. First line of treatment Letrozole and Zolodeic acid. Now switched to Palbo. Current Scans are good. I was able to work through it and now work schedule is a bit relaxed. Thumbs up emoji.

अमा, तुम्हालाही निरामय जीवनासाठी शुभेच्छा. खरोखरच वाईट वाटलं वाचून. इतकं स्पष्ट तुम्ही लिहिलं नव्हतं कधी किंवा मी वाचलं नसेल , त्यामुळे कुणकुण असूनही सदिच्छा द्यायचे धैर्य झाले नव्हते. मलाही धीर झाला नाही. तुम्हाला सलाम! खूप शुभेच्छा!

बरेच दिवसांनी आज मायबोली ला login करायला वेळ मिळाला. सहज update द्यावा म्हणून हा प्रतिसाद.
अश्विनी मावशी ने सांगितल्या प्रमाणे MOC la Dr. वशिष्ठ मनियार व Dr. जय अनाम यांना भेटलो. सर्वानुमते आधी ६ chemo cycles आणि नंतर surgery अशी उपचाराची दिशा ठरलेली आहे. दर २१ days नंतर chemo cycle आहेत. एका ओळखीच्या Dr कडे हे उपचार सुरू केले आहेत. सध्या २ cycles झालेत. आलेल्या अडचणीला नेटाने सामोरे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्हा सगळ्यांच्या सूचना व प्रतिसादाने खूप मदत झाली व धीर मिळाला. शक्य तेव्हा मी update det राहील. धन्यवाद

एका ओळखीच्या Dr कडे हे उपचार सुरू केले आहेत. सध्या २ cycles झालेत. आलेल्या अडचणीला नेटाने सामोरे जाण्याचा प्रयत्न चालू आहे.>> अगदी पॉझि टिव्ह राहायला मदत होईल अश्या गोष्टी आईंसाठी जरूर करा. त्यांना सकस पन साधे कमी मसाले दार अन्न खायला लावा. मूळ तब्येत चांगली असली की रिकव्ह रीला मदत होते. तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या केअर गिव्हरच्या पेशन्स चा अंत पाहणारे हे काम आहे. सात तास झोप मिळेल असे बघा. अनेकानेक शुभेच्छा रिकव्हरी साठी.