सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाण्याची सोय केली होती. पण तात्पुरत्या जलवाहिन्या तापल्याने पाणीही तापले.
पाण्याची सोय मैदानाच्या एकाच बाजूला केली असल्याने तिथे गर्दीही झाली.
कार्यक्रम सकाळी हवा कारण संध्याकाळी अनुयायांना घरी पोचायला उशीर होईल ही पुरस्कार विजेत्यांचीच मागणी होती, असं सरकार म्हणतंय.

त्यांचे अनुयायी आदल्या दिवसापासून तिथे ''दर्शना'साठी आले होते.

आयोजनात त्रुटी झाली असेल, पण सगळ्यात मोठी चूक त्या मूर्ख अनुयायींची आहे, जे इतक्या उन्हात तो कार्यक्रम बघायला आले आणि त्रास होऊनही कार्यक्रम बघत बसले.

कार्यक्रम सकाळी १० ला होता
दुपारी नव्हता
आणि आयोजन झाले तेव्हा तुम्हाला तरी वाटले होते का असे होईल ?

एवढं घडुन सुद्धा ह्या त्यांच्या 'देवा'ला आपल्या अनुयायांची भेट घ्यावीशी वाटली नाही. एक पत्रक काढुन मोकळे झाले. Sad

२०-२५ लाखांची वोट बँक आणि स्वतः मुमं त्या संप्रदायाचे भक्त असणे हे मुख्य कारण असावे इतका भव्य सोहळा आयोजित करण्याचे. सोहळासमितीला खरं तर दोषी ठरवुन कारवाई करायला हवीये.

आयोजन झाले तेव्हा तुम्हाला तरी वाटले होते का असे होईल ? >> डिझास्टर मॅनेजमेंट म्हणुन काही असते. २२ लाख लोकं येतात तेव्हा बर्‍याच गोष्टींचा विचार करावा लागतो. चैत्यभूमी/पंढरपुर वारी इथे सर्व शक्यता ध्यानात घेतल्या जातात ना?

आयोजनात त्रुटी झाली असेल, पण सगळ्यात मोठी चूक त्या मूर्ख अनुयायींची आहे, जे इतक्या उन्हात तो कार्यक्रम बघायला आले आणि त्रास होऊनही कार्यक्रम बघत बसले. > +१०००

सकाळी १० च्या कार्यक्रमात एप्रिल महिन्यात माणूस मरेल इतकी उष्णता आता महाराष्ट्रात असते ? खरोखर २० लाख लोक जमले असतील आणि त्यातले २० मरण पावले म्हणून ही न्यूज झाली. पण रोजच असे लोक महाराष्ट्रात उष्मांघाताने मरतात आणि एकट्या दुकट्या ची न्यूज होत नाही असा प्रकार असावा. म्हणजे वाढतं तापमान deforestation excessive construction हे सर्व कारणीभूत ठरेल आणि गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेले सर्व राजकारणी व त्यांचे समर्थक कारणीभूत ठरतील? जमिनीचे व्यवहार तर राजकारण्यांसाठी अतिप्रिय.

सकाळी १० च्या कार्यक्रमात एप्रिल महिन्यात माणूस मरेल इतकी उष्णता आता महाराष्ट्रात असते ? >> कारस्थान असेल. इतरत्र उणे सहा तापमान असताना इथेच ४२ अंश सेल्सिअस तापमान कसे याची चौकशी करावी.
नक्की नाठाळ विरोधकांनी हीटर लावले असतील.

{कार्यक्रम सकाळी १० ला होता
दुपारी नव्हता}
हस्तर, कार्यक्रम साडेदहाला सुरू होऊन दीडला संपलाय असं बातम्यांत म्हटल़य. कार्यक्रम दहाचा होता , दुपारी नव्हता म्हणजे काय?

फार दुर्दैवी आहे Sad
राजकारणात रस नाही.. त्या अजेंड्याने लिहिणारे काही जण आता आयोजकांची चुकी पोटात घालायला बघतील. तर काही जणांना मेलेल्यांचे पडले नसून आता राजकीय स्कोअर कसा सेटल करता येईला अशी संधी दिसत असेल.
पण एक तटस्थ नागरीक म्हणून मला मुळात असा कार्यक्रम करणेच पटले नव्हते.

आमच्या बिल्डींगमधील एक कुटुंब. बायकापोरे पहाटे चार वाजताच तिथे गेले होते. ते सुखरूप आले हेच नशीब म्हणतो.

कार्यक्रम पत्रिका माझ्या पहाण्यात आलेली नाही, पण तो सकाळी ११:३० ते ०१:०० या वेळी झाला होता असे बातम्यांत आहे. अनेक तास आधी पासून लोक आलेली होते. एक तासापेक्षाही जास्त वेळ भाषणेच झालीत. एव्हढा मोठा जनसागर उन्हातान्हात भाषणे एकायला ताटकळत बसला होता हे जगातले आठवे आष्चर्य आहे (असे माझे नाही तिथे भाषण दिलेल्या महाभागाचे म्हणणे आहे). मोठ्या जनसागराला संबोधित करण्याची नेत्याची हौस फिटते पण त्यासाठी नाहक लोकांचा जिव जातो. हे खरोखरिच गरजेचे होते काय?

भयंकर चीड आणणारा प्रकार आहे. मुळातच एवढा कार्यक्रम अनावश्यक आहे. अनुयायीही महानच! मंचावरच्या लोकांचं काय जातंय गर्दीचे आणि तापमानाचे कौतुक करायला?

नक्कीच टाळता येण्याजोगी दुर्घटना!

त्या धर्माधिकारीच्या यापुढच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद करून टाकल्या पाहिजेत. या दुर्घटनेला सर्वच संबंधित जबाबदार आहेत. आयोजक, अनुयायी, नेते, स्वतः स्वारी का कोण ते, सगळेच!

निदान भाषणे तरी आवरती घ्यायला हवी होती, लोक ताटकळत बसलेले आहेत हे पाहून!

अनुयायांकडून धर्माधिकारी देवाबद्दल नवनवीन गोष्टी उजेडात येत आहेत. ह्यांचे पण पाय मातीचेच आहेत. ह्या गोष्टींचा झालेल्या अपघाताशी संबंध नाही पण आंधळी भक्ती करून नक्की काय पदरी पडते ह्याचा भक्तांनी सद्सद्विवेकबुद्धीने विचार करावा.

Screenshot_20230418_114613_Chrome.jpg

खूप वाईट आहे हे.भविष्यात टळायला हवे.मुळात 22 लाख इतका क्राऊड जमावायची खरंच गरज आहे का?चेंगराचेंगरी किंवा काहीही होऊ शकते.
ज्यांची सभा, ज्यांची भाषणं त्यांना इतकंही जाणवलं नाही?
अनुयायी बहुधा गर्दीमुळे बसल्या जागेवरून उठून जाणं कठीण, परत यायला जागा मिळणार नाही अश्या कल्पनांनी ताटकळत बसले असावे.
आयोजकांचं आणि स्टेज वरच्यांचं, दोघांचंही वागणं क्षम्य नाही.

तापमानाकडे निव्वळ एक आकडा म्हणून बघू नका. तापमान तसेच हवेतील आद्रतेचे प्रमाण हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत ( Heat Index ) आणि उपस्थित रहाण्यार्‍या व्यक्तीचे वय, जोडीला काही underlying conditions असतील तर त्याचे विपरीत परिणाम दिसतील.

https://www.weather.gov/ama/heatindex.

२२ लाख लोक!!!! पुरस्कार सोहळ्याला इतके लोक येणे हे सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने भयानक आहे. इतक्या लोकांची व्यवस्था करणे, त्यांच्यासाठी त्याठिकाणी फिरता दवाखाना, अग्निशमन सुविधा वगैरे असणे आवश्यक आहे. ती नसेल असं नाही, पण इतक्या मोठ्या लोकसंख्यसाठी नक्कीच पुरेशी नसणार. कारण २२ लाख म्हणजे जवळपास एक आख्खं शहर झालं... पुण्यासारख्या शहरात जितक्या अँम्ब्युलन्स आहेत, जितके डॉक्टर, नर्स, पोलीस, अग्निशामक आहेत तितके ह्या सोहळ्याला होते का? शिवाय इतकं रणरणतं ऊन असताना सर्वांना डोक्यावर छप्पर देता येत नसेल तर अश्या ठिकाणी हे कार्यक्रम करायची परवानगीच दिली जाऊ नये. या दु:खद घटनेने तीव्र संताप येतो आहे.

झम्पू, अंनिस ने पण बैठकीचा वापर काही कुटुंबावर निर्बंध घालणे किंवा वाळीत टाकणे ह्यासाठी केल्या गेल्याबद्दल आधी लिहिले आहेच. दाभोलकरांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे

सकाळी १० च्या कार्यक्रमात एप्रिल महिन्यात माणूस मरेल इतकी उष्णता आता महाराष्ट्रात असते ?## भारतात येऊन बघता का?

{कार्यक्रम सकाळी १० ला होता
दुपारी नव्हता}
हस्तर, कार्यक्रम साडेदहाला सुरू होऊन दीडला संपलाय असं बातम्यांत म्हटल़य. कार्यक्रम दहाचा होता , दुपारी नव्हता म्हणजे काय?

नवीन Submitted by भरत. on 18 April, 2023 - 01:5

बाकी. लोक पण माझाच मुद्दा उचलत आहेत

आयोजन झाले तेव्हा तुम्हाला तरी वाटले होते का असे होईल ? >> डिझास्टर मॅनेजमेंट म्हणुन काही असते. २२ लाख लोकं येतात तेव्हा बर्‍याच गोष्टींचा विचार करावा लागतो. चैत्यभूमी/पंढरपुर वारी इथे सर्व शक्यता ध्यानात घेतल्या जातात ना?

नवीन Submitted by भ्रमर on 18 April, 2023 - 01:29

अहो इथे दर पावसाळ्यात मुंबई तुंबते आणि २६ ११ ला बातमीदार सांगतात कि कमांडो कुठून अकशन घेत आहेत आणि अतिरेकी तेच बघून त्यांना टिपतात तिथे डिसास्टर मानजमेंट ?
डोनाल्ड ट्रम्प सरळ संसदेवर चालून आला अमेरिकेत pan तेव्हा तरी काही करता आले ?

एवढ्या मोठ्या गर्दी मध्ये माणसे मेली तरी लगेच बातमी बाहेर आली हेच नशीब ,गणपती वेळी कितीत तरी गर्दी मध्ये घाणेरडे प्रकार होतात पण गर्दी पुढे काही करता येत नाही

सकाळी १० च्या कार्यक्रमात एप्रिल महिन्यात माणूस मरेल इतकी उष्णता आता महाराष्ट्रात असते ?

हा प्रश्न ज्यांनी विचारला आहे त्यानं पण नीट माहीत आहे की प्रश्न चुकीचा आहे.

पण आपल्या लाडक्या राजकीय पक्षाला,सरकार ल दोषमुक्त ठरवणे किती ही दोषी असले तरी.
म्हणून अशा पोस्ट केल्या जातात.
तापमान+आद्रता+,वाऱ्याचा वेग .
ह्या सर्वांचा विचार करावा लागतो.
वाऱ्याचा वेग जेव्हा अगदी कमी असतो,आद्रता जास्त असते तेव्हा ,३०, d तापमानात पण घुसमट होते.
ती पण सावलीत.
ही लोक तर सरळ उन्हात बसली होती.
त्यांची अवस्था किती भयानक झाली असेल.

तापमान जीव घेणे नव्हते तर.
स्टेज वर छपर का होते?
तिथे कूलर आणि पंखे का लावले होते.
त्यांना पण उन्हात च बसवायचे ना.

लाखो लोक,
१०+ लोकांचा मृत्यू,
अनेक जखमी/अत्यवस्थ,
महाराष्ट्र भूषण

आर के लक्ष्मण हवे होते. सर्वांनाच अंतर्मुख करणारे खरमरीत चित्र काढले असते. गुरू, अनुयायी, आयोजक, नेते आणि आपणही. अशा सर्वांनाच.

२२ लाख??? बापरे, इतके लोक जमणार हे माहित असताना इतकी फालतु व्यवस्था करावी याचा विषाद वाटला. आपत्ती व्यवस्थापन टिम फक्त पावसाळ्यात जागी होते का?

तरी या संघटनेबाबत असे झाले याचे आश्चर्य वाटले. साधारण पाच सहा वर्षांपुर्वी यांचा एक कार्यक्रम नेरुळच्या डि वाय पाटिल स्टेडियममध्ये झालेला. तेव्हा यांनी खुप छान व्यवस्थापन केले होते. पुर्ण नव्या मुम्बईचे रस्ते डिझाईन्सनी रंगवले होते ते सोडाच पण कार्यक्रमच्या दिवशी यांच्या शेकडो बसेस बेलापुर/नेरुळात येऊनही ट्रफिक जॅम झाला नाही. खुप दुरवर बस पार्किंग असुनही लोक तिथुन व्यवस्थीत दोन-चार जणांच्या रांगेत स्टेदियममध्ये गेले. नेरुळ्/बेलापुरमधिल इतर पब्लिकला ह्या अचानक आलेल्या लोंढ्याचा त्रास झाला नाही. तेव्हा इतके व्यवस्थित नियोजन करता आले तर यावेळेस का फेल गेले?

सध्या मुंबईत प्रचंड ह्युमिडीटी व युव्ही रेजचे प्रमाण वाढलेले आहे. नवी मुंबई परीसर तर मुंबई पेक्षा जास्त रुक्ष असतो. १० वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत उन्हात बसलेल्या व पाण्याचा ॲक्सेस नसलेल्या माणसाला हीट स्ट्रोक आला नाही तर नवल. त्यातून हा उष्माघात आहे हे त्या माणसाला वा आजूबाजूच्यांना कळणे अवघड व अशा वेळी काय करायचे याची माहिती बहुतांश लोकांना नसते.

मुळात यावेळी समारंभ टाळणे, नीट मंडप घालणे, बंदीस्त सभागृहात घेणे, योग्य ती वैद्यकीय सुविधा तयारीत असणे, त्रास होत असल्यास कुणाचीही पर्वा न करता उठून जाणे इ. साधेसोपे उपाय करता आले असते पण आपल्या देशात सगळ्यात स्वस्त माणसाचा जीव आहे.

अनुयायांकडून धर्माधिकारी देवाबद्दल नवनवीन गोष्टी उजेडात येत आहेत. ह्यांचे पण पाय मातीचेच आहेत. ह्या गोष्टींचा झालेल्या अपघाताशी संबंध नाही पण आंधळी भक्ती करून नक्की काय पदरी पडते ह्याचा भक्तांनी सद्सद्विवेकबुद्धीने विचार करावा.

ही झंपू ह्यांची पोस्ट अगदी योग्य आहे.
धर्मावर प्रेम असणारे व्यक्ती आणि संघटना त्या धर्मातील लोक सर्व बाबतीत श्रेष्ठ होतील असे प्रयत्न करतील.
१) शिक्षण स्व धर्मीय लोकांना मिळावे म्हणून प्रयत्न करतील.
आर्थिक बाबतीत कमजोर वर्ग शिक्षण पासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न करतील
२) लोक सशक्त कसे होतील ,.
त्यांनी योग्य तो व्यायाम करावा, त्यानं योग्य सकस आहार मिळावा .
त्यांनी व्यसन न पासून दूर राहावे.
३)स्वा धर्मीय लोक आर्थिक बाबतीत प्रगत व्हावीत त्या साठी योग्य ते मार्ग दर्शन.
आर्थिक मदत.आणि जागरूकता निर्माण करणे.
४)त्या नंतर धर्म म्हणुन जो समूह असतो त्यांना नीतिमत्ता,योग्य वर्तन ,जबाबदाऱ्या ह्याचे शिक्षण देईल.
आणि सर्वात शेवटी भक्ती,त्याचा अर्थ,देव त्याचा अर्थ
सांगा.
पण हे साधू, गुरु धर्माचे ठेकेदार.
लोकांना.

चार चार तास पूजा करायला सांगतात.
चार चार तास बैठका मध्ये अडकवून ठेवतात.
त्यांना भ्रमिष्ट करून सोडतात.
ना ह्यांचे अनुयायी.
शरीराची काळजी घेत,ना आर्थिक बाबतीत सक्षम होत.
आणि ना रिअल लाईफ मध्ये नीतिमान होत.
फक्त धर्म वेडे,अंध भक्त, .
सर्व बाबतीत कमजोर.
अशी लाचार लोक फक्त तयार होतात.
मी हिंदू आहे म्हणून हिंदू च लिहल.
पण .
दलीत लोकांचे पुढारी आणि त्यांचे धर्म गुरू पण हेच करत असतात.
मुस्लिम लोकांचे धर्म गुरू आणि त्यांचे नेते पण हेच करत असतात.
गब्बर फक्त नेते,धार्मिक गुरू च होत असतात.
अनुयायी कमजोर,लाचार च राहतात.

ज्यांना कार्यक्रमाला जाता आलं नसेल त्या़च्यासाठी लिंक.
आदर्णीय अमित शहाजींच्या ट्विटर हॅंडलवरून
https://youtu.be/koZr0wf5FIs
कार्यक्रमात नंतर असं काही झालं हे आ.अमित शहाजींना कळलंय की नाही, हे समजायला मार्ग नाही. याबद्दल त्यांचं किंवा आ. नरेंद्र मोदीजींचं ट्वीट दिसलं नाही.

Pages