आरोग्य

बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग ३)

Submitted by nimita on 11 February, 2018 - 04:22

बाराव्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर ला मी माझं ब्लड सँम्पल देऊन परत येत होते. वाऱ्यामुळे केसांची एक बट सारखी डोळ्यांवर येत होती. तिला मागे सारायला म्हणून हातात धरली तर ती बट एकदम माझ्या हातात निघून आली. 'केस गळणं' सुरू झालं होतं. मनात पहिला विचार आला माझ्या मुलींचा - त्यांना काय वाटेल? नक्कीच दोघी घाबरतील. त्यामुळे त्यांना सांगतानाच असं सांगायला पाहिजे की त्या दोघी हे सगळं पॉझिटीव्हली घेतील. घरी गेल्यावर त्यांना दोघींना जवळ घेऊन समजावलं," डॉक्टर अंकल म्हणाले की जेव्हा या औषधाचा परिणाम सुरू होईल तेव्हा तुमचे केस गळायला लागतील. पण सगळं औषध शरीरातून बाहेर गेल्यावर पुन्हा सगळे केस येतील.

विषय: 

बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग २)

Submitted by nimita on 7 February, 2018 - 22:54

ट्रेन मधे आमच्या कंपार्टमेंट मधल्या माझ्या सहप्रवाश्यांमधे एक कुटुंब होतं. नवरा बायको आणि आठ-दहा वर्षांची त्यांची मुलगी. मोनिका नाव होतं तिचं. त्या मुलीची अवस्था बघवत नव्हती. She was physically and mentally challenged. तिचं स्वतःचंच असं एक विश्व होतं. तिचे आई वडील अधूनमधून तिच्याशी बोलत होते, तिला खिडकी बाहेरची पळणारी झाडं दाखवत होते... अगदी नॉर्मल आई वडीलांसारखे. पण ते सगळं मोनिका पर्यंत पोचतच नव्हतं.

विषय: 

थायरॉइड हॉर्मोन्स आणि त्यांचा गोतावळा

Submitted by कुमार१ on 5 February, 2018 - 23:07

टीपः माबोवर थायरॉइडचा नानबांचा धागा गेली ९ वर्षे चालू आहे. त्यातून वाचकांची या आजाराबद्दलची उत्सुकता व जागरुकता दिसून येते. माझ्या सध्याच्या लेखमालेत मी थायरॉइडवर लिहावे अशी वाचकांची सूचना होती. तसेच मलाही या विषयावर लिहिण्याचा मोह टाळणे अवघड होते. तेव्हा वरील धाग्यावर फारशी चर्चा न झालेले मुद्दे घेउन हा लेख लिहीला आहे. तो वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
********************************

विषय: 

बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग १)

Submitted by nimita on 4 February, 2018 - 00:40

आज ८मे २०१६.माझी ट्रीटमेंट संपून आज दहा वर्षे पूर्ण झाली.असं म्हणतात की 'काळ हे उत्तम औषध आहे'. जसाजसा काळ जातो, तसे तुम्ही तुमची दुःख, तुमच्या यातना सगळं हळूहळू विसरता. राहतात, मागे उरतात त्या फक्त आठवणी ! आज पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
गेल्या दहा वर्षांतला प्रत्येक दिवस मी आज पर्यंत कित्येक वेळा अनुभवला आहे. एखाद्या flashback सारखे ते सगळे प्रसंग, त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरुन सरकत जातात.
'३ नोव्हेंबर २००५' ही तारीख आणि भाऊबीजेचा तो दिवस माझ्या आयुष्यात बरंच काही बदलून गेला- खरं तर माझं सगळं आयुष्यच बदलून गेला.

विषय: 

जागतिक कर्करोग दिनानिमित्त (४ फेब्रुवारी) जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

Submitted by डॉ रवी१ on 3 February, 2018 - 00:31

कर्करोगाच्या लवकर तपासणीमुळे यशस्वी उपचारांसाठी संभाव्य शक्यता वाढतात. कर्करोगाच्या लवकर तपासणीचे दोन प्रमुख घटक आहेत: शिक्षण लवकर निदान आणि स्क्रिनींगला प्रोत्साहन देण्यासाठी.

विषय: 

ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य प्रश्न

Submitted by डॉ रवी१ on 27 January, 2018 - 11:09

ज्येष्ठत्वामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, उदाहरणार्थ डोळ्याचे, ह्रदयाचे, अस्थि, सांधे, दात, मूत्रपिंड, यांचे, मधुमेह, रक्तदाब-वाढीचा, मेंदू व मानसिक –हासात्मक विकार इ.त्यास आहार, विहार, व्यायाम यासंबंधी, नेहमी आरोग्य तपासणी आवश्यक आहे.आपण क्रमाक्रमाने यथावकाश या प्रश्नांसंबंधी चर्चा करुया.

विषय: 
प्रांत/गाव: 

माझी पाठदुखी - २

Submitted by विद्या भुतकर on 25 January, 2018 - 16:07

डिस्क्लेमर: मी डॉक्टर नाही, त्यामुळे माझ्या वापरलेल्या शद्बात, समजण्यांत काही चूक असेल तर माफ करावं. योग्य माहिती दिली तर मी पोस्ट मध्ये नक्कीच सुधारणा करुन देईन.

वृद्धाश्रमात अध्यात्मिकता

Submitted by डॉ रवी१ on 25 January, 2018 - 12:24

वृद्ध लोकांसाठी अध्यात्मिक उपक्रम राबवावी प्रवचने, ग्रंथाची उपलब्धता, CD player इ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 

नेमेचि येतो मग फ्लू काळ

Submitted by अश्विनी on 19 January, 2018 - 13:03

अमेरिकेत साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास फ्लू सीझनला सुरूवात होते ते एप्रिल मे पर्यैत ह्याची व्याप्ती असते. डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत त्याची तीव्रता सर्वात जास्त असते.
ह्यावर्षीचा फ्लू सीझन तुलनेने जास्त वाईट असणार आहे असा गाजावाजा सगळीकडे ऐकू येत आहे त्याचे कारण H3N2 हा स्ट्रेन. ह्याची ख्याती 'हॉस्पिटलायझर' अशीच पसरलेली आहे. नेहमीचीच फ्लूची लक्षणे पण जास्त तीव्र आणि जास्त भयानक. हा सीझनही नेहमीपेक्षा एक महिना आधीच चालू झालाय आणि जास्त काळ टिकणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब

Submitted by कुमार१ on 15 January, 2018 - 23:36

आपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...
* * *

पहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अ‍ॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य