Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे?

Submitted by गुलबकावली on 27 November, 2016 - 23:53

नमस्कार, मला Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करायचे ह्यावर उपाय हवे आहेत.

माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे. त्यांची औषधे चालू आहेत. पण अजून काय करता येईल आणि ह्याचे नंतर काय काय परिणाम होवू शकतील किंवा पुढे काय काळजी घ्यावी जेणे करून वजन नेहमी अटोक्यात राहिल?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोरीच्या उडया / कराटे / पोहणे/बास्केटबॉल / टेनिस ह्यापैकी कोणत्याही दोन activities रोज १ taas करायच्या. दोरिउड्या सोडून बाकीच्या क्लास लावता येईल. तीन महिन्यात फरक दिसायला हरकत नाही. चिप्स आणि बिस्किट्स आवडत असतील, त्यांचं consumption अर्ध करायचं. गूळ-पोळी रोल, दूध-साखर-पोळी असं आवडत आसेल तर कोशिंबीर-भाजी सुरु; गुळ-साखर बंद करून. दुधातली साखर पूर्ण बंद करायची, घालत असाल तर. Tropicana ऐवजी लिंबू सरबत द्यायचे.

अर्थात, मला पहिला प्रश्न पडलाय तो म्हणजे Water Retention म्हणजे काय? दुसरा, Water Retention मुळे वजन कसे वाढते? तिसरा, Water Retention ला आयुर्वेदात काय म्हणतात?

आधी मुळात water रिटेन्शन कशामुळे होतय एवढया लहान मुलीला त्याचा शोध चांगल्या dr ला दाखवून घ्या आणि त्यावर औषध योजना करा .

मनीमोहोर >> + १
आहारातून गोड पदार्थ, मैदा बंद करणे तसेच मिठाचे व तिखटाचे प्रमाण कमी केल्यास फायदा व्हायला हवा.

गुलबकावली, पाणी अगदीच कमी पित असाल तर (आपले शरीर पाणी साठवून ठेवते), आहारात सोडीअमचे प्रमाण जास्त असेल तर, अतिप्रमाणार मिठाचे, साखरेचे सेवन ह्यामुळे शक्यतो Water Retention होते.

लिंबूवर्गीय फळं खाण्याचा, साखरेवीना किंवा कमी साखरेचे लिंबू सरबत, घरी केलेला ताजा मोसंबी / संत्रा रस ( फळं खाणं उत्तम), ह्याचा Water Retention कमी करायला फायदा होतो.

धन्यवाद नलिनी. खरय तुमच ती पाणी प्यायला खुप त्रास देते. पण बाकी मीठ साखर वैगरे जास्त नाहि खात.

पण आता तीला <,लिंबूवर्गीय फळं खाण्याचा, साखरेवीना किंवा कमी साखरेचे लिंबू सरबत, घरी केलेला ताजा मोसंबी / संत्रा रस> हे सगळे जास्त खायला सांगणार आहे.

अहो पहिले तिला अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर म्हणजे पेडिअ‍ॅट्रिशिअन कडे न्या. तो हाइट वेट चेक करेल. किती ओव्हरवेट आहे ते बघेल व काही तपासण्या सांगेल. त्या करून घ्या. जर काही मेडिकल कंडिशन नसेल
( जसे ज्युवेनाइल डायबेटीस) तर तिचे वजन डाएट कंट्रोल व व्यायामाने कमी होईल. आयुर्वेदावर फक्त अवलंबून राहू नका. खालील जनरल गाइड लाइन्स.

१) फक्त इंटरनेट व टीव्ही इतकेच करत असेल तर एक दोन तास फिजिकल व्यायाम करवा. खूप लाडावलेली असेल तर सर्व वस्तू हातात आणून देत असाल तर ते बंद करा. तिचे तिला पाणी, जेवन घेउदे.
२) फ्रूट्स व्हेजिटेबल्स कसे व किती खायचे त्याचा प्रॉपर डिग्री असलेल्या न्युट्रिशनिस्ट कडून सल्ला घ्या व
सहा महिने तरी फॉलो करा
३) तिला वजनावरून घालून पाडून बोलू नका व विनोद करू नका. हे घरातील मोठ्यांना व पुरुषांना नक्की सांगा कारण त्यांच्या अश्या कमेंट्स चा मुलींच्या मनाव र खोल परिणाम होतो.
४) घरी मुले मोलकरणीव र अवलंबून असतील तर त्या जास्त खायला देतात का ते बघा. पोर्शन कंट्रोल
५) आजी आजोबांतर्फे होणा रे अवास्तव लाड जसे गोड लाडू इतर पदार्थ बंद करा.
६) तिच्या आव्डीच्या फिजिकल अ‍ॅक्टिवीटीत तिला घाला. नाच. स्विमिन्ग, शटल जेणे करून हसत खेळत
फिजिकली अ‍ॅक्टीव राहायची सवय होईल.
७) फक्त नॉन व्हेजच खात असेल तर ग्रिल्ड व स्टीम्ड खाउद्या. फिश वगैरे. रेड मीट बंद करा.
८) अमेरिकेत/ युरोपात असाल तर लेबल वाचूनच अन्न द्या.
९) तिला दुसरी काही समस्या आहे का जसे शाळेत बुलींग त्यामुळे ती एकटी बसून अन्न जास्त खाते आहे ते विचारून घ्या हळू हळू.
१०) जंक फूड कमी करा. पिज्झा, मॅक्डी, आइसक्रीम कोक पेप्सी, चिप्स चीटोज.

अमा, छान पोस्ट. खुप छोटछोट्या गोष्टी लक्षात घेवुन लिस्ट केल्या आहेत. सगळ्याच ओबिज मुला-मुलिंच्या आईवडिलांनी ही पोस्ट फ्रीजवर मॅग्नेटने लावुन फॉलो करायला हवी.

चांगली पोस्ट आहे अमा. गुलबकावली, होपफुली हा प्रॉबलेम सिरियस नसेल आणि सगळं नीट होईल पण कृपया आजिबात ऑनलाईन सल्ल्यांच्या नादी लागू नका. डॉ काय सांगतील तो उपाय अगदी काटेकोरपणा पाळा येवढच.

Plz suggest some good Ayurveda doctor near SB road/Model colony Pune for neck /back pain aani for loss weight. Panchkarm karun kahi phark padel ka vajan aani neck sathi?? Plz it urgent

पहिल्या गाडीनं डॉक्टर कडे न्या.
ऐकिव सल्ल्यांवर आणि उपायांवर जास्त भरवसा ठेवू नका.
योग्य निदान गरजेचं आहे.