एका नाजूक विषयावर सल्ला हवा आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 January, 2016 - 02:07

कळ कळीची विनंती - शीर्षकापासून आतला कंटेन्ट काहीही हास्यास्पद वाटला तर जरूर थट्टा मस्करी करा.
पण धागा ईतकाही भरकटवू नका की इथे कोणी दिलेला योग्य सल्ला त्यात हरवून जाईल.
कारण प्रॉब्लेम खरेच फार जेन्युईन आहे.

थेट मुद्द्यावर यायच्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो.
लहानपणापासून माझ्या जेवणाच्या कलेचे कौतुक होत आलेय. ताटात हवे तेच आणि हवे तेवढेच घेणार. नासाडी जराही करणार नाही. ताटातले पदार्थ जागच्या जागी सजवून घेणार. हात खरकटे करत कधी डाळभात खाणार नाही. ताटाबाहेर कधी एक शितही सांडणार नाही. ओल्या भाजीचा रस्सा ओघळत लोणच्यात गेलाय, पापड भातावर ओवरलॅप होत नरम पडलाय, एखादा आवडीचा पदार्थ हावरटासारखा पहिल्याच वाढणीत भरमसाठ घेतलाय वगैरे वगैरे प्रकार दिसणार नाहीत. अगदी शेजारी बसलेला अनोळखी व्यक्ती सुद्धा माझी जेवनशैली पाहता स्वताहून कौतुकाचे दोन शब्द बोलायचा.

तर हे वरचे गुण आजही अंगी नांदत आहेत. पण यांची किंमत शून्य करणारा एक दुर्गुण माझ्या ग’फ्रेंडला माझ्यात सापडला आहे. तो म्हणजे, तिच्यामते जेवताना किंवा काहीही खाताना माझ्या तोंडून आवाज येतो.. मचाक मचाक मचाक ..

आधी मला हा ईतका गंभीर प्रकार वाटला नाही. दरवेळी तिने आक्षेप घेताच मी काहीतरी विनोदी कारण सांगून वेळ मारून न्यायचो. पण आता यातील वारंवारता ईतकी वाढलीय की यातील विनोदही संपून गेलाय. अर्थात या कारणावरून लगेच आमचा ब्रेक अप होईल असे काही नाही... पण तसे खात्रीने सांगताही येत नाही. परिणामी तिच्यासोबत हॉटेलमध्ये खाताना काय मागवावे जेणेकरून तोंडाचा आवाज कमी होईल याचा विचार करता मी आजकाल ज्यूस आणि कॉफीवरच भागवू लागलोय. नात्यासोबत तब्येतीचीही हेळसांड होऊ लागलीय.

गर्लफ्रेंडने शेवटचे फर्मान सोडले आहे. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मी आता यापुढे खाताना तोंडाचा आवाज करणार नाहीये. प्रॉब्लेम असा आहे, जर मला कुठले बिडीकाडीचे व्यसन असते तर रडत रडत सोडलेही असते. पण तोंडाचा होणारा आवाज सोडण्यासाठी आधी तो निर्माण कसा होतो हे तरी समजायला हवे.

१ जानेवारी उजाडल्यापासून मी फावल्या वेळेत विविध खाद्यपदार्थ खाऊन, कोणत्या पद्धतीने खाताना तोंडाचा किती आवाज होतो आणि तो कश्याप्रकारे कमी करता येईल, हे घरच्या आरश्यात चेक करत आहे. तरी नेमका उपाय सापडत नाही. म्हणून इथे मदत मागत आहे.

तर खालीलप्रकारची मदत अपेक्षित आहे.

१) तोंडाचा आवाज होणे हे शारीरीक जडणघडणीशी निगडीत असते की चर्वणाच्या सदोष पद्धतीमुळे हा आवाज येतो? या ध्वनीनिर्मितीचे नेमके कारण काय?
२) यावर उपाय काय? पहिले कारण असल्यास एखादी सर्जरी वा तोंडाचा व्यायाम सुचवा. दुसरे कारण असल्यास घास कसा चावावा याचे तंत्र सांगा. गप्पकन गिळायचा असले अघोरी विनोदी उपाय नकोत.
३) सर्जरी असल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेम करता येतो का? की ते डोळ्यांच्या लेजर ऑपरेशन सारखे कॉस्मेटीक मध्ये मोडते?
४) काही वेगळेच कारण आणि काही वेगळाच उपाय असतो का? मी माझ्या सायंटीफीक कल्पनाशक्तीला ताण देत आहे पण काही सुचत नाहीये.

सहकार्य कराल अशी अपेक्षा
धन्यवाद
ऋन्मेष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाळ कमी गळेल असे जेवण जेव. (तोंडाला पाणी न सुटू देणे - पचन होण्यासाठी आवश्यक असते पण तरीही).
गालाची आतली बाजू, दाढ आणि जीभ यांचा संगम न होऊ देता, शक्य तेवढे तोंड मिटून जेव.

ज्यूस, प्रोटीन आणि दुध शेक पीत जा. वजनही आटोक्यात राहील.

बाकी खात्तांना जीभ अति उचलली की असा आवाज होतो. सबब, जेवतांना रादर, घास तोंडात ठेवतांना कमी बोलणे आणि शक्यतो ओठ बंद ठेवून घास खाणे, सुचवण्यात येत आहे Happy

एवङे विचार करु नका, फक्त जेवताना तोन्ङ मिटुन हलु हलु जेवा, आधि थोड मधे मधे विसराल मग होइल सवय हलु हलु, अगदि अवाज येनार नाहि. आनि असे जेवणे शिशटाचाराचे पण आहे.

खाताना मचाक मचाक आवाज करतोस. अरेरे. बरोबर आहे तुझ्या गर्ल्फ्रेंडचं. मलाही खुप राग येतो कुणी मचाक मचाक केलं तर.
तोंड मिटुन घास चावत जा. आवाज येणार नाही.

हा प्रोब्लेम बर्‍याच लोकांना आहे.ऑफिसला जायची गडबड मग भरभर जेवणे थोडा आवजा होतोच . आणि आवाज करायचा नाही म्हटले तर अगदी गाई-म्ह्शी सारखे रवंथ करावे.

असं काही नाहीये. भराभर खाताना ही नाही येत आवाज. निदान माझा तरी.

ऋ, शीर्षक 'खाताना तोंडाचा मचाक मचाक आवाज' असं पुढच्या नंबरची वाईट सवय म्हणुनही चाललं असतं. Happy

दोन मुद्दे आहेत,

१. समोरच्याचे मत ग्राह्य मानून स्वतःमध्ये बदल करावासा वाटणे आणि त्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न करणे - फारच कठीण गोष्ट आहे मात्र....बाकी तोंडातून येणारा आवाज बंद करणे सहज जमून जावे असे वाटते. एकदा बंद झाला की पुढ्ची समस्या(अपेक्षा) येईलच समोर तुमच्या, तेव्हा शुभेच्छा!

२. आपल्याला आवडणारा माणूस जसा आहे तसा स्वीकारणे, नात्याचे यश टिकविण्याचे हेच गुपित आहे असे समजा...

एका नाजूक विषयावर सल्ला हवा आहे.>>
हर बुधवार शाम ६ से ९ बजे, पुराने रेल्वे स्टेशन के सामने.
डॉ. कुछतो गडबड हैदया.

ताक नेहमी प्रमाणे जिलबी वाचलेली नाही. अजुन थोड्या प्रतिक्रिया आल्या की प्रतिक्रिया वाचायला सुरु करु! असो..

ऋन्मेष, समस्या नाजूक आहे खरी.
मात्र ही समस्या तुझी नसून तुझ्या गर्लफ्रेंडची आहे.
हा एक प्रकारचा मानसिक आजार असून याला शास्त्रीय परिभाषेत 'मिसोफोनिया' असे नाव आहे. यात माणूस समोरच्याचा जेवताना होणारा आवाज टॉलरेट करू शकत नाही.
सध्या तुला ही सवय बदलायला सांगणे ही केवळ तिच्या आजाराची सुरूवात असू शकेल. ही एकप्रकारची सुप्रिमसी काँप्लेक्सची सुरूवात आहे. या माणसांच्या डोक्यात 'मी खाताना आवाज करत नाही म्हणजे फार उच्च आणि दुसरा खाताना आवाज करतो म्हणजे फार नीच' अश्या भावना असतात. हळूहळू या भावना इतक्या तीव्र होतात की त्यांना तुम्ही केलेले कुठलेही आवाज चालत नाहीत. खालून किंवा वरून वारा जाणे/तुम्ही एका रूमात असताना वापरलेल्या टॉयलेटमधला विसर्जनाचा /फ्लशचा आवाज त्यांना डोक्यात राख घालायला लावू शकतो. हळूहळू दुसर्‍याच्या निव्वळ हालचालींनी होणारा आवाजही यांना सहन होत नाही.
दुसर्‍याची प्रत्येक गोष्ट बदलायची सवय लागली की हे लोक समोरच्याचे अस्तित्वावरच क्वेश्चन केल्यासारखे वागू लागतात.

आता तू म्हणतोयस की लहानपणापासून तुझ्या जेवनशैलीचे सर्वत्र कौतूक होत होते. बाजूचा अनोळखी माणूसही कौतुक करायचा.मग यातल्या एकालाही तुमच्या 'मचाक मचाक' (संस्थळाचे नाव नाही, आवाज) चे इरिटेशन न होता फक्त तुझ्या गर्लफ्रेंडलाच हा त्रास का होतो.
तर कृपया गर्लफ्रेंडला योग्य सायकिअ‍ॅट्रिस्ट्ला दाखवून तिचे इवॅल्यूएशन आत्ताच करून घे. तुमच्या एरियातले चांगले डॉक्टर हवे असतील तर मला विपू कर कारण मी ही सहा वर्षे सँडहर्स्ट रोडलाच रहात होते, मला तिथले सगळे चांगले डॉक्टर्स माहिती आहेत.(किंवा होते म्हणूया आता)
भावी आयुष्याकरिता तुला आणि गफ्रेला शुभेच्छा!

तोंड मिटून जेवणे, भुरके, मिटक्या जाणिवपुर्वक टाळणे, चमचे आणि दात यांचा संघर्ष न होऊ देणे, घास चावताना दातांच्या रांगात कमीत कमी अंतर ठेवणे, घास चावताना अधिक तोंड उघडले तर मचमच आवाज येतो.
आपणच असे विविध प्रयोग करून पाहिले तर अवांतर धागे उघडावे लागत नाहीत आणि स्वतःचा व इतरांचा खूप वेळ वाचतो.
निदान आपल्या वयाला शोभतील अशा विषयांवर तरी धागे काढावेत. हा धागा इयत्ता दुसरीच्या मुलाचा वाटतोय.

असोच...

ओठ बंद ठेवुन जेवन जेवल्यास आवाज होणार नाही. Table manners पण हेच सांगतात.
अवांतरः साधारण पणे माझं नरीक्षण असं आहे की बंगाली लोक जेवण करतानी खुप मचाक मचाक आवाज करतात. त्यात ताटात मासा असेल तर ...

रुंमेश भाऊ - साती ताईंची प्रतिक्रीया २ वेळेला वाचा. अजुन वेळ गेली नाही, लवकर अ‍ॅक्शन घ्या.

अहो आधीच गफ्रे कावलीय च्या मचाक मचाक मुळे. अन आता तो तिलाच सायकॅट्रिस्ट कडे नेतो म्हणाला तर ... सातीताई ऋन्मेष चा ब्रेकप करूनच सोडणार असे दिसते Wink Happy
अर्थात ऋन्मेषचा माबो अ‍ॅटिट्युड बघता तरी तो माझेच कसे बरोबर अन तुझ्याच थिंकिंग मधे समस्या आहे असेच अर्ग्युमेन्ट करेल ही शक्यता जास्त वाटते Happy

अर्थात ऋन्मेषचा माबो अ‍ॅटिट्युड बघता तरी तो माझेच कसे बरोबर अन तुझ्याच थिंकिंग मधे समस्या आहे असेच अर्ग्युमेन्ट करेल ही शक्यता जास्त वाटते>>>>+१११११

तोंड बंद ठेऊन जेवायचे>>>>>:हाहा: ऋला जमेल हे?:फिदी: तो इथेच येऊन दररोज एवढी नेटी बडबड करतो, मग प्रत्यक्षात किती बोलत असेल. बोलका पोपट कुठला.:फिदी::दिवा:

सायलेन्सर लावा.........................................

तिच्या कानांना?!

मैत्रेयीताई, ब्रेकप तर ब्रेकप!
पण आत्ताच अ‍ॅक्शन घ्यायला हवी.
अ स्टीच इन टाईम सेव्हज ७८६!

यात अतिशयोक्ती अज्जिबात नाही. मिसोफोनिया लिहून गुगला.

ब्रेकप तर ब्रेकप! >>> असं आपल्याला म्हणायला सोप्पंय की . ज्याचा होईल ब्रेकप तो म्हणेल का ब्रेकप तर ब्रेकप?!! Happy
ती डिसॉर्डर वगैरे अस्तित्वात असेलही तुम्ही म्हणता तशी. पण या केस मधे ती डिसॉर्डर हे कारण आहे की ऋन्मेष खरंच इतका इरिटेटिंग आहे आपल्याला काय माहित**! ( **हे आपलं मॅनर्स म्हणून Wink ) डायरेक्ट तिचेच डायग्नोसिस केलंत म्हणून म्हटले Happy

मैदेवींशी सहमत आहे. जेवताना होणार्‍या आवाजावरून इतर कोणी आजवर बोलले नाही म्हणजे गर्लफ्रेंडला उपचारांची गरज आहे हा निष्कर्ष अचाट आहे.

ऋन्मेष, सहजीवनात काही गोष्टींशी तडजोड केली जाते तशी ह्या बाबतीतही आहिस्ता आहिस्ता होईल. 'मी प्रयत्न करत आहे' असे सांगत राहा. ओठ मिटून खात राहा. गर्लफ्रेंडची एखादी अशी (काल्पनिक) गोष्ट शोधा जिच्याबद्दल तुम्ही असे म्हणू शकाल की ती (गोष्ट) तुम्हाला इर्रिटेटिंग वाटते. ही काही फार मोठी रिस्क नाही. मुली तडकतात, समर्थने देतात पण त्यांना निदान ह्याची जाणीव तरी होते की आपल्यातीलही एखादी गोष्ट न आवडण्यासारखी आहे. ब्रेक अप होणार नाही अशीच गोष्ट शोधा. ड्रेसिंग सेन्स, कलर चॉईस, आवाजाचा व्हॉल्यूम वगैरे! नम्रपणे सुरुवात करा. जणू 'त्या गोष्टीत बदल घडवून आणण्यास तुम्ही तिला पाठबळ देऊ करणार आहात' असा संवाद घडवा. तसेच, मायबोलीकरांना इतरही काही कामे असतात ह्याचे भान ठेवता आले तर बघा.

-'बेफिकीर'!

ऋन्मेष,
प्रेमे करताय ना? बाकी एकमेकांना न आवडणार्‍या अनेक गोष्टी लग्नानंतर पण उघड होतातच. तुमच्या केस मध्ये इंटरॅक्शन बर्‍याच वर्षांची असल्याने आधी झाल्या इतकंच.
छोटी गोष्ट आहे, सुधारता आली तर बघा.तिची एखादी अशीच गोष्ट खटकत असेल तर व्यवस्थित पोलाइटली सांगा.
प्रेम् लग्न/विदाउट प्रेम लग्न म्हणजे सगळं काही गोड गोड पुरणपोळी बासुंदी नसणार. थोडे खटकणारे मुद्दे असतातच.
हळूहळू एक एक पाऊल चालत जवळ या(उपमा अलंकार. दो कदम तुम चलो वगैरे...नहितर मग एक एक पाऊल चालत राहिलो टक्कर झाली डोकी आपटली म्हणून मला दोष द्याल Happy )

Pages