कालचा दिवसच 'विराट' होता
काल कुठलीही ईडा-पीडा भारतीय संघाला छळणार नव्हती, कुठल्याही अतृप्त आत्म्याची बाधा होणार नव्हती, कुणाचे शिव्या-शाप भोवणार नव्हते कारण कालचा दिवसच भारतीय संघासाठी 'विराट' होता.
काल कुठलीही ईडा-पीडा भारतीय संघाला छळणार नव्हती, कुठल्याही अतृप्त आत्म्याची बाधा होणार नव्हती, कुणाचे शिव्या-शाप भोवणार नव्हते कारण कालचा दिवसच भारतीय संघासाठी 'विराट' होता.
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा चालू आहे. २०-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका उरकली आणि मानाची कसोटी मालिका सुरू झाली आहे. कसोटी मालिका मानाची, महत्वाची का असते हे हाडाच्या क्रिकेटप्रेमीला सांगायची गरज नाही. अश्यात चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना होताच उर्वरीत सामन्यांपासून रजा घेत संघाचा कर्णधार आणि सर्वात महत्वाचा खेळाडू मायदेशी परत येणार आहे. आणि याचे कारण आहे पालकत्व रजा. जी अधिकृतरीत्या आमच्या ऑफिसमध्ये अस्तित्वातच नाही. कारण पुरुषाला एका बापाला या प्रसंगी तिथे उपस्थित राहणे आणि त्यानंतरही सुरुवातीच्या दिवसांत कुटुंबासोबत राहणे गरजेचे आहे हा विचारच नाही.