लेखन
|| श्री ||
कुमार माझा सखा! - डॉ. चंद्रशेखर रेळे
पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वेगळंच वळण दिलं हे सर्वश्रुतच आहे. विष्णु दिगंबर आणि त्यांच्या गांधर्व महाविद्यालयानं अनेक गायक व शिक्षक तयार केले. त्यांपैकीच एक प्रो. बी. आर. देवधर. विष्णु दिगंबरांनी ज्यांना गायनाबरोबरच शालेय शिक्षणाचीही परवानगी दिली, असे देवधर हे एकमेव विद्यार्थी. कलाशाखेची पदवी मिळवलेले देवधर मास्तर हे त्या काळी एकमेव शिक्षित असे गायक होते. विष्णु दिगंबरांच्या परवानगीने त्यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही धडे गिरवले होते.
कोकणसय
नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर - झाला अनंत हनुमंत
१ जानेवारी १९०८ रोजी, वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. संगीत मदालसा, संगीत दामिनी ही पुढची नाटकंही बरीच गाजली. वन्स मोअर घेत घेत केशवराव अख्खी रात्र प्रेक्षकांना गुंगवून ठेवत. आनंदराव मेस्त्री, बाबुराव पेंटर यांचं नेपथ्यही चर्चेचा विषय झालं होतं. १९१३ साली वीर वामन जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकात प्रथमच कंपनीनं लाल, मखमली पडदा वापरला. असे अनेक पायंडे कंपनीनं पुढे पाडले, अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले.
तुझं जाणं..
हॅप्पी न्यु इयर!
खरं तर मायबोली सापडली आणि परदेशात माहेर सापडल्यागत झाले. बरेच दिवस फक्त वाचत होते, काही आवडले की दाद देत होते. हिंमत करून झुळूकेवर गेले त्या दिवशी गिर्याने ड्यु. आयडी असे घोषित करून मोठ्ठा दिवा दिला होता
शहरांच्या बीबीवर अम्मीने chinnu सगळीकडे फिरत आहे असा आरोपही केला होता.
सन्मीने मलम लावले म्हणून हिंमत करून लिहायला सुरूवात केली.
मायेची सय
बसले होते अशीच..
आभाळाचे पसरलेले असंख्य तुकडे गोळा करून,
प्रत्येक तुकडा वेगळा, अस्तित्वहीन..
गेल्या वर्षी श्रावणात वेचलेल्या पागोळ्या होत्या ओच्यात,
त्यांचं चांदणं ओवायचं होतं..
पण मनात होती अनामिक भीती..
पागोळ्या सांडल्या तर?
माझ्या आभाळाच्या विजोड चिंध्या झाल्या तर?
मग कुठून तरी आली मौनरवे हजारोंनी,
डोळ्यांत तरळली तुझी स्निग्ध नजर..
घेऊन आली माझी चिऊ-काऊची स्वप्ने..
आणि आई! क्षणाक्षणाला थरथरणारी पानं शांत झाली.
दरवळली जाई जुईची वेल..
क्षणात आभाळ चमकू लागलं,
चांदण्यांचा कशिदा खुलून आला,
मायेची सय मनाच्या डोहातून तरंगत गेली..
आई, तू जन्मोजन्मींची कुबेर..


