हॅप्पी न्यु इयर!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

खरं तर मायबोली सापडली आणि परदेशात माहेर सापडल्यागत झाले. बरेच दिवस फक्त वाचत होते, काही आवडले की दाद देत होते. हिंमत करून झुळूकेवर गेले त्या दिवशी गिर्‍याने ड्यु. आयडी असे घोषित करून मोठ्ठा दिवा दिला होता Happy शहरांच्या बीबीवर अम्मीने chinnu सगळीकडे फिरत आहे असा आरोपही केला होता. Happy सन्मीने मलम लावले म्हणून हिंमत करून लिहायला सुरूवात केली.
सुरूवातीला बर्‍याचदा 'कंपूशाही' वाटायची. पण तसे नाहीये, जसं लिखाण तशी दाद मिळत गेली. मित्रमैत्रिणी मिळाले. गझल आणि कविता प्रांतात मुळाक्षरे, अगदी बोट धरून शिकायला मिळाले. मैलांवरून पुस्तकं पाठवून चौकशी करणारी जीवाभावाची नाती मिळाली... खूप खूप शिकायला मिळाले..
असं बरंच लिहायचं आहे पण आवरते Happy

तर हे पान भेट दिल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि संपादक मंडळाचे खूपच आभार! (आता भो.आ.क.फ. :P)

अशी जीवाभावाची नाती अमर राहोत!
Long live Maayboli!!
Wish you a very happy new year!!

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन तुझ्या रंगीबेरंगी पानाबद्दल , होप आम्हाला भरपुर वाचायला मिळेल . तुला व तुझ्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या अनेक हार्दीक शुभेच्छा !!!
समस्त मायबोलीकरांना व त्यांच्या कुटुंबियांना नुतन वर्षाच्या अनेक हार्दीक शुभेच्छा !!!

धन्यवाद मंजु Happy
साधारणपणे मायबोलीकर गुलमोहोरावर पडीक असतात, पण रंगिबिरंगीच्या पानांवर कमी जातात. काही काही पानं छान असतात, जसं झक्कीकाका, सन्मी.. अशी बरीच नावं घेता येतील. मी सर्वांपुढे यत्किंचित, तरी माझ्यावर एवढा लोभ दाखविल्याबद्दल मनापासून धन्यवाद!