लेखन

मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!

Submitted by मुग्धमानसी on 22 September, 2018 - 03:48

मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!

उगवलेल्या प्रत्येक दिवशी मी गोळा करते...
हाती लागतील तेवढे सारे गडद फिके रंग
इथून तिथून जमा केलेले काही आकार-उकार
आणि डोळ्यांत ओतायला थोडे भाव थोडी झिंग
पण रोज उठून मीच बनवलेलं माझंच शिल्प वेगळं दिसतं
संध्याकाळपर्यंत अनोळखी वाटू लागतं
त्यात मला माझं रूप काही केल्या आढळत नाही
मला माझी लायकी काही केल्या सापडत नाही!

शब्दखुणा: 

लोपला साधेपणा ही खंत आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 September, 2018 - 03:17

ग्राह्य का धरता तिला, की संत आहे ?
सहनशक्तीला तिच्याही अंत आहे

अमरवेलीसारखे हे एकटेपण !
जीवघेणे वाटते अत्यंत आहे

दोष रक्तातील करते दूर सारे
कारले कडवट जरी.....गुणवंत आहे

येत गेल्या अनुभवांचे दुःख नाही
लोपला साधेपणा ही खंत आहे

सोहळ्यांना होत गेले पारखी... पण
आसवांनी मी तशी श्रीमंत आहे

फक्त ह्या सुर्यामधे हा दाह नाही
गाडला पृथ्वीत तंतोतंत आहे

सुप्रिया

विषय: 

प्रेम म्हणजे....

Submitted by Asu on 21 September, 2018 - 00:26

प्रेम म्हणजे....

प्रेम म्हणजे विड्याचे पान असते
चुन्याचा दाह अन् काथ्याचा कडवटपणा,
गुलकंदाचा गोडवा अन् सुपारीचा तुरटपणा,
नाजूक हाताचा स्पर्श होता जिभेवर लाल दिसते.

प्रेम म्हणजे आपट्याचे पान असते
एकमेकांच्या मिठीत मिटता
एकदुजाचे भान नसते
दोन हृदयांना एकीची आण असते.

प्रेम म्हणजे नजरेची नशा असते
डोळ्यातून हृदयात उतरलेली
जगण्याची आशा असते
चढली तर मात्र दुर्दशा असते.

शब्दखुणा: 

आरत्यांमध्ये जादाचे शब्द घालून म्हणायची प्रथा कोणी व कधी सुरु केली?

Submitted by Parichit on 19 September, 2018 - 06:05

पुण्यात आल्यापासून गणेशोत्सवात एक गोष्ट अनुभवली आहे. इथे श्री गणेशाची आणि इतर आरत्या थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हटल्या जातात असे माझे मत आहे. मूळच्या आरती मध्ये काही जादाचे शब्द घातले गेले आहेत. जसे कि उदाहरणार्थ...

जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती
जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी

मराठी भाषा दिन

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 19 September, 2018 - 00:47

"झालंय ना ते..?"
"हो...आता हॅंडबिलाचं राहिलंय,चंदू करतो म्हणतंय"
"चंद्या करेल पण फक्त त्याला आठवण कर..परत काळे पर्यंत जायला नको,त्या टकल्याला तेवढंच पाहिजे असतंय"
"कधी येणारेत..?"
"कोण काळे ? येईल कि संध्याकाळपर्यंत.."
"अरे काळे नाही,साहेब कधी येणारेत ?"
"साहेब..सांगितलंय उद्या संध्याकाळी येतील म्हणून,पण बघू काय काय होतंय.."
"आयला तुझ्या घरी येणारेत ना साहेब ? भाऊ लय हवा करतोय आजकाल.."
"तर काय ? राहुल्या तूपण जरा अक्कल चालवली असतीस तर आपला २ दिवसाचा कार्यक्रम मंजूर होत होता"

विषय: 
शब्दखुणा: 

सुंठीची कढी

Submitted by मनीमोहोर on 18 September, 2018 - 18:48

कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.

शब्दखुणा: 

३१०

Submitted by मिलिंद महांगडे on 17 September, 2018 - 04:24

गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून सकाळी उतरताना मी कुर्ला स्टेशनात अक्षरशः फेकलो जातो . ट्रेन जर सजीव असती तर हे दृश्य ट्रेनला झालेली ओकारी असं काहीसं दिसलं असतं . ट्रेनमधून उतरल्यानंतर नेहमीचा कार्यक्रम , उतरताना आपल्याला ज्याने ज्याने मागून ढकलले , त्याच्याकडे रागाने पाहणे , मनातल्या मनात त्याला चार शिव्या देणे आणि पुढचा रस्ता धरणे ! तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर मी आमच्या नेहमीच्या ३१० नंबरच्या बसकडे वळतो . ३१० नंबरची बस कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन यादरम्यान असलेल्या बीकेसी मधून जाते .

शब्दखुणा: 

दरवर्षी असं होतं...

Submitted by हरिहर. on 16 September, 2018 - 00:48

‘नेमिच येतो पावसाळा’ असं म्हणण्यात काही अर्थ राहिला नाही आजकाल. तो कधीही येतो. कधी कधी येतही नाही. लहरी झालाय तो माणसांसारखाच. मात्र पंचांगाप्रमाणे श्रावण येतो आणि मागोमाग भाद्रपदही येतो. पण श्रावण आला की बायको वैतागते आणि भाद्रपद आला की मुलगी चिडते. निमित्त श्रावणाचं आणि भाद्रपदाचं असलं, तरी या वैताग आणि चिडचिडीला कारण असतो मी. म्हणजे श्रावण आला की मी अचानक फार काटेकोर, रूढीप्रिय वगैरे होतो. अर्थात मला फायद्याच्या असणाऱ्या रूढी आणि परंपराच मी पाळतो हा भाग वेगळा. श्रावणात मी एकही उपवास करत नाही. मला झेपतच नाही उपवास. पण बाकीच्या गोष्टी मात्र मी अगदी कसोशीने पाळतो.

विषय: 
शब्दखुणा: 

" जेथे कर माझे जुळती "

Submitted by jayantshimpi on 16 September, 2018 - 00:44

मित्रांनो, नुकतेच वर्तमानपत्रातून वाचनात आले की, सर्व माजी खासदार वा आमदार यांना तह-हयात पेन्शन कां म्हणून दिले जाते याचे स्पष्टीकरण न्यायालयाने, केन्द्र सरकारकडे मागितले आहे. आता यातील काही खासदार/आमदार वा पूर्वी कधीतरी मंत्री म्हणून काम केलेले,काहीजण सक्रिय राजकारणात असतील वा नसतीलही. पण असे कितीजण खरोखरच्या सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेत असतील हा संशोधनाचा विषय असू शकतो. हा प्रश्न पडण्याचे कारण :-

विषय: 

अशी सांजवेळ

Submitted by Asu on 15 September, 2018 - 01:53

अशी सांजवेळ

दिवस नाही रात्रही नाही
संधीची वेळ
अशी सांजवेळ

दिवसाचा आधार गेला
रात्रीचा अंधार आला
भुतं लागली नाचायला
मनाची हुरहूर
अंगाची हुुळहुळ,
अशी सांजवेळ

संगतीची तहानलेली
विरहाने ठसठसलेली
घरात असून एकटं करणारा
नको त्या विचारांचा खेळ
अशी सांजवेळ

दिव्याच्या ज्योतीवर
नाचताय सावल्या
भातुकली खेळताय
भुतांच्या बाहुल्या
आवाज येतात कुठून
धस्स होतं पोटात
रामराम येतं ओठात
असती सारे मनाचेच खेळ
अशी सांज वेळ

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन