प्रेम म्हणजे....

Submitted by Asu on 21 September, 2018 - 00:26

प्रेम म्हणजे....

प्रेम म्हणजे विड्याचे पान असते
चुन्याचा दाह अन् काथ्याचा कडवटपणा,
गुलकंदाचा गोडवा अन् सुपारीचा तुरटपणा,
नाजूक हाताचा स्पर्श होता जिभेवर लाल दिसते.

प्रेम म्हणजे आपट्याचे पान असते
एकमेकांच्या मिठीत मिटता
एकदुजाचे भान नसते
दोन हृदयांना एकीची आण असते.

प्रेम म्हणजे नजरेची नशा असते
डोळ्यातून हृदयात उतरलेली
जगण्याची आशा असते
चढली तर मात्र दुर्दशा असते.

प्रेम म्हणजे रेशमाचे बंधन असते
तनामनांचे संधान असते
विटले तर जिवंत मरण असते
तुटले तर चंदनी सरण असते.

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults