लेखन

ओढ

Submitted by Asu on 27 September, 2018 - 23:06

ओढ

ओठ न विलगता
हाक ऐकू यावी
ऐकले न ऐकले
मनास भ्रांत व्हावी

चारचौघात कशी रे
तुजला मी खुणावू
प्रेम न माझे उठवळ
कशी तुज समजावू

शब्दांवाचून तुजला
कळेल का मनातले
भावभावनांचे नाते
नसते रे क्षणातले

गंध निशिगंधाचा
दरवळतो जनात
अव्यक्त भावनांचा
परि रेंगाळतो मनात

अव्यक्त प्रीत माझी
कुणा ना दिसावी
चकोरासम चांदण्याची
एकमेकां ओढ असावी

शब्दखुणा: 

सूरबावरी राधा

Submitted by Asu on 26 September, 2018 - 23:11

सूरबावरी राधा

अलवार भावनांचे
नकोच गीत गाऊ
सूर तरंग येता कानी
कुठे शोधण्या जाऊ

मिटताच डोळे एकांती
तव रूपाची होई भ्रांती
उघडताच क्षणी परंतु
सर्वत्र केवळ शांती

वारा हळुवार कानी
तव निरोप मजला देतो
अस्तित्व अन् माझे
हिरावून संगे नेतो

सूर बासरीचे शोधित
फिरते रे पुन्हा पुन्हा
लपलास कुठे सजणा
मज सांग ना रे कान्हा

प्रेमाची मी भुकेली
राधा तूझी मुकुंदा
मज दर्शन दे एकदा
ऋणी राहीन रे सर्वदा

शब्दखुणा: 

भुरळ .... Love and Lust

Submitted by अनाहुत on 26 September, 2018 - 10:37

त्याने त्याचे फेसबुक अकाउंट open केलं . एक friend request होती त्याने ती check केली . sweet sneha या नावाने friend request होती . या fake accounts च काय करायचं आणि कशाला कोण उगाचच मुलीच account बनवून बसतात काय माहित आणि त्यातून वर आणखी friend request टाकत बसतात काय माहित . पण जाऊदे आपण तरी एव्हढा कशाला विचार करायचा . करूया आपणही accept . काय फरक पडतो . त्याने accept वर click केलं आणि तो स्वतःची timeline check करू लागला. तेच ते नेहमीच , बस दोघाचे नवीन pic आणि त्याच त्या नेहमीच्या शेकडॊवेळा repeat झालेल्या posts ....

शब्दखुणा: 

नेत्यांच्या बोलण्यावर लगाम हवा,

Submitted by ashokkabade67@g... on 26 September, 2018 - 04:57

सत्ताधारी असो वा विरोधी . नेत्यांच्या जिभा सैल सुटायला लागल्यावर त्याचे परिणाम जाणवत असतात नेते जनतेपुढे काय आदर्श ठवतात यावर काही बंधन असायला हवे, नेते बरं,ळतात त्यातून अनेक वाद निर्माण होत असतात समाज ढवळून निघत असतो. या साठी नेत्यांच्या बडबडणयावर बंधन आणायला हवे, आणि आक्षेपारह्य विधान करणारया आमदार खासदारांचे पद रद्द करण्याची सोय असावी तसा कायदा करायला हवा .

विषय: 

प्रेमळ वाट

Submitted by Dev13 on 26 September, 2018 - 02:59

थोडं माझं ऐकून घेशील का
येऊन माझ्याजवळ डोळ्यात माझ्या पाहशील का
या डोळ्यांत फक्त प्रेम तुझ्यासाठी आहे
या मनाला तुझीच आस आहे
जीवाला ध्यास तुझाच आहे
माझ्या हृदयाची खास तूच आहेस
जबरदस्ती नाही ग माझी तुझ्यावर
तू माझ्यावर प्रेम करावं
माझं प्रेम स्वीकारावं
तुझ्या मनाला वाटेल ते कर पण
एकदाच माझ्या हाताला स्पर्श कर
आयुष्याभर तू सुखी रहावी
असं मनापासून वाटतं
मी तुला आवडत नाही पण
मला तुझ्यासोबत जगावं वाटतं
पण ते शक्य नाही
तुझ्या हाताचा स्पर्श असाच साठवून ठेवीन
तोच आठवत आठवत जगत राहीन

विषय: 
शब्दखुणा: 

पूर्वीची मी ..... आताची मी

Submitted by किल्ली on 25 September, 2018 - 06:44

पूर्वीची मी साधा विनोद ऐकला तरी फिदीफिदी हसत असे
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे खळाळून वाहत असे ।
आता अख्खी विनोदी गोष्ट वाचली तरी हसू येत नाही
कुणी खिंकाळून हसलं तर आवडतही नाही ।।

पूर्वीची मी भुक्कड अशी खादाडी करत हिंडत असे
बिनधास्तपणे रस्त्यावर भैयाकडची पाणीपुरी हाणत असे ।
आताशा चटपटीत चाट हायजिनिक वाटत नाही
कुणी खात असेल तर आवडतही नाही ।।

पूर्वीची मी कुठलाही विषय घेऊन अखंड बडबड करत असे
अनंतकाळ वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वाचा यज्ञ करत असे ।
आता चुकूनही जास्त बोलायला आवडत नाही
कुणी बडबडत असेल तर आवडतही नाही ।।

विषय: 
शब्दखुणा: 

‘अनुभव’चा अनुभव

Submitted by Asu on 24 September, 2018 - 08:27

आम्ही ‘अनुभव हॉलिडेज’ तर्फे दि.१५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०१८ च्या दरम्यान ‘कोस्टल कर्नाटकची’ टूर केली त्या निमित्ताने -
‘अनुभव’चा अनुभव

जन्मा येऊन एकदा तरी
‘अनुभव’सह सैर करावी
साईट सीर्इंग सोडूनच द्या
जेवणामध्येच वसूल करावी

गडबड नाही गोंधळ नाही
आरामात करावे सर्व काही
घरची माणसं आपली सारी
वाटे आपण आपल्याच घरी

पैशाचा हिशोब काही
पैशामध्येच होत नाही
पैसे तर सगळेच घेतात
त्याहून भरपूर हे देतात

प्रेम

Submitted by Dev13 on 24 September, 2018 - 07:48

हवं हवं वाटणार प्रेम कधी कधी नको वाटते
इतरांच्या डोळ्यातले पाणी पाहून आपल्या ही डोळ्यात पाणी दाटते
प्रेमासाठी वाटेल ते करणारी couple पाहिली
प्रेमासाठी जीव देणारी नि जीव घेणारी ही पाहिली
व्यक्ती प्रेम आयुष्यभर करण्याचं वचन देते
खूप प्रेम करणारी व्यक्ती
तीच व्यक्ती काही काळानंतर अर्ध्यावर सोडून निघून जाते
काहींची परिस्थिती काहींची जात~पात
आडवी येते
प्रेमाची दोरी मध्येच तोडली जाते
जी व्यक्ती सावरते
दुःखाला आवरते
ती सुखी राहते
पन जी सावरू शकत नाही
स्वतःला आवरू शकत नाही
ती मात्र जीवाशी मुकते

विषय: 
शब्दखुणा: 

व्यक्तिचित्रण - "माया" - मनस्विता

Submitted by मनस्विता on 23 September, 2018 - 13:22

सध्या राहते त्या सोसायटीमध्ये राहायला येऊन साधारण १५ वर्षे झाली. नुकतीच राहायला आले तेव्हा इथे राहणाऱ्या लोकांच्या थोड्याफार ओळखी होत होत्या. तशी आमची सोसायटी छोटेखानी म्हणजे तीन बिल्डिंगचीच आहे. आणि सोसायटीत मध्य भागात एक कट्टा आहे तिथे महिलामंडळ बसलेलं असतं. तर संध्याकाळी चक्कर मारायला बाहेर पडलं की महिलामंडळाची भेट व्हायची. तिथल्या काकवांचा वयोगट साधारण ४०-४५ च्या पुढचा. छान गप्पा, हसणे-खिदळणे ऐकू यायचे. पण त्यांच्यात अजून एक दणदणीत आवाज ऐकू यायचा. आणि व्यवस्थित पाहिले तर त्या ग्रूपमध्ये सर्वांच्या मानाने खूपच तरुण आणि उत्साही 'ती' दिसायची.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन