Mumbai

३१०

Submitted by मिलिंद महांगडे on 17 September, 2018 - 04:24

गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून सकाळी उतरताना मी कुर्ला स्टेशनात अक्षरशः फेकलो जातो . ट्रेन जर सजीव असती तर हे दृश्य ट्रेनला झालेली ओकारी असं काहीसं दिसलं असतं . ट्रेनमधून उतरल्यानंतर नेहमीचा कार्यक्रम , उतरताना आपल्याला ज्याने ज्याने मागून ढकलले , त्याच्याकडे रागाने पाहणे , मनातल्या मनात त्याला चार शिव्या देणे आणि पुढचा रस्ता धरणे ! तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर मी आमच्या नेहमीच्या ३१० नंबरच्या बसकडे वळतो . ३१० नंबरची बस कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन यादरम्यान असलेल्या बीकेसी मधून जाते .

शब्दखुणा: 

एकतर्फी प्रेम - मुंबई

Submitted by रसप on 24 June, 2014 - 00:18

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समधलं काम दुपारीच संपलं. मित्राला फोन केला. त्याला संध्याकाळशिवाय ऑफिसातून निघणं शक्य नव्हतं. जवळजवळ ३ तास होते. लगेच बस पकडली आणि चर्चगेटला आलो. 'सुखसागर' मधला 'नीर डोसा' हादडला आणि जवळच असलेल्या मरीन ड्राईव्हला आलो. कट्ट्यावर चढून ओबेरॉय हॉटेलपर्यंत चालत गेलो आणि परत आलो. मोकळी जागा बघून बसलो. त्या अनंत जलाशयाच्या लाटा फेसाळत समोरच्या उभट, गोलसर, त्रिकोण वगैरे आकाराच्या सिमेंटच्या दगडांवर फुटत होत्या. मुंबईला येऊन, मरीन ड्राईव्हला बसून स्वत:शी, हवेशी, समुद्राशी गप्पा मारायची आजकाल अनेकांची एक काव्यात्म इच्छा असते. पण खरं तर इथे बसल्यावर मला काहीच सुचत नाही.

शब्दखुणा: 

पुनर्विकास - घराचा आणि आपलाही!

Submitted by kanchankarai on 2 July, 2011 - 04:48

रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास! पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.

Subscribe to RSS - Mumbai