हस्तकला

हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील - मागच्या वर्षीचा अ‍ॅड केला आहे

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 28 October, 2013 - 21:14

हा मागच्या वर्षी केलेला -

ह्याचे स्टेप बाय स्टेप फोटो नाही घेतले गेले :(. पंचकोनाला षटकोन चिकटवला आहे

20151109_105624.jpg20151109_153544.jpg

हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील -

विषय: 

क्रोशा फ्रॉक

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 October, 2013 - 03:18

खुप दिवसांपासुन मायबोलीवर अवल, जयवी-जयश्री आणि इतरांचे कोशा वर्क पॅटर्न पहात होते. आपणही करावे असे खुप मनाय यायचे ते पाहून. पूर्वी आई दोर्‍यावर विणकाम करायची. पण मला समजू लागले तोपर्यंत तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला म्हणून तिने सोडून दिले. पण तिने मला साखळी आणि खांब शिकवली होती. नंतर आजूबाजूचे पाहून कॉलेज लाईफच्या वेळी रुमाल वगैरे केले होते पण ते असेच पाहून केलेले होते. त्यात शास्त्रशुद्धपणा नव्हता. बेसीक नॉलेज नव्हते. कशाला काय बोलतात हेही माहीत नव्हते. शिवाय त्यात एवढा गॅप पडला होता. एकदा अवलच्या ऑनलाईन क्लासचे ऐकले. पण ऑनलाईन कितपत कळेल ह्याबद्दल मला शंकाच होती.

विषय: 
शब्दखुणा: 

भरतकाम - साडी आणि कुर्तीच्या बाह्या

Submitted by अश्विनी के on 21 October, 2013 - 01:30

१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच) Happy

फिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.
DSC_0071.jpgDSC_0074.JPG

ही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्‍यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.

शब्दखुणा: 

"पैठणी" - साडी मनातली

Submitted by salgaonkar.anup on 13 October, 2013 - 09:12

दसरयाच्या शुभेच्छा ….!!!!!
साधारण चार वर्ष उलटली असतील अजूनही तशीच जशी पहिल्यांदा पहिली होती. तोच भरजरी काठ, तेच नाचरे मोर सात. अनेक साड्यांच्या गर्दीत आपले अस्थित्व जाणवून देणारी "पैठणी"
एकाच गोष्टीची खंत, सरत्या काळात वापर फक्त दोनदाच. एकूणच महिलावर्गाच गणित अजूनकाही पुरुषवर्गाला उलगडलेलं नाही. आईची हि पैठणी नवीन रूपाच्या प्रतीक्षेत असावी कदाचित ……………………

कॉपर एनॅमलींग बोल्स

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आज एका वर्कशॉप मध्ये दोन कॉपर एनॅमल्ड बोल्स बनवले.

विषय: 

सकल कलांचा तू अधिनायक - अर्थात..क्रोशाचा गणपतीबाप्पा (अवल)

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 09:20

मायबोलीकर अवल, म्हणजेच आरती खोपकर सादर करतेय तिने स्वतः क्रोशाने विणलेला गणपतीबाप्पा, त्याचा उंदीर आणि मोदक. सोबतच तिचा ह्या विणकामाला प्रेरणा देणारा रोचक प्रवासही तिने लेखस्वरुपात दिला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------

सकल कलांचा तू अधिनायक ...गणपतीचे किती समर्पक वर्णन ! या कलांच्या अभिनायकाला त्याच्याच रुपात साकार करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न .

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "गणराज 'रंगी' नाचतो"

Submitted by संयोजक on 28 August, 2013 - 10:19

छोटुकल्यांच्या पालकांनो, आधीचं चित्र बदलून छोट्या दोस्तांसाठी खास मोठ्या आकाराचा बाप्पा बनवला आहे, त्यांना रंगवायला सोपं जावं म्हणून. हा डिजे बाप्पा...गाण्यावर नाचतोय. त्याला आपण आपल्या "रंगी" नाचवूयात. म्हणजेच रंगवूयात, म्हणून तर गणराज ‘’रंगी’’ नाचतो . चला तर मग...करा सुरुवात! Happy

Bappa 6_0.jpg

१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
४) वयोगट - ४-१० चित्रं रंगवा.

Pages

Subscribe to RSS - हस्तकला