मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "गणराज 'रंगी' नाचतो"

Submitted by संयोजक on 28 August, 2013 - 10:19

छोटुकल्यांच्या पालकांनो, आधीचं चित्र बदलून छोट्या दोस्तांसाठी खास मोठ्या आकाराचा बाप्पा बनवला आहे, त्यांना रंगवायला सोपं जावं म्हणून. हा डिजे बाप्पा...गाण्यावर नाचतोय. त्याला आपण आपल्या "रंगी" नाचवूयात. म्हणजेच रंगवूयात, म्हणून तर गणराज ‘’रंगी’’ नाचतो . चला तर मग...करा सुरुवात! Happy

Bappa 6_0.jpg

१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
४) वयोगट - ४-१० चित्रं रंगवा.
५) वरील चित्राची प्रिंट लॅण्डस्केप मोड मध्ये काढून ते रंगवणे अपेक्षीत आहे व आपल्या पाल्याने रंगवलेले ते चित्र स्कॅन करा किंवा त्याचे छायाचित्र/फोटो काढा व इथे अपलोड करा.
६) चित्रं गणेश चतुर्थीपासून, ९ सप्टेंबर २०१३ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १८ सप्टेंबर २०१३ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
७) चित्रं पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता ९ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
८) 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
९) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१३ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
४) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
गणराज 'रंगी' नाचतो - मायबोली आयडी - पाल्याचे नाव
५) विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यु) मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.
६) शब्दखुणा या चौकटीमध्ये मायबोली गणेशोत्सव २०१३ हे शब्द लिहा.
७) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकूरात प्रकाशचित्र टाका. यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व' मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' सजवलेल्या बाप्पाची इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb इतकेच असू द्या.
८) मजकूराच्या चौकटीखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
९) त्याच्या खाली पाल्याचे नाव, वय याची माहिती लिहा.
१०) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
११) Save ही कळ दाबा.
१२) जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

मग लागा बघू तयारीला, बच्चेकंपनीने रंगवलेल्या त्यांच्या बाप्पाचे गोंडस रूप पाहायला सगळेजण उत्सुक आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

५) आपल्या पाल्याने रंगवलेले चित्र स्कॅन करा किंवा त्याचे छायाचित्र/फोटो काढा व इथे अपलोड करा.>>> इथे गणपतीबाप्पाचे चित्र असं हवं ना?

........ - मायबोली आयडी - पाल्याचे नाव >>> टिंब टिंब म्हणजे काय? रंगवलेल्या चित्राला शीर्षक द्यायचे आहे का?

अल्पना + १.
चित्रांच्या पुस्तकातलं चित्र रंगवलेलं चालेल का?

धन्यवाद संयोजक.
वरच्या मजकुरामध्ये पण हे लिहीणार का? वर लिहिलेल्या मजकुरावरुन हे स्पष्ट होत नाहीये. Happy

वरील चित्राची प्रिंट काढून ते रंगवणे अपेक्षीत आहे.>>> Uhoh हे नियमांमधे, मजकुरामधे कुठेही स्पष्ट होत नाहीये.
दुसरी गोष्ट म्हणजे हे चित्र सेव केले तर छोट्या आकारात सेव होते आहे, आकार वाढवला तर रेषा धुसर होत आहेत. यावर योग्य उपाययोजना सुचवा.

मंजू, प्रिंट घेवून बघितलंस का? माझ्याकडे सध्या प्रिंटर नाहीये. कदाचीत प्रिंट व्यवस्थित येईल ए४ वर.

अल्पना, आकार लहान (म्हणजे वरच्या चित्राएवढा) असेल तर प्रिंट नीट येते आहे, पण एवढ्या लहान आकाराचं चित्र ४ ते ६ वर्षांच्या मुलांना रंगवता येणं अवघड आहे माझ्यामते.

चित्र रंगवणे उपक्रम ५/६ वर्षाच्या मुलांपर्यंत ठिक आहे. त्यापेक्षा मोठ्या मुलांना स्वतःच एखादे गणपतीचे चित्र काढुन / रंगवुन पाठवायला सांगायला हवे असे वाटतेय.

एवढ्या लहान आकाराचं चित्र ४ ते ६ वर्षांच्या मुलांना रंगवता येणं अवघड आहे माझ्यामते. >>+ १ मोठ्ठं चित्र असेल तरच रंगवता येतं या ४-६ वर्षांच्या मुलांना.

चित्र रंगवणे उपक्रम ५/६ वर्षाच्या मुलांपर्यंत ठिक आहे. त्यापेक्षा मोठ्या मुलांना स्वतःच एखादे गणपतीचे चित्र काढुन / रंगवुन पाठवायला सांगायला हवे असे वाटतेय. >>>यासाठीसुद्धा +१

सावली,
चित्र रंगवणे उपक्रम ५/६ वर्षाच्या मुलांपर्यंत ठिक आहे. त्यापेक्षा मोठ्या मुलांना स्वतःच एखादे गणपतीचे चित्र काढुन / रंगवुन पाठवायला सांगायला हवे असे वाटतेय...

याचा आधी विचार केला गेला होता पण या वर्षी उपक्रमांची संख्या जास्त असल्यानेतो रद्द करण्यात आला.६ वर्षांवरील मुलांसाठी बाप्पाला पत्र हा उपक्रम ठेवण्यात आला आहे.

कोणी काढली का प्रिंट ? <<< प्रिंट घेतल्यावर कागदावर चित्राचा आकार केवढा असेल याचा अंदाज येण्यासाठी खालील चित्रे (चित्रावर ठेवलेले मोबाईलचे सीमकार्ड विचारात घेऊन) बघा.

१. दिलेल्या चित्रावर राईटक्लिक करून प्रिंट केले तर पानाच्या वरच्या अर्ध्या भागात चित्र येतेय. ४ वर्षांची मुले कलर पेन्सीलने रंगवू शकतील. पण जरा जिकिरीचे होईल मुलांसाठी.
ganaraj_normal.JPG

२. दिलेले चित्र संगणकावर 'सेव्ह' करून MS Paint मधून 'लॅंडस्केप' छापले तर असे दिसते. हे रंगवणे सोपे होईल. पण रेषांचा रेखीवपण बिघडतोय.
ganaraj_landscape.JPG

संयोजक, थोड्या मोठ्या आकारातले* चित्र डाऊनलोड करण्यासाठी ठेवलेत तर बरे होईल.

* - लँडस्केपवर छापले तर रेषा रेखीव उमटतील अशा बेताचे.

धन्यवाद संयोजक Happy

मागच्या वर्षीसारखी हस्तकला स्पर्धा असणार आहे की नाही ? मागच्या वेळी भाग घेता आला होता म्हणून उत्सुकता Wink

गजानन, मुग्धानंद,

लवकरच लहान मुलांना रंगवण्यासाठी सुटेबल असं- मोठं आणि सुस्पष्ट चित्रं इथे देण्यात येईल. त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत.

क्षमस्व.

गुणी छोटुकल्यांच्या उत्साही पालकांनो,
वर अधिक मोठं आणि सुस्पष्ट बाप्पाचं चित्र टाकलं आहे. झालेल्या उशीराबद्दल दिलगीर आहोत.

संयोजक, प्रिंट लँडस्केप मोडमध्येच काढणे आवश्यक आहे का?

आमच्या घरी चूकून तिन पोट्रेट प्रिंट्स आल्यात चित्राच्या आणि पोराने त्यालाच रंगवायला सुरवात केलीये. परत सोमवारी लँडस्केप प्रिंट काढून रंगवतो का बघेन, पण जर त्याने परत रंगवायला नकार दिला तर आहे तेच चित्र अपलोड केलं तर चालेल का?