हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील - मागच्या वर्षीचा अ‍ॅड केला आहे

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 28 October, 2013 - 21:14

हा मागच्या वर्षी केलेला -

ह्याचे स्टेप बाय स्टेप फोटो नाही घेतले गेले :(. पंचकोनाला षटकोन चिकटवला आहे

20151109_105624.jpg20151109_153544.jpg

हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील -

पेपरटेल्स - हातकागद संस्था , शिवाजीनगर,पुणे ह्या संस्थेत आकाश कंदीलांचे प्रदर्शन लागले होते. तिकडे हा आकाश कंदील मनात भरला. त्यांच्याकडूनचं कागद घेतले.

साहीत्य -
२ शीटस वेगवेगळ्या रंगाचे हँडमेड कागद
२ शीटस पातळ कागद (आतून लावायला ज्यातून लाईट पास होईल असा)
कात्री
स्टेपलर
पट्टी
कर्कटक

कृती -

१. एकूण २४ गोल आणि २० त्रिकोण लागतात.

गोल - समभुज त्रिकोणाच्या ३ बिंदूतून जाणारे वर्तुळ काढायचे आहे. त्रिकोणाच्या कडांवर फोल्ड करायचे आहे.

त्रिकोण - त्याचं मापाचा समभुज त्रिकोण काढून प्रत्येक बाजूच्या शेजारी थोडी जागा ठेवून कापायचं आहे - ही जागा दोन पिस स्टेपलरने जोडताना उपयोगी पडेल.

२. मी १०.५ सेमी. मापाचा समभुज त्रिकोण काढला. त्याच्या प्रत्येक कोनाचे दुभाजक काढले, ते जिथे मिळाले तिथून काढलेले वर्तुळ ३ ही शिरोबिंदूतून पास झाले. ह्या टेंपलेट चे २४ गोल कापले.

३. पुन्हा एकदा १०.५ सेमी. चा त्रिकोण काढून त्याच्या प्रत्येक बाजू शेजारी थोडी जागा सोडली आणि त्या टेंपलेट चे २० पिसेस कापले.

४. असेंब्ली -

४ त्रिकोणांचा एक असे ५ युनिटस तयार होतील.

३ गोलांचा एक असे ८ युनिटस तयार होतील.

हे तयार केलेले युनिटस -

****** असेंबल करायच्या आधी मुख्य काम म्हणजे त्या त्रिकोण आणि गोलात काही डिझाईन काढून ते कापणे.( हे काम पूर्णपणे नवर्‍याने केले त्यामुळे मी आधी लिहायचं विसरून गेले ;)) . त्यानंतर त्या डिझाईन वर पातळ कागद चिकटवला.

आता मुख्य जोडाजोडी -

४ त्रिकोणांचं जे एक युनिट आहे त्याच्या प्रत्येक टोकाला एक असे ४ गोलांचे (३ गोलांचा एक असे जे युनिटस बनवले आहेत ते) युनिटस स्टेपलरने जोडायचे.

आता त्या प्रत्येक गोलाच्या युनिटच्या मधे त्रिकोणाच युनिट बनवलं आहे ते फिट करायचं आहे.

आता प्रत्येक त्रिकोणाच्या मधे उरलेले गोल बसवायचे आहेत.

हा झाला आकाश कंदील तयार -

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

vaa...

<त्रिकोण - त्याचं मापाचा समभुज त्रिकोण काढून प्रत्येक बाजूच्या शेजारी थोडी जागा ठेवून कापायचं आहे - ही जागा दोन पिस स्टेपलरने जोडताना उपयोगी पडेल.> इथेही वर्तुळेच वापरली तर चालेल का? बाजूला चिकटवायला /जोडायला आयत्या पट्ट्या मिळतील.???

सुंदर.

@ भरत, वर्तुळ येईल वापरता, खरतरं स्टेपल करताना ते सोपं पडेल कारण गोलाबाहेर भरपूर जागा होती आणि त्रिकोणाबाहेर कमी सोडली गेल्याने शेवटी शेवटी धरायला कठिण पडत होतं Happy

आयत्या पट्ट्या बघायला लागेल मिळतात का Happy

ओह ओके Happy

अरे वा. मी हाच कंदील गेले किती तरी वर्षे करत होतो. सध्या वेळ मिळत नसल्याने करायला होत नाही. Sad

Pages