"पैठणी" - साडी मनातली

Submitted by salgaonkar.anup on 13 October, 2013 - 09:12

दसरयाच्या शुभेच्छा ….!!!!!
साधारण चार वर्ष उलटली असतील अजूनही तशीच जशी पहिल्यांदा पहिली होती. तोच भरजरी काठ, तेच नाचरे मोर सात. अनेक साड्यांच्या गर्दीत आपले अस्थित्व जाणवून देणारी "पैठणी"
एकाच गोष्टीची खंत, सरत्या काळात वापर फक्त दोनदाच. एकूणच महिलावर्गाच गणित अजूनकाही पुरुषवर्गाला उलगडलेलं नाही. आईची हि पैठणी नवीन रूपाच्या प्रतीक्षेत असावी कदाचित ……………………
आज -कालच्या दुकानातल्या नवीन पैठण्या फारच सुंदर दिसतात, त्यावर केलेली बारीक कलाकुसर फारच भावली मला. मग ठरवलं आपण करून बघायचं. आईला न विचारता मी केलेला हा छोटासा प्रयत्न. पैठणी आणि जरदोसी असं नवीन काहीतरी. फक्त पदर (एक मिटर ) Neck बॉर्डर (दीड मीटर) design केली आहे.
लागलेला वेळ :- साधारण दोन आठवडे
अंदाजे खर्च :- ३०००/-(साडी वगळून)
सुरवात केली तेव्हा खूपच सोपी वाटणारी हि गंमत खरंच जरा कठीण आहे, म्हणूनच कदाचित किमती प्रचंड असतील. हळू हळू जसं काम पूर्ण होत गेलं तसं माझं मलाच खूप छान वाटू लागलं, माझा एकाच उद्देश आहे कि वापर अजून दोन-चार वेळा व्हावा म्हणून केलेला हा आटापिटा.
आईला आवडेल हि खात्री आहे, तुम्हालाहि आवडली ना ……. !!!!!
IMG_20131013_181846.jpgIMG_20131013_181918.jpgIMG_20131013_181944.jpgIMG_20131013_182029.jpgIMG_20131013_182116.jpgIMG_20131013_182200.jpgIMG_20131013_182231.jpgIMG_20131013_182231_0.jpgIMG_20131013_182301.jpgIMG_20131013_182339.jpgIMG_20131013_182359.jpgIMG_20131013_182459.jpgIMG_20131013_182534.jpgIMG_20131013_182558.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं सांगायचं तर मला हा प्रयत्न आवडला नाही. काही पारंपारिक गोष्टी तशाच बघायल बर्‍या वाटतात. त्याला डिझायनर लुक देऊ नये असं वाटतं.
(मी तुमची आई असते तर माझ्या पैठणीवर असे टिकल्या, खडे लावून केलेले प्रयोग मला आवडले नसते)

सायो+१

पैठणीपेक्षा नविन प्लेन साडी घेऊन त्याच्यावर तुमची कलाकुसर कराल तर ते जास्त छान दिसेल असं माझंही मत.
पैठणीचं मूळ सौंदर्य तिच्या पारंपारिक बुट्ट्या आणि मोराची डिझाईन यात चांगली खुलते. मुळातच भरजरी असलेल्या साडीवर हे टिकल्यांच काम छान नाही वाटतेय.

>>तुम्हालाहि आवडली ना ……. !!!!!

सायोला अनुमोदन. नाही आवडली. मूळ पैठणी अप्रतिम दिस्तेय. रंग, काठ, पदर, सगळं सुंदर आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यावरची अनावश्यक कलाकारी साडीचं देखणेपण घालवतेय असं वाटलं.

आई सोशिक आहे!

(मी तुमची आई असते तर माझ्या पैठणीवर असे टिकल्या, खडे लावून केलेले प्रयोग मला आवडले नसते)>>>> अगदी अगदी.

पैठणी, चंदेरी, माहेश्वरी ह्या राजसी आणि खानदानी बाजाच्या साड्यांवर खडे, टिकल्या, कशिदाकारी इत्यादी अत्याचार "डिसायनर साडी" च्या नावाखाली झालेले पाहिले की जीव हळहळतो माझा.

माफ करा, नाही आवडला डिझायनर लूक. पैठणी स्वत:च इतकी आबदार असते! तिची स्वतःचीच इतकी शान असते की हे सोपस्कार कशाला?

अरेरे... काय हे?

('विनाश काले..... ' असे माझी आई मला म्हणाली असती मी जर असे काही माझ्या आईच्या पारंपारीक साडीचे वाटोळं केले असते तर... आणि मी तिच्या जागी असते तर बदडून काढले माझ्या मुलाला असते माझ्या देखण्या पैठणीचे असे काही केले असते तर.( माफ करा, स्पष्ट प्रतिक्रिया आहे) Happy

(त्या जरदोसी साड्या मला जराही आवडत नाही... टिकल्या लावलेल्या खास करून.)

बर, असो. तुम्हाला सुद्धा दसर्‍याच्या शुभेच्छा!

रेशमी साडी (कुठलीही उदा पैठणी कांचीपुरम) जास्त काल टिकते. पिढ्यानपिढ्या वापरली जाते. खडे, टिकल्या इ इ कालांतराने पडून जातात, काळ्या पडतात. त्यामुळे ते वापरू नये. फक्त रेशमी धाग्याने काही काम केले तर कदाचित ते फ्युजन वर्क ठीकही होईल. तो क्रीयेतीव्हिटि आणि कामातील सफाईचा प्रश्न होईल. सध्याचे काम साडीच्या मूळ उद्देशालाच धक्का लावणारे वाटते.

vareel sagaLyana jordar anumodan!
SakaLee sakalee paithaNeechee keleli chrfaD baghun kasatareech vaTala!

आतापर्यंतच्या सगळ्या प्रतिक्रिया अगदी बुल्झाय.... पैठणीला स्वतःचं मूळचं असं शालीन भरजरी सौंदर्य असतं.. त्यावर या टिकल्या, खडे शोभून दिसणं कठीण आहे. जसा सूर्य उगवल्यावर लहानसा दिवा निष्प्रभ वाटतो तसा.
झंपी.....अनुमोदन..माझ्या आईच्या पैठणीला हात लावायची माझीसुद्धा हिंमत नसती झाली.
असो. माझ्या आईकडे आजीची तिच्या लग्नातली (ई.स.१९४२ सालातली) नऊवारी पैठणी जपून ठेवलेली आहे. जरीला पॉलिश वगैरे काहीही न करता ती पैठणी अजूनही 'मॅजेस्टिक' दिसते.

मुळात डिझायनर कशाला म्हणायचं हा विचार करायला हवा. डिझायनरचा अर्थ असा की घाऊक प्रमाणात एकसारख्या साड्या (किंवा इतरही कपडे) निर्माण करण्यापेक्षा प्रत्येक साडीला वेगळा लूक देणे. कधी गिर्‍हाईकाच्या आवडीप्रमाणे तर कधी डिझायनरच्या कल्पनाशक्तीनुसार.

पण म्हणून चार टिकल्या, मणी, मोती, लावून साड्या डिझायनर होत नाहीत. त्या त्या मूळ साडीच्या सौंदर्याचा आदर राखून विचार करून जर त्या साडीचे सौंदर्य अधिक खुलवील अशी एखादी व्हॅल्यु अ‍ॅडिशन करता आली तरच करावी. अट्टाहास करून साड्या डिझायनर होत नाहीत.

पैठणीच्या खानदानी सौंदर्याचा विचार करता खरंतर अजून नटवण्याची गरज नाही पण त्यातूनच जर अजून काही नटवायचं असेल तर बाकी जॉर्जेट अन शिफॉनच्या साड्यांना नटवतात तसंच नटवून चालणार नाही. अगदीच चीप आणि बिचारी दिसतेय ती पैठणी.

खरं तर इतक्या प्रतिसादांनंतर अजून एक निगेटिव्ह प्रतिसाद देताना वाईट वाटतंय, पण वरती लिहिलेल्या सगळ्याच गोष्टिंना + १!

पैठणी ही महावस्त्र म्हणून संबोधली जाते, त्याचा मूळचा पोत, स्पर्श, रंग, त्याची मोहवून टाकणारी झळाळी हीच तिची खरी ओळख! त्यावर टिकल्या लावून आणि जरदोसी सारखं दिसणारं काम करून तिची रया गेल्यासारखी वाटतेय अगदीच. मला पैठणीवर हे असं वर्क केलेलं बघितलं की कायमच एखाद्या घरंदाज राजकुलातल्या स्त्रीला तमाशाच्या फडावर उभं केल्यासारखं वाटतं. (हे. मा. वै. म)

इथे तुम्हाला वैयक्तिकरित्या दुखवण्याचा उद्देश नाहीये अनुप, पण जिव्हाळ्याचा विषय असलेली पैठणी अशी रडवेली बघितली अन राहवलं नाही!

तुम्ही डिझाईनर आहात तर पारंपारिक आणि मॉडर्नचं वेगळं फ्युजन ट्राय करा, पण वर मामी म्हणाल्या तसं आधी फ्युजन आणि डिझाईनर साड्या म्हणाजे काय हे स्त्रीयांच्या नजरेतनं आणि दृष्टीतून समजून घ्या, ही प्रेमळ विनंती!

मलाही नाही आवडली.
खरतर असे प्रतिसाद देण्यापेक्षा मी गप्प बसणे प्रिफर करते.
पण एखादी सुंदर पैठणी बघायला मिळेल म्हणून हा धागा उघडला & हे बघून अगदीच राहवले नाही.
टिकल्या, मणी, मोती सिक्वेन्स हे सुद्धा छान दिसते नाही असे नाही पण हे असे भयाण फ्युजन बघवत नाही. माफ करा पण साड्या ह्या जरा जिव्हाळ्याचा विषय असल्याने बोलले गेले.

खूप छान अनुप, तुमच्याकडे असलेली कला आणि हे नाजुक काम करण्यासाठीचा संयम खरचं वाखाण्यासारखा आहे. यासाठी पैठणी वापरण्यापेक्षा प्लेन साडी वापरा, तुमची कला अधिक उठून दिसेल, त्या प्लेन साडीचे फोटो नक्की अपलोड करा.

खरं सांगायचं तर मला हा प्रयत्न आवडला नाही. काही पारंपारिक गोष्टी तशाच बघायल बर्‍या वाटतात. त्याला डिझायनर लुक देऊ नये असं वाटतं.>>>> +1

.

झंपी, मामी, भनुप्रिया... या आणि इतर सर्वानी..जे लिहीलेय... फोटो बघुन मला देखील असेच वाटले.. बिचारी पैठणी .... बिचारे मोर... ते सुद्धा आपल्या नाजुक पिसार्यावर हे काय पडलयं...म्हणुन वळुन वळुन बघताहेत...
सॉरी अनुप... पण.. नॉमिनल सुद्धा छान आहे असे म्हणावेसे वाटत नाही... 'वाया गेली रे पैठणी' असे वाटले.
...पण तुमच्या डेअरींग ला दाद दिलीच पाहीजे... बाकी तुमच्या आईचे मत काय..?

गड किल्ल्यांवरच्या भींतींवर बदाम , प्रेम बाण आणि त्यात पोरा पोरींची नाव लिहीण्यातला प्रकार वाटला...!
अतोनात दु:ख, तीव्र वेदना Sad

मुग्धा केदार आणि सिंडरेला +१ Happy
आता एखाद्या साध्या साडीवर असचं काम करुन तिला देखणी बनवा आणि पुन्हा इथे टाका Happy
---प्रतिक्षेत!!

माझ्या आईकडे आजीची तिच्या लग्नातली (ई.स.१९४२ सालातली) नऊवारी पैठणी जपून ठेवलेली आहे. जरीला पॉलिश वगैरे काहीही न करता ती पैठणी अजूनही 'मॅजेस्टिक' दिसते.>> वा!!

नेसून पाहिल्यावर कदाचित चांगली दिसेल. फार दागिने नाही घालायचे. मोजके बारीक हिर्‍याचे दागिने घालायचे. मला आवडली.

मला जर्दोसी वर्क फारसं आवडत नाही. पण तुमचं काम intricate आहे आणि निवडलेलं sequins and stones पण decent दिसतंय. तुम्ही अगदी carefully छोटे motifs पण नीट सजवलेत. त्यामुळं जे काही end product आहे ते मला तरी आवडलं.
फक्त आता या प्रकाराचं wholesale produce होऊ नये. नाहीतर तुम्हालाच कुठून सुरू केलं असं व्हायचं. Happy

पैठणीवर असं झरदोसी काम केलेलं बघून अजिबात सांस्कृतिक वगैरे धक्का बसला नाही. एकतर फारसा नवा नाहीये हा प्रकार. पार्ल्यात पैठणी, कांजीवरम, बालुचिरी, पटोला अशा अनेक ट्रॅडिशनल रेशमी साड्यांवर कुंदन, खडे, झरदोसी वगैरे अनेक प्रकारचं डिझाईन केलेल्या साड्या अनेक वर्षांपासून विक्रीला असलेल्या बघीतल्या आहेत. गुजराथी, पंजाबी कम्युनिटीमधे पॉप्युलर आहे हा प्रकार. दुकानदार शोरुम्समधे त्याकरता खास कारागिर बसवतात जे दोनेक तासांमधे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार असं काम करुन देतात.

पारंपारिक डिझाइन्स शुद्धतेनं जपली जायला हवीत हे बरोबरच, मला वैयक्तिकरित्या तशीच आवडतात. आणि ती तशी जातातही जपली पिढ्यानपिढ्या कारण पारंपारिक कारागिर त्यांच्या डिझाइन्समधे बदल करायला अजिबात तयार होत नसतात. अर्थात तरीही अशी फ्युजन कामं ज्यांना आवडतात त्यांच्याकरता असे वर दाखवलेले प्रकार केले तरी वेलकम. आपापली आवड असते.

वर्क असलेली पैठणी आजकाल सर्रास मिळते. अगदी येवल्याला गेलात घ्यायला तर तिथेही वर्क असलेल्या पैठण्यांना मागणी आहे. माझ्याकडे अशी वर्क केलेली खास येवल्याहुन आणलेली पैठणी आहे. ते वर्कही सुरेख दिसते. साड्यां - शालूच्या धाग्यावर फोटो टाकला होता मी.

पण इथे केलेले वर्क या पैठणीला नाही सूट झाले.

Pages