नाट्यसंगीत - राधाधर मधुमिलिंद जय जय (संगीत सौभद्र) ... या नाट्य संगीतातील पदाचा अर्थ हवा आहे...

Submitted by दुर्गेशा on 26 August, 2021 - 12:10

प्रिय मित्रहो,

राधाधर मधुमिलिंद जय जय (संगीत सौभद्र) ... या नाट्य संगीतातील पदाचा अर्थ हवा आहे...

राधाधरमधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद
कालिंदी-तट-पुलिंद-लांछित सुरतनुपादारविंद जय जय
उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद जय जय
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद जय जय

बरेच दिवस झाले हे पद डोक्यात घुमते आहे पण व्यवस्थित अर्थ माहित नाही ... कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गुगलची कमाल.
त्यानिमित्ताने मलाही या पदाचा अर्थ कळला.

छानच साइट होती उपक्रम . गेले ते दिवस.

धन्यवाद भरत.

आमच्याकडे संगीत सौभद्र, मानापमान व इतर संगीत नाटकांची पुस्तके होती. मी सुट्टीत दुपारी ती वाचून काढी व त्यातील फोटो बघत असे. श्वेत श्याम. वडिलांनी एस एन डीटी विद्यालयात संगीत विभागा तर्फे संपूर्ण स्त्री कलाकार घेउन संगीत मानापमान केले होते. त्याचा प्र यो ग पण पाहिला होता. त्या मुली मला कौतुकाने त्यांच्याबरोबरीने फुले गजरे आणत माझा साधा बॉब असल्याने मी तो अक्रोस द हेड माळून बागडत असे.

त्या निमित्ताने गाणे गुणगुणून पाहिले.

"कालिंदीतट पुलिंदलांछित सुरनुत पादारविंद जयजय"
ह्या ओळीवर विचार करताना एक सुचलं.

लांछित शब्दाचा विचार करताना
१. चंद्राला शशलांछित म्हणतात, म्हणजे सस्याने चिन्हीत ह्या अर्थाने
२. जटामकुटधारी च त्रिशूलखट्वाङ्गलाञ्छितः (Ref. किरणतंत्र ४९.३) — त्रिशूळ आणि खट्वांग ह्या अस्त्रांनी लांछित/चिन्हीत
३. भृगुलाञ्छन-लाञ्छित-वक्षसम् (ref. विष्णुस्तुती) — भृगु ऋषींच्या पायाच्या डागाची खूण छातीवर असणाऱ्याला

पुलिंदलांछित पादारविंद ह्या शब्दांना एकत्र बघितलं तर असं वाटते की, "पुलिंदांनी [ज्याचे] कमळासारखे [कोमल] पाय अंकित (किंवा चिन्हीत [marked]) केले आहेत असा तो"

अण्णासाहेब किर्लोस्करांसारख्या संस्कृतप्रचुर भाषा वापरणाऱ्या कवीने जेव्हा 'पुलिंदलांछित' असा शब्द वापरला, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर विष्णूच्या या 'भृगुलांछना'चीच परंपरा असावी. जर देवाने एका ऋषीच्या लाथेचा डाग (भृगु-लांछन) मिरवला असेल, तर तो यमुनाकाठच्या गरीब भक्तांच्या सहवासाचा डाग (पुलिंद-लांछन) का मिरवणार नाही? हा एक अर्थ सुद्धा सुचतो.

पूर्ण वाक्याचा ढोबळ मानाने अर्थ,

"कालिंदी नदी तटावरच्या सर्वसाधारण(आर्य नसलेल्या/विद्वान नसलेल्या/भोळ्याभाबड्या) लोकांद्वारे ज्याचे कमळासारखे पाय चिन्हीत केले आहेत ज्यांपुढे सुर(=देव) ही नतमस्तक होतात त्या कृष्णाचा जयजयकार असो"
------किंवा-------
"यमुनातटावरील पुलिंदांसोबत सहवास करणारा पुलिंदलांछित ज्याच्या कमळासमान पायावर सुर नतमस्तक होतात त्याचा जयजयकार असो."

नाचत ना गगनात नाथा
तारांची बरसात नाथा
आणिक होती माणिक मोती
वरतुनी राजस रात नाथा
नाव उलटली नाव हरपली
चंदेरी दरियात नाथा
तीही वरची देवाघरची
दौलत लोक पाहात नाथा

ह्याचा ही अर्थ सांगा कोणीतरी