चित्रपट

गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल (१९५७) - पश्चिमरंग

Submitted by अतुल ठाकुर on 28 December, 2017 - 22:01

123.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

मला आवडलेले काही हाॅलिवूड आणि टाॅलीवूड चित्रपट.

Submitted by अजय चव्हाण on 28 December, 2017 - 03:12

खुप असे चित्रपट असतात जे आपल्याला खुप आवडतात आणि इतरांनीही ते पाहावे असे आपल्याला वाटते तर हा धागा अशाच चित्रपटांसाठी आहे.

मला अत्यंत आवडलेल्या चित्रपटांची यादी मी खाली दिली आहे आणि तुम्हीही अशीच यादी देऊ शकता किंवा एखाद्या चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगितल्यास उत्तम..

1.Intersteller
2.Shownsank Redemption
3.The Walk
4.Lucy
5.The Martian
6.Conjuring 2
7.Perfume (Adult)
8.Taken & Taken 2
9.Inception
10.Train to Busan ( korean)
11.Persuit of Happiness
12.Orphan
13. Final Destination (all parts).

विषय: 
शब्दखुणा: 

यंदाचा 'पिफ' ११ ते १८ जानेवारीदरम्यान

Submitted by चिनूक्स on 18 December, 2017 - 13:25

तर, यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होणारा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' यंदा ११ ते १८ जानेवारी, २०१८दरम्यान होणार आहे. यंदा या महोत्सवाचं हे सोळावं वर्ष आहे. या वर्षी महोत्सवात अडीचशेहून अधिक चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे चित्रपटांबरोबरच अनेक कार्यशाळा, चर्चासत्रं, प्रदर्शनं यांचा अंतर्भावही महोत्सवात असेल.

विषय: 

'हरे कृष्ण': एक नयनोत्सव!

Submitted by पद्म on 16 December, 2017 - 08:27

हरे कृष्ण!
आजकाल नको तितक्या रोमँटिक, ऍक्शन, सस्पेंस, हॉरर, विनोदी, ई. चित्रपटांची रेलचेल झालीये, त्यातही बघण्यालायक किती असतात तो भाग तर वेगळाच!
पण आज पहिल्यांदा चित्रपटावर लिहितोय, कारण कालच एक नविन चित्रपट प्रदर्शित झाला. माझ्या मते, भरपूर दिवसांनी एक आध्यात्मिक आणि हृदय परिवर्तन करणारा चित्रपट, चित्रपट म्हणण्यापेक्षा एक उत्कृष्ट कलाकृती आपल्यासमोर आलीये.

विषय: 

आ अब लौट चलें

Submitted by अस्मानी on 10 December, 2017 - 23:10

श्रद्धा, फारएन्ड, पायस वगैरे प्रभ्रुतींना माझी विनंती आहे की ह्या चित्ररत्नाचा एकदा रिव्ह्यू लिहावा.
खेडेगावातून शहरात जाणार्या बस च्या accident मधून वाचलेला मनुष्य थेट अमेरिकेत करोडपती बनणे, भारतात नोकरी मिळवण्यापेक्षा बेकार माणसाला अमेरिकेचा व्हिसा मिळणे सोपे जाणे, करोड्पती माणसाने एका फटक्यात सगळे सोडून भारतात परत जायला निघणे आणि त्याच्या आर्य पतिव्रता पत्नीने त्याच एका फटक्यात त्याला क्षमा करणे वगैरे अनेक महान सांस्क्रुतिक गोष्टी आहेत ह्यात.

विषय: 

सिनेमा रिव्ह्यू - फुकरे रिटर्न्स!

Submitted by अजय चव्हाण on 10 December, 2017 - 00:10

"फुकरे रिटर्न्स" हा सिनेमा खर्या अर्थाने 2013 साली रिलीज झालेल्या "फुकरे"चा सिक्वेल आहे कारण जिथे फुकरे संपला होता तिथूनच एका वर्षाच्या गॅपने हा सिनेमा सुरू होतो..

ह्या सिनेमाच्या कथेमध्ये "अपने आप में अलग बात है" म्हणजे उगाच खपतयं म्हणून काहीही ओढून ताणून सिक्वेल न बनवता अगदी साजेशी, नीट डोक लावून जुन्याच साच्यात पण नव्या फ्लेवरची बनवलेली व घडवलेली कलाकृती म्हणजेच हा सिनेमा.

विषय: 
शब्दखुणा: 

गेलर्ट ग्रींडलवाल्ड पात्रासाठी जॉनी डेपची निवड

Submitted by टीना on 8 December, 2017 - 04:18

'फँटॅस्टीक बीस्ट अँड व्हेअर टू फाईंड देम' यामधील गेलर्ट ग्रींडलवाल्ड पात्रासाठी जॉनी डेपची निवड केल्याबद्दल फॅन्सचा जो गदारोळ चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत या चर्चेसाठी हा धागा.

हॅरी पॉटर फ्रंचायझीचा हा नवा चित्रपट जेव्हा रिलीझ झाला तेव्हाच जॉनी डेप च्या बायकोने अम्बर हर्डने त्याच्याविरुद्ध कौटूंबिक हिंसाचाराची केस दाखल केली आणि त्यावर उतारा म्हणुन पैशांची मागणी केली.

सत्यकाम - एक निखारा (Movie Review - Satyakam)

Submitted by रसप on 20 November, 2017 - 13:07

आजचं जग, आजचा काळ खूप वेगवान आहे. इंटरनेटमुळे माध्यमं सहज उपलब्ध आहेत. व्यक्त होणंही अतिशय सोपं झालेलं आहे. आज खूप सहजपणे आपणच आपली एखादी विचारधारा ठरवून मोकळे होतो. 'मी अमुक-एक-वादी आहे', असं फार लौकर मानतच नाही, तर तसा काळात नकळत प्रचारही करत सुटतो. पण कुठल्याही प्रकारचा 'वाद', म्हणजेच तत्वज्ञान, विचारपद्धती स्वीकारणं, अंगिकारणं म्हणजे 'पूर्ण सत्या'चा पुरस्कार, अंगिकार करण्यासारखं असतं. मात्र आपण मात्र नेहमीच सोयीस्कर सत्य स्वीकारत असतो. कारण पूर्ण सत्य हे 'अॅब्सोल्यूट अल्कोहोल'सारखं असतं. पचवायला कठीण किंवा अशक्य तर सोडाच, गिळायलाच असह्य. कुठलाही 'इझम'ही असाच.

विषय: 

सिनेमा रिव्ह्यू - तुम्हारी सुलु :) मैं कर सकती है!

Submitted by अजय चव्हाण on 19 November, 2017 - 17:45

तुम्हारी सुलु Happy मै कर सकती है!

सुपरमॅनच्या पोझमधली, साडी घातलेली, सुपरवुमन भासणारी विद्या आणि अगदी खालीच असलेला न्यु ब्रॅण्ड रिबिन लावलेला चकाकता प्रेशर कुकर... सिनेमाचं पोश्टरच सिनेमाविषयी एक वेगळपणं सांगून जातं...ह्या सिनेमाची रिसेपी थोडी वेगळी आहे नेहमीच्याच पठडीतला मसाला न वापरता किंवा कुठल्याही आडवळणाची फोडणी न घातलेला असा हा सिनेमा कुकुरमध्ये शिजवलेल्या साध्या खिचडीसारखाच रूचकर आहे..

विषय: 
शब्दखुणा: 

अतर्क्य, अचाट तरीही सपाट जन्म (Movie Review - Baapjanma)

Submitted by रसप on 17 November, 2017 - 05:31

( टीप - सिनेमा प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखात कथानक उलगडताना हात आखडता घेतलेला नाहीय. )

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट