‘नो चखणा’ रॅप

Submitted by BarC on 9 January, 2023 - 18:29

सांसदीय भाषेतील रॅप- ‘तुम्ही दारू कशी पिता?’ धाग्याला शाऊट-आऊट प्रित्यर्थ!
मायबोली यूट्यूब चॅनलपुरता प्रताधिकारमुक्त. है कोई माई का लाल जो इसको म्हण सके…

‘नो चखणा’ रॅप
बिट्स - हवे ते!

हूक - थोडा दारू विच रॅप मिला दे, तो हो जायेगी बंद हॉटले

रॅप
का भंजाळला पिता, “तुम्ही दारू कशी पिता”?
घिसापिटा आटापिटा, तरी ग्लास रिते झटापटा
गोष्टी अमाप वाचून धाप, नाही गाढव नाही गीता
व्होडकात रस अननस, बॉटम्स-अप घटाघटा

बिगरबर्फला म्हणा ‘नीssट’, ‘ऑन दि रॉक्स’चा आला वीट,
शॉटग्लास ओतप्रोत, व्होडका लिंबू एक गणगोत
रिमला द्या मिठाचा किरीट, रॅपला ह्या रापचिक बिट
तीन पेगात माणूस ढगात, एसीचा जरा वळवा झोत.

हूक - थोडा दारू विच रॅप मिला दे, तो हो जायेगी बंद हॉटले

रॅप
स्कॉच कडक, स्मोकी व्हिस्की, गोरी वाटते ब्यूटी डस्की,
घातला जर ‘क्लब सोडा’, चावी उचला क्लब सोडा
पेग पटियाला जरा रिस्की, होईल उलटी आता बस्स की
फार उटारेटा मार्गारिटा, थेट टकिला शॉट मोठा

होऊन रंक ओतली ओल्ड मंक, नो चखणा, नो मखणा,
थोडी झिंग पिऊन दंगा, सोबत सुरमई बांगडा सांगा
इकॉनॉमी संक, तरी आपण चंक, नो गटाणा, नो कुटाणा,
वाजवा डंका, फिटल्या शंका, ए थांब आता पलटेल टांगा…

हूक - थोडा दारू विच रॅप मिला दे, तो हो जायेगी बंद हॉटले

__________________________________
तळटीप १: “माई का लाल” बोला पर “लाल की माई”, “लाल की/का कोई” भी चलेगी ; रॅप माबो यूट्यूबवर आल्याशी मतलब! मात्र “माई का लाल” म्हणून थेट अवधूत गुप्तेच आला तर प्लीज एवढ्या दोन एक्स्ट्रा ओळीसाठी पण बजेट वाढावा:
“आरं बेवड्या, काही गिळायचं की नुसतंच ढोसायचं
उबर मेलं हेलपाट्याने असं नाही चालायचं”

तळटीप २: पाककृती विभागात “कोरियन” शब्दखुणेवर मिटलं असतं खरं तर…. एवढा एफर्टच मारायचा तर थेट यूट्यूब चॅनलसाठीच आयडिया पिच करावी नि काय.

तळटीप ३: “थोडा दारू विच रॅप मिला दे, तो हो जायेगी बंद हॉटले” ह्यात अन्य कुठल्याही संस्थळाला diss करण्याचा इरादा नाही. गैरसमज नसावे. रॅप व्हिडियोसाठी तिकडूनही थोडे फंडींग/कोलॅब आर्टिस्ट आलं तर “थोडा दारू विच रॅप मिला दे, आता डोके बंद कोठले” इ इ गरजेनुरूप बदल करण्यात येईल. Wink Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol ......... एक नंबर Lol

मी नुसतं वाचत नव्हते, माझ्या मनात ते MC स्टॅनच्या आवाजात ऐकु येत होतं.
लिरिक (म्हणतात का याला ?) फारच भारी जमलं आहे. हे खरंच YouTube वर टाकलं तर जबरी हिट्ट होईल. विचार करा Lol

मस्त लिहिले आहे. बारसी म्हणजे बार्सिलोना नवीन आयडी घेतली आहे का? त्या अश्या कविता लावण्या करतात.

मस्त Lol
वाचायला सुरवात केली आणि मला पण BarC = Barcelona च असे वाटले. मग दुसरा धागा पाहिला. त्यात Barcelona चा पण प्रतिसाद आहे त्यामुळे आता नॉट शुअर.

BarC = Barcelona असेच आहे ते.
सी नही तो कौन बे.. नावात आणि टॅलेंटमध्ये ईतके साम्य एकाचवेळी कसे असेल. त्यांनी रॅप लिहायला हा आयडी घेतला आहे.

हो, पण असं मुद्दाम लिहायचं असतं, व्यक्तीने स्वतःच तसे सांगायला. शास्त्र असतं ते.

यावर कॉपीराईट घेऊन ठेवा सी. केव्हा ढापतील आणि स्वतःच्या नावावर व्हिडिओ खपवतील सांगता येत नाही.