चित्रपट

पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

Submitted by निमिष_सोनार on 8 December, 2019 - 10:03

माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना:

विषय: 

डर - शाहरुख

Submitted by radhanisha on 4 December, 2019 - 23:49

डर सिनेमातल्या शाहरुखशी जर जुहीने लग्न केलं असतं तर काय झालं असतं ? लहानपणी तो सिनेमा पाहताना वाटायचं की जर जुहीने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला असता तर तो सुधारला असता , तिच्याशी प्रेमाने वागला असता , दोघे एकमेकांबरोबर सुखी झाले असते ... अर्थात त्याचं वागणं चूक आहे , तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटणं आहे आणि त्याला स्वीकारायला ती अजिबात बांधील नाही , वगैरे सगळं कळायचं ... पण शाहरुखमुळे त्या पात्राबद्दल सहानुभूती वाटायची ...

विषय: 

लकीर के इस तरफ महत्वाची डॉक्युमेंट्री

Submitted by सखा on 2 December, 2019 - 14:30

लकीर के इस तरफ (२०१९)
लेखन/दिगदर्शन: शिल्पा बल्लाळ  
वेळ : ८९ मिनिट   
IMG-20191114-WA0013.jpg

फत्तेशिकस्त (चित्रपट कथा आणि परीक्षण)

Submitted by निमिष_सोनार on 15 November, 2019 - 20:16

फत्तेशिकस्त मराठी चित्रपट: (कथा आणि परीक्षण)
- निमिष सोनार, पुणे

दिगपाल लांजेकरचा "फर्जंद" मी बघितला होता आणि आवडला होता. फत्तेशीकस्त येईल असे कळल्यावर तो बघायचे ठरवले होते आणि बघितला! मी चित्रपटाची कथा सांगत जातो आणि परीक्षण "चौकोनी कंसातील" वाक्यात अधून मधून येईलच!! कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल.

"पानिपत"चे ट्रेलर आणि ऐतिहासिक भूमिका

Submitted by निमिष_सोनार on 7 November, 2019 - 11:49

सदाशिवराव पेशवेंच्या रोलसाठी आशुतोष गोवारीकरने अर्जुन कपूरला निवडून चूक केली हे "पानिपत" चे ट्रेलर पाहील्यावर बरेच जण म्हणत आहेत. अशीच काहीशी फिलिंग आशुतोषने "जोधा अकबर" मध्ये हृतिकला घेतले होते तेव्हा माझी होत होती. कहो ना प्यार हैं, धूम 2, क्रिश, कोई मिल गया यासारखे रोल करणारा हृतिक ऐतिहासिक राजाच्या भूमिकेत फिट बसेल याला माझे मन मानायला तयारच होत नव्हते, पण जोधा अकबर पाहिल्यानंतर हृतिक मला त्या भूमिकेत अतिशय योग्य वाटला. पण "मोहेंजो दडो" मात्र फ्लॉप झाला, त्यातही हृतिक ऐतिहासिक भूमिकेत होता.

विषय: 

सामान्य माणसाच्या आगतिकतेची 'suffer' - Joker (स्पॉयलर)

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago

माणूस जगतो म्हणजे नक्की काय? जगण्याची व्याख्या प्रत्येकाची निराळी असते, पण या जगात काही लोकांसाठी श्वास घेणे आणि रोजची भाकरी मिळवून पोट भरणे हेच जगणे असते. कुणाच्याही अध्यात मध्यात नसतानाही शांतपणे श्वास न घेऊ देणार्‍या आणि रोजची भाकरी ही सुखाने न मिळू देणार्‍या दुनियेचा आपण भाग असू तर आयुष्य कसे होते ते 'जोकर' खूप प्रभावी पणे सांगून जातो.

विषय: 
प्रकार: 

Happy birthday महानायक....!

Submitted by Narsikar Vedant on 10 October, 2019 - 14:40

१९४२ साल हे 'चले जाव' या ऐतिहासिक आंदोलनासाठी इतिहासात नोंदवलं गेलं, पण ह्यावर्षी अजून एक ऐतिहासिक घटना घडली आणि ती घटना होती महानायक अमिताभ बच्चन यांचा जन्म!

त्यानं काय केलं नाही पडद्यावर? ऍक्शन केली, रोमान्स केला, गाणं म्हटलं, डान्स केला, हसवलं, रडवलंही आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा दिली. आपल्याला जे आवडतं ते सगळं त्याने केलं आणि एक काळ असा आला की तो जे काही करतोय तेच आवडतंय.

शब्दखुणा: 

दोघी

Submitted by क्षास on 10 October, 2019 - 01:14

एकदा महाराष्ट्र टाइम्स मध्ये 'दोघी' या चित्रपटाविषयीचा लेख वाचनात आला. सुमित्रा भावे यांनी लिहिलेला. याआधी मी सुमित्रा भावे यांचं नाव ऐकलं नव्हतं. सुमित्रा भावे यांनी मराठीतल्या अनेक उत्कृष्ट संवेदनशील सिनेमांचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. अस्तु , कासव या सिनेमांची नावं माझ्या कानावरून गेली होती पण यांचं लेखन दिग्दर्शन त्यांनी केलंय हे मला माहीत नव्हतं. लहानपणी टीव्हीला दहावी फ नावाचा सिनेमा अनेकदा लागायचा. तो पण यांचाच आहे हे विकिपीडियावर पाहिल्यावर कळलं. घो मला असला हवा हा राधिका आपटेचा सिनेमा एकदा टीव्हीवर लागला म्हणून सहज पाहिला. ती ही सुमित्रा भावेंचीच एक हलकीफुलकी कलाकृती होती.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट