काही जुन्या चित्रपटांचे इतके जबरदस्त गारुड आहे की चित्रपट सुरु असताना जुना चित्रपट आणि त्याची फ्रेम टु फ्रेम कथा झरझर डोळ्यासमोर उतरु लागते.
युट्युब वर काही तरी सर्च करताना मला हा चित्रपट सापडला. खर तर मी शोधत होतो प्रसाद ओक चा चंद्रमुखी आणि हाताला लागला तु.का. पाटील ( मेनका उर्वशी )
हा चित्रपट पहायला सुरवात केला आणि एक जुनाच सिनेमा मला दिसु लागला ज्याचे नाव सांगते ऐका. खर तर इतका चांगला चित्रपट रिमेक करावा का ? असा प्रश्न मला पडला पण या साठी ज्या निर्माते मंडळींनी पैसे गुंतवले त्यांना का प्रश्न पडला नाही याचे आश्चर्य वाटते.
“तुम जैसे भी हो, काफी हो..!”
हे छोटसं वाक्य खूप अर्थपूर्ण आहे. मी ऐकलं तेव्हा वाटलं ठीक आहे, एवढं काय आहे ह्यात?!
पण “द ब्रोकन टेबल” ह्या शॉर्ट फिल्म मधलं हे वाक्य विचार करायला लावतं.
आठवणी पुसता येत नाहीत... चांगल्या वाईट सगळ्याच आठवणी खोल आपल्यातच कुठेतरी दडून राहतात.
काही गोष्टी विसरता येत नाही म्हणून आपण दु:ख करत बसतो. पण Alzheimer’s सारखा आजार असणाऱ्या लोकांचं काय? त्यांना कितपत लक्षात राहतं? कसं वाटत असेल त्यांना रोज?
"कर्ज"
२००८ साली हा रिमेक आला होता. ह्यातली हिमेशची दोन गाणी मला आवडतात. हा एक कबूलीजबाब मी आधीच देतो.
बाकी, ॲक्टींगच्या बाबतीत हिमेशचा प्रॉब्लेम आहे. डीनोकडूनही काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आणि श्वेता कुमार(टीना) तर ॲक्टिंगचा साधा प्रयत्नही करत नाही. आपल्याला हे जमणार नाही, हे तिला कळलंय.
हा 'कळण्याचा क्षण' तिच्या आयुष्यात शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अवतरलाय. त्यामुळे आधीच सगळी शस्त्रं टाकलीयत तिनं. तर मग ॲक्टिंगचं सगळं कर्ज मुख्यतः उर्मिला आणि डॅनीला फेडत बसावं लागतं..!
परवाच जितूजींचा बड्डे झाला. मधे त्याची काही गाणी बघत होतो. तीही त्यात जितू आहे म्हणून नाही तर इतरच कारणांनी. (थांबा थांबा. मी हिम्मतवाला, मवाली बद्दल म्हणत नाहीये. 'ये मुलाकात एक बहाना है' सारखी गाणी ऐकायला छान आहेत म्हणून लावली होती). तेव्हा जाणवले की जितेंद्रच्या पिक्चर्स मधे असंख्य पिक्चर्स असे होते की त्याचे जिच्याशी प्रेम जमले तिच्याशी त्याचे क्वचितच लग्न व्हायचे. त्यामुळे एखाद्या आनंदी गाण्यात ती "एक्स" रडताना दिसते.
वास्तविक हे चित्रपट समीक्षण मी खूप आधी लिहिलं होतं... पण प्रकाशित करायचा मुहुर्त आत्ता लागलाय असं म्हणायला हरकत नाही...
खरंतर चित्रपट समीक्षण हा व्यक्तिपरत्वे भिन्न मत दर्शवणारा लेख आहे.. पण तरी एखादा चांगला चित्रपट आणि त्याच समीक्षण करणं आणि मास कम्युनिकेशन साधून एखादा जनुईन चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणं... दॅट्स दि अल्टिमेट एम्...
तर मग....
नमस्कार मंडळी
माझ्या मुलाच्या सुचवणीमुळे त्याच्याच बरोबर बसून मी हा चित्रपट एच बी ओ की अँड फ्लिक्स वर बघितला आणि हैराण झालो. त्याची ही ओळख.
'रक्त'
संजूबाबा, डिनो मारिया, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन.
शिवाय बिपाशा, नेहा धुपिया, अमृता अरोरा, पायल रहतोगी...! चार हिरो, चार हिरॉईनी..! प्रेमाचे बहुविध आणि कॉंप्लीकेटेड अष्टकोन..! शिवाय थ्रिलर, हॉरर, मर्डर- मिस्ट्री, बालसंगोपन आणि सायकोथेरपी..! असं साधारण पॅकेजचं स्वरूप.
मला विविध कालखंडातील आणि सगळ्या देशातील इतिहासाची आवड आहे. मी त्याबद्दल विविध भाषेतील पुस्तके, लेख, मालिका आणि चित्रपट बघत असतो. मी इतिहास तज्ञ नाही तर इतिहास जाणून घेण्याची आवड असलेला सामान्य माणूस आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा "शिवप्रताप गरुडझेप" हा चित्रपट थिएटरमध्ये लागला होता तेव्हा खूप इच्छा असूनही जायला जमले नाही म्हणून आज रविवारी TFS play या app वर rent देऊन मोबाइल मध्ये बघितला, कारण हे ॲप अमेझॉन फायर टीव्ही वर compatible नाही. असो.
या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.
आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, मराठी मनावर गेली पन्नास वर्षे तरी आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदाची मोहोर ठसवून हसवत ठेवणाऱ्या अशोक सराफ या नटवराला नमन करावेसे वाटले. यंदा पंच्याहत्तरी गाठलेल्या त्यांना खरंतर आदराने, मानाने नटवर्य म्हणावे लागेल पण त्यांच्या खट्याळ विनोदी भूमिकांचा विचार करता 'नटवर' च जास्त जवळचे वाटेल. त्यांचा जन्म कधी कुठे झाला , मग शिक्षण नोकरी आणि रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास ही अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळूच शकते त्यामुळे त्या तपशीलात न जाता या लेखात मी फक्त मला भावलेला अशोक सराफ शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.