चित्रपट

पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - 4. अनुपमा (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 24 January, 2018 - 09:25

खूप उदास उदास वाटण्याचे काही दिवस असतात. कधी काही कारण असतं. कधी काहीच नाही. आपल्यातच मिटून राहावंसं वाटतं, अगदी जवळचे मित्र-मैत्रिणीच काय पण कुटुंबातलं कोणीही आसपास नसावं असं वाटतं. जिथे माणसंच नाहीत अश्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं. आणि तरीही सोबतीला ठेवावीशी वाटतात ती फक्त काही गाणी. लिस्ट आपली प्रत्येकाची वेगळी. माझ्या लिस्टबद्दल आणखी कधीतरी. पण आज त्यातल्या एका गाण्याबद्दल आणि ते ज्या चित्रपटातलं आहे त्याबद्दल. हे गाणं आहे 'अनुपमा' मधलं - कुछ दिलने कहां, कुछभी नही, ऐसीभी बाते होती है....

विषय: 
शब्दखुणा: 

वलय (कादंबरी) - प्रकरण ५

Submitted by निमिष_सोनार on 22 January, 2018 - 01:10

प्रकरण ४ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65061
---
प्रकरण 5

थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.

स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...

... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.

रोहनचा भीषण अपघात तिला आठवला...

वलय (कादंबरी) - प्रकरण ४

Submitted by निमिष_सोनार on 19 January, 2018 - 01:52

प्रकरण ३ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65012

---
प्रकरण 4

एकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम “राजमा चावल” खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता.

पलीकडून आवाज आला, “जानू, पहचाना मुझे?”

तो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते.

“क क कौन? रा राहुल गुप्ता?” घाबरत रागिणी बोलली.

वलय (कादंबरी) - प्रकरण ३

Submitted by निमिष_सोनार on 14 January, 2018 - 23:06

प्रकरण २ ची लिंक:
https://www.maayboli.com/node/64965

---
प्रकरण 3

वलय (कादंबरी) - प्रकरण २

Submitted by निमिष_सोनार on 12 January, 2018 - 00:51

प्रकरण १ ची लिंक: https://www.maayboli.com/node/64928

प्रकरण 2

आता संध्याकाळ झाली होती. स्टुडीओतील सर्वांनी सर्वांनी एकमेकांना निरोप दिला आणि जायला निघाले. सीरियल मधील सून म्हणजे सुप्रिया सोंगाटे आणि त्या सीरियलचा लेखक तसेच टीव्ही आणि फिल्म्स पत्रकार राजेश पारंबे हे दोघेसुद्धा घरी जायला निघाले.

वलय (कादंबरी) - प्रकरण १

Submitted by निमिष_सोनार on 8 January, 2018 - 07:54

(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या "वलय" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)

कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –

पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त - ३. द ट्रेन (१९७०)

Submitted by स्वप्ना_राज on 8 January, 2018 - 04:32

काही काही चित्रपटांबद्दल आपण आपल्या आई-वडिलांकडून ऐकलेलं असतं. म्हणजे ते शाळा-कॉलेजात असताना कसे तो चित्रपट पाहायला गेले होते (कधीकधी ते त्यांच्या आईवडीलांचा डोळा चुकवून गेलेले असतात - पण ही गोष्ट ते आपण शिक्षण संपवून नोकरीला लागेपर्यंत आपल्याला सांगत नाहीत!), त्याची गाणी कशी हिट होती, त्यांची कशी पारायणं केली जायची वगैरे वगैरे. मग आपल्यालाही तो चित्रपट पहायची उत्सुकता लागते. १९७० सालचा 'द ट्रेन' हा रहस्यपट माझ्यासाठी अश्याच चित्रपटांपैकी एक.

विषय: 
शब्दखुणा: 

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २. कारवां (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 5 January, 2018 - 12:54

६० आणि ७० च्या दशकातल्या बऱ्याच चित्रपटांतली अनेक गाणी माझ्या आवडीची आहेत. आजकाल आपली आवडती गाणी ऐकायला छायागीत किंवा चित्रहार किंवा सुपरहिट मुकाबला अश्या कार्यक्रमांची (गेले ते दिन गेले!) वाट पहावी लागत नाही हे जरी खरं असलं तरी ह्या गाण्यांचं picturization मुद्दामहून प्रयत्न केल्याशिवाय (उदा. युट्यूब वरून व्हिडिओ डाउनलोड करून) पहायला मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. मग कधी कुठे तरी रिमोट घेऊन चॅनेल्सच्या जंगलात 'कोणी चांगला कार्यक्रम दाखवता का?’ असं म्हणत हिंडताना अचानक ह्यातलं एखादं गाणं नजरेस पडतं.

विषय: 
शब्दखुणा: 

गन फाईट अ‍ॅट द ओके कोर्राल (१९५७) - पश्चिमरंग

Submitted by अतुल ठाकुर on 28 December, 2017 - 22:01

123.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट