दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मागच्या आठवड्यात पाहिलेले सिनेमे.

१. oru thekkan thallu case- मल्याळम नेफिवर.
बीजू मेनन- लाईटहाऊसमैन असतो..गावतील प्रतिष्ठित माणूस असतो..शेजार्यांचं प्रेमप्रकरण उघडकीस आणल्यामुळे प्रेमप्रकरणातला नायक हा बिजू वर खार खाऊन असतो..संधी मिळताच एकट्या बिजू मेननला गाठून धडा शिकवायला बघतो..
ऐक्शन कॉमेडी सिनेमा, चांगला आहे..

२.Varisu तमिळ बघितला प्राईमवर.
शरद कुमार मोठ्ठा बिझनेसमन आणि त्याच्या तीन मुलांची गोष्ट.. धाकटा विजय थलपती.. फैमिली ड्रामा आहे..

३.The Teacher मल्याळम नेटफ्लिक्स वर ..
अमला पॉल स्पोर्ट्स टिचर असते..एके दिवशी ती सकाळी उठते तेव्हा तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडलंय हे समजतं पण काय हेच तीला आठवत नसतं...मग हळूहळू क्लू मिळत जातात आणि सगळं क्लीअर होतो..रिवेंज स्टोरी..

४.नेटफ्लिक्सवर कुमारी मल्याळम पाहिला..
थोडा थोडा तुंबाड पार्ट टु म्हणू शकतो..तुंबाड मधे पैशांची लालच आहे यात सत्तेची.
चांगला आहे.

५.विरसिम्हा रेड्डी..... हॉटस्टार वर..तेलुगू पाहिला (हिंदीत आहे)
अतिशय भयंकर सिनेमा.... ड्रामाच ड्रामा..
त्या नंदमुरीची डायलॉग डिलिव्हरी जबरदस्त असते पण..

गोल्ड
मूळ मल्याळम. हिंदी आवृत्ती प्राईमवर पाहिली.

हलका फुलका छान वाटला. माणसाची सोन्याची हाव आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या गमतीजमती आवडल्या.
प्रमुख भूमिकेत पृथ्वीराज सुकुमारन. उत्तम !

१. वॉल्टर विरय्या - चांगला आहे, चिरंजीवी आणि रवी तेजा ही पेयर जबरदस्त असली, तरी चित्रपट चिरंजीवी चा आहे.
श्रुती हसन आणि चिरंजीवीचे एकत्र सिन सोडल्यास पूर्ण चित्रपट बघणेबल आहे.
२.विरा सिम्हा रेड्डी - जय बालया! भयंकर भयंकर क्रींज आहे. बालया अजूनही स्वतःला बाळ्या समजतो आणि त्याच्या बाललीला दाखवतो.
३. Christopher - मामुटी माझ्या सगळ्यात आवडत्या ॲक्टर पैकी एक, पण हा चित्रपट नाही आवडला. रेप काय असतो, हे दाखवण्यासाठी दर दहा मिनिटात एक रेप दाखवायची गरज नाही, त्याची दाहकता पहिल्या सिन मध्येच समजते. पण, रेप, एन्काऊंटर, रेप, एन्काऊंर हे सत्र चालूच राहतं. क्लायमॅक्स तर अक्षरशः २-३ मिनिटात आटोपला आहे.
४. वरीसू - सो सो आहे. विजय चित्रपटभर त्याचा स्वाग आणि रश्मीका तिचे दात दाखवत राहते. पण याची सपोर्तींग कास्ट खूप तगडी आहे. फॅमिली अँक्शन बाळबोध ड्रामा.
फन फॅक्ट - या चित्रपटातील ८ कलाकार असे आहेत की त्यांनी करियरमध्ये बऱ्याचदा लीड रोल केले आहेत, व सगळे सक्सेसफुल देखील झाले आहेत.

विरा सिम्हा रेड्डी - जय बालया! भयंकर भयंकर क्रींज आहे. बालया अजूनही स्वतःला बाळ्या समजतो आणि त्याच्या बाललीला दाखवतो.>>>>>>> Lol अगदी

या एका चित्रपटासाठी अगदी स्पेशल प्रतिसाद!

मी 'द लेजेंड' बघितला. हॉटस्टार वर
आयुष्यात यापेक्षा भयंकर काहीतरी बघेन असं वाटत नाही!

स्टार कास्ट - फक्त आणि फक्त लेजेंड सर्वानन!
लोक काही सीन्स साठी vfx वापरतात.
हा पूर्ण चित्रपटभर स्वतावर vfx घेऊन फिरलाय. याचं शरीर लहान, आणि डोकं भरपूर मोठं दिसतं. हा हसतो तिथेही दात vfx केले आहेत, कपड्यावर इस्त्री फिरवावी तशी याच्या चेहऱ्यावर vfx फिरवून चेहरा सपाट केला आहे.
डाऊट असेल तर आताच सांगतो, हा खराखुरा अस्तित्वात असलेला माणूस आहे.

थुनिवु, रॉ बीस्ट आणि गॉडफादर यातल्या एकाला सर्वोत्कृष्ट बकवास सिनेमा म्हणून नॉमिनेशन द्यायचं असेल तर टफ फाईट आहे.
पण गॉडफादर वर एखादा लेख पाडता येत असल्याने थुनिवूला विजेता घोषित करण्यात येत आहे.

बट्टा बोम्मा - मुलींसाठी चांगला संदेश देणारा छान चित्रपट.

इरट्टा- शेवटी जबरदस्त ट्विस्ट असलेला आणखी एक उत्तम चित्रपट. थोडेसे संवेदनशील दृश्ये आहेत

पाताळविजयम नावाचा तमिळ सिनेमा >>> हा तोच सिनेमा का हपा, ज्यातल्या राक्षसासारखे पुल हसले होते? गमतीने विचारताय असं गृहीत धरते Happy

Breast (Raw) - बघितला होता. काहीच्या काही मूवी आहे. नेल्सन दिलीपकुमार ने या चित्रपटासाठी जाहीर माफी मागितली होती.
Thunivu - थाला अजितकुमार माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक. आवडला. वन टाईम वॉच, तमिळ मनी हाईस्ट.
गॉडफादर - Lucifer ची कॉपी, इथे चिरंजीवी मला बालया वाटलेला. एकदा डोकं बाजूला ठेवून बघायला हरकत नाही.

हा तोच सिनेमा का हपा, ज्यातल्या राक्षसासारखे पुल हसले होते? >> हो हो, तोच. पण गमतीने विचारत नाहीये. हा पिक्चर खरंच असेल उपलब्ध तर मला बघायचा आहे.

मी शिरीष कणेकरांची फिल्लंबाजी ऐकून त्यातले संदर्भ म्हणून कुदरत का कानून सारखे सिनेमे पण पाहिले आहेत.

सुल्ल (suzhal?) म्हणून series आहे.
Crime thrille>>>> सुडल.. चांगली आहे सीरीज.

Iratta मल्याळम नेफिवर.
ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरचा गोळी लागून पोलीस स्टेशन मधे म्रुत्यु होतो..त्यावरून इन्वेस्टिगेशन..त्याचं कैरेक्टर ,बालपण, भांडणं, सस्पेक्टस..शेवट अनप्रेडिक्टेबल ट्वीस्ट.
एंगेजींग आहे.बघू शकता.

थुनिवु, रॉ बीस्ट आणि गॉडफादर यातल्या एकाला सर्वोत्कृष्ट बकवास सिनेमा म्हणून नॉमिनेशन द्यायचं असेल तर टफ फाईट आहे.>>>>> या यादीत चिरंजीवी रामचरण बापलेकाचा आचार्य पण घ्यावा काय ? बकवास सिनेमा, ऐक्शन सीन्स कॉमेडी ..

इतल्यातच पावा कदई गल नावाची तमिळ anthology पायली, त्येच्यातल्या एका गोठीत "तंगमे तंगमे" नावाचे गाणे होय, लैच मनात घर करून बशेल गाणे.

बापलेकाचा आचार्य पण घ्यावा काय ? >>> नावावरून तर चांगला वाटतोय. Lol
रिव्हर्स एंटरटेनमेंट असेल तर चालेल काय पळेल. "तसलं" परीक्षण तरी होईल Wink

गोल्ड
मूळ मल्याळम. हिंदी आवृत्ती प्राईमवर पाहिली.
>>>>>>> पाहिला..चांगला आहे..पोलिसांच्या गमतीजमती मजा आणतात.

ख्रिस्तोफर पाहिला मल्याळम, हिंदीत प्राईमवर.
बरा आहे..

ऍमेझॉन prime वर तेहकिकात नामक चित्रपट हे पण बघा असा येत होता म्हणून लावला. नायिका ओळखीची वाटलेली म्हणून लावला. ती प्रियमणी आहे. फॅमिली मॅन मधील तिवारीची पत्नीचा रोल केलेली.
पंधरा मिनिटात बोअर झालो आणि बंद केला.

नंतर ख्रिस्तोफर लावला.
आता मात्र पेशन्स टिकवून मध्यांतर पर्यंत पाहिला.
पण झेपेना म्हणून बंद केला.

वीर सिंह रेड्डी म्हणजे ब्रिटीशांच्या विरोधातलं बंड का?
चिरंजीवी होता बहुतेक. नीट लक्षात नाही.

एक भारतीय म्हणून 'नाटु नाटु' ह्या गाण्याला यंदाचा ऑस्कर मिळाल्याचा फार आनंद झाला. तथापि 'आरआरआर' हा चित्रपट कधीही बघितला नसल्याने आणि हे गाणेही परवापूर्वी कधीही न ऐकल्याने त्याला ऑस्कर घोषित झाल्यावर उत्सूकतेपोटी युटूबवर लावले. पण मला ते ऑस्करविजेते ग्रेट वाटले नाही (अर्थातच आवड ही व्यक्तिसापेक्ष असते). किंबहुना त्याहूनही कित्येक अधिक सुंदर/श्रवणीय गाणी हिंदी वा अन्य भाषांमध्ये (भारतातील) झाली आहेत. कदाचित दुर्दैवाने ती ऑस्करच्या शर्यतीत पोहोचलीच नसावीत.

Pages