वेलीचे लेखन

आधुनिक सीता - २८

Submitted by वेल on 23 April, 2014 - 07:26

भाग २७ - http://www.maayboli.com/node/47410

************************************************************************************

आता दर दोन दिवसांनी मला आजी सोबत बोलता येऊ लागलं. अर्थात रफिक पुढ्यात असतानाच.

माझे तीन मित्र

Submitted by वेल on 18 February, 2014 - 08:51

माझ्या स्वप्नात येतात माझे लाडके प्राणी
ओळख देतो तुम्हाला त्यांची एक एक करूनी

ही आहे मिस्सी, माझी लाडकी मांजर
चोरून दूध पिते आणि झाडावर चढते सुंदर

हा आहे टॉमी, माझा हुषार कुत्रा
जोरजोरात भुंकला की चोर बनतो भित्रा

माझ्या खिशात राहातो मिकी नावाचा उंदीर
मोदक खायचा असतो तेव्हा आठवते त्याला मंदीर

मिस्सी टॉमी मिकी माझे तीन मित्र
स्वप्नात माझ्या खेळतात ते तिघे एकत्र.

शब्दखुणा: 

ओशिवार्‍याचे बाईकर्स रोडरोमियो.

Submitted by वेल on 28 January, 2014 - 06:33

अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये रिक्षा घेऊन जग्या उभा होता. दिसायला तसा तो थोडासा गुंडासारखाच होता. फक्त रिक्षा ड्रायवरच्या युनिफॉर्ममध्ये त्याचं गुंड दिसणं थोडं सौम्य वाटत होतं. त्याचं नाव जग्या हे त्यानेच सांगितलं बाजूच्या रिक्षावाल्याला. त्याने रिक्षा चालवायला नुकतीच सुरुवात केली होती आणि तो या भागात फक्त तिसर्‍यांदा आला होता. त्याची रिक्षा होती दहिसरची.

शब्दखुणा: 

तिने लग्न मोडलं..

Submitted by वेल on 27 January, 2014 - 08:08

एक छोटीशी कथा.

*********************************

तिने घरी गेल्या गेल्या आई बाबांना हाक मारून समोर बसवून घेतलं. तिचा निर्णय झाला होता पण तो निर्णय त्याला सांगण्यापूर्वी तिला आपल्या आई बाबांना सांगायच होतं. कपडे बदलून हात पाय धुण्याइतका वेळही तिला वाया घालवायचा नव्हता.
"आई, बाबा मला तुमच्याशी बोलायचय."
"भांडण झालम का कौस्तुभशी तुझं"बाबांनी थट्टेच्या स्वरूपात म्हटलं.
"मला कौस्तुभ बरोबर लग्न करायचं नाहीये."
"अग महिन्यावर लग्न आलं आणि आज असं का म्हणते आहेस अचानक? काय केलं त्याने?"आईने काळजीने विचारलं.
"मला त्याच्या सवयी नाही आवडत."

शब्दखुणा: 

आधुनिक सीता - २७

Submitted by वेल on 27 January, 2014 - 06:28

bhaag 26 - http://www.maayboli.com/node/47220

रफिकच्या नातेवाईक बायकांचा आनंदोत्सव चालूच होता. माझे जेवून आणि प्रार्थना करून झाल्यावर बडी अम्मीने मला झोपायला जाण्यास सांगितले. गरोदर असल्याने फार जागरण करू नये, याउलट सकाळी लवकर उठावे असे तिचे मत होते. माझे मत काय होते, मला काय हवे होते हे व्यक्त करण्याची संधी कुठेच नव्हती. सोन्याच्या पिंजर्‍यातला पक्षी झाले होते मी. पुन्हा एकदा विचार करून करून माझे डोके दुखू लागले. डोके चेपून पाहिले, पण दुखायची थांबेनाच. मग फातिमाची वाट पाहात बसले, ती आली की तिच्याकडे डोकेदुखीसाठी काहीतरी गोळी मागायची.

आधुनिक सीता - २६

Submitted by वेल on 13 January, 2014 - 07:53

bhaag 25- http://www.maayboli.com/node/47055

रफिकच्या घरातल्या सगळ्या बायका मोठ्या मोठ्या आवाजात काही तरी बोलत होत्या, एका सेकंदाचीही विश्रांती न घेता. एवढ्या मोठ्या आवाजातल्या बोलणे ऐकण्याची मला सवय नव्हती शिवाय गेल्या सहा महिन्यात तर मी रफिक आणि फातिमा ह्या दोघांच्या आवाजाशिवाय कोणाचाच आवाज ऐकला नव्हता. त्या प्रचंड कलकलाटाचा त्रास होऊन मी तिथेच चक्कर येऊन बेशुद्ध पडले.

आधुनिक सीता - २५

Submitted by वेल on 1 January, 2014 - 04:20

भाग २४ - http://www.maayboli.com/node/46887

आता रफिकचा विश्वास बसावा म्हणून प्रयत्न करणं मी सोडून द्यायचं ठरवलं. कितीही समजावून सांगितलं तरी त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास नव्हताच बसला. बसला असता तर त्याने मला असं बंदी बनून ठेवलं नसतं.

आधुनिक सीता - २४

Submitted by वेल on 19 December, 2013 - 04:30

भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199
भाग २१ - http://www.maayboli.com/node/46297
भाग २२ - http://www.maayboli.com/node/46425
भाग २३ - http://www.maayboli.com/node/46658

**********************************************

आधुनिक सीता - भाग २३

Submitted by वेल on 4 December, 2013 - 07:02

भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199
भाग २१ - http://www.maayboli.com/node/46297
भाग २२ - http://www.maayboli.com/node/46425

*****************************************************

लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग २ - पहिली दाढ

Submitted by वेल on 30 November, 2013 - 00:10

लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग १ - http://www.maayboli.com/node/46367

*********************************************************************

साधारण साडेपाच सहाव्या वर्षी मुलांना पहिली परमनण्ट दाढ येते. खालच्या बाजूला पहिल्या पाच दातांच्या - दुधाच्या दातांच्या मागे.

ही दाढ सर्वात जास्त महत्वाची दाढ आहे. वाचणार्‍या सगळ्यांनी स्वतःची पहिली दाढ म्हणजे सुळ्यापासून मागे असलेली तिसरी दाढ जरा तपासून पाहा. ९५% वेळेला ह्या दाढेकडे दुर्लक्ष होतं आणि मग कीड साफ करून दाढ भरणे, रूट कॅनाल हे तरी करावच लागतं. अनेकदा ही दाढ खूप लवकर काढलेली असते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - वेलीचे लेखन