वेलीचे लेखन

आधुनिक सीता - ३

Submitted by वेल on 5 September, 2013 - 05:23

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली - सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग १ - http://www.maayboli.com/node/44930
भाग २ - http://www.maayboli.com/node/44956

*****************************************************

कविता ५ - निर्लज्ज आणि देशभक्त

Submitted by वेल on 4 September, 2013 - 04:19

बिचारी आमची भारतमाता
अश्रू ढाळत बसली आहे
विटकी फाटकी जीन्स तिला
गिफ्ट म्हणून पाठवली आहे.

"आता कशी जिरली तुझी"
बाकी सारे देश हसत आहेत
"फार गर्व करत होतीस
मानसिक स्वातंत्र्य अजूनही आहे.
तुझ्या पोटच्या मुलांना
तुझ्या संस्कारांचीही लाज वाटते
स्वातंत्र्यही विकून खाऊ
हीच भावना त्यांच्या मनात असते.
आम्ही सारे पाहात आहोत
कधी उतरतो मुकुट तुझा
विकला जाऊन आम्हाला तो
कधी येतो कटोरा हाती तुझ्या.
आम्ही नाही घेणार हे
पाप यावेळी माथी आमच्या
त्याचसाठी बनवलय आम्ही
मुलांना मानसिक गुलाम तुझ्या".

"तरिही चिन्ता नको माते,
स्वाभिमान आमच्यात जिवन्त आहे

शब्दखुणा: 

कविता ४ - शाळेच्या पायरीवर

Submitted by वेल on 4 September, 2013 - 04:04

कधीकधी इथं असंच
बसून राहावंसं वाटतं
बालपणातलं जीवन
हळूच पाहावसं वाटतं.

शाळेच्या या पायरीवर
मग सगळंच आठवू लागतं
पटांगण पडदा बनून
मग सगळी चित्र दाखवतं.

काही वर्षापूर्वी आम्ही
इथे खेळत होतो
दगडमाती सारेच विसरून
मुक्तपणे घावत होतो.

हसत होतो बागडत होतो
उगाच कधी भांडत होतो
आरडाओरडा केला म्हणून
शिक्षासुद्धा खात होतो.

पण तरिही खूप छान होतं
शाळेतलं आयुष्य,
शाळेच्या पंखाखाली
खूप सुरक्षित होतं.

१०-११-१९९६

शब्दखुणा: 

कविता ३ - tuzyaat buDaale aaNI

Submitted by वेल on 3 September, 2013 - 04:44

तशी मी नेहमीच तुझ्यापासून दूर दूर
पण तरिही कुठंतरी, माझ्या मनात दडलेला तू.
तुझा ओलसर स्पर्श, चिकटून राहणारा\
तुझा धीरगंभीर आवाज, कवेत घेणारा
तुझा विस्तार डोळे तृप्त करणारा.
तुझा गंध चित्त उल्हसित करणारा.

म्हणून मग एकदा वाटलं,
जवळ जाऊन पाहू, थोडं धाडस करून पाहू.
आणि तेंव्हा,
तेंव्हा खरंच, तुझ्यात बुडाले मी
आणि काही सुचेना,
कारण तुझ्या पाण्यात गुदमरले मी.
समुद्रा, तुझ्या त्या खार चवीने
घेतला माझा ताबा
आणि २१ दिवसांसाठी
टायफॉईड शरीरात राहून गेला.

एप्रिल २००९

शब्दखुणा: 

कविता २ - स्वप्नयुक्त व्हायचय मला

Submitted by वेल on 3 September, 2013 - 04:28

नातं तुझं नी माझं
कधी सुरुच झालं नाही,
कधी सुरुच झालं नाही, म्हणून कधी संपलं सुद्धा नाही.

भाव माझ्या मनातले
मनातच राहिले
व्यक्त करून नात्यामध्ये
ते मी बांधू नाही शकले.
अशनी बनून ते भाव
मनातच तरळत राहिलेत.
स्वप्न बनून झोपेत येऊन
मला छळत राहिलेत.
ही कविता म्हणूनच,
की तुला ते सांगावेत,
तुला नाही सांगितले तरी
व्यक्त ते व्हावेत,
मन माझे रिते करून
मी स्वप्नमुक्त व्हावे.
कळेल न कळेल तुला
मी कोण ते
पण मनाला माझ्या
समाधान मिळून
मी छान झोपी जावे.

शब्दखुणा: 

कविता १ - सृजन

Submitted by वेल on 3 September, 2013 - 04:19

त्या नऊ महिन्यांची,
सुरुवात अस्वस्थपणे,
शेवट वेदनेमधे
मधला काळ उत्सवाचा..

उत्सव सृजनाचा,
उत्सव सुखद जाणिवांचा,
उत्सव उमलण्याचा,
त्या नऊ महिन्यानंतर,
उत्सव नवीन जन्मांचा
उत्सव बाल्याचा मातृत्वाचा.
उत्सव ते नऊ महिने
जगण्याचा, भोगण्याचा..

हा मान फक्त मातेचा
मातेच्या मातृत्वाचा
आणि म्हणूनच
कधी कवीचा, लेखकाचा, चित्र-शिल्पकाराचा,
सार्‍याच कलाकारांचा....

२१ डिसेंबर २००९

शब्दखुणा: 

आधुनिक सीता - 2

Submitted by वेल on 30 August, 2013 - 15:44

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग १ - http://www.maayboli.com/node/44930

********************

आधुनिक सीता - १

Submitted by वेल on 29 August, 2013 - 10:17

मी लिहिलेली ही पहिलीच कथा.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची. http://www.maayboli.com/node/44940

हे कथानक वापरून मी माझी कथा पुढे चालवली आहे. ही कथा लिहित असताना मूळ कथा बेस म्हणून तर वापरली आहे पण त्याशिवाय मी त्यात मला पटतील अशा काही गोष्टी अधिक लिहिल्या. काही ठिकाणी विचार आणि लेखन स्वातंत्र्य घेतले. मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

Pages

Subscribe to RSS - वेलीचे लेखन