ही खिडकी
या चित्राची चौकट,
चित्र खिडकीतल्या माझे.
चित्रात बसून पाहात आहे
नाट्य निसर्ग राजाचे.
गिरक्या घेत वारा येतो
वार्ता देतो वर्षेची,
उधळत येते वर्षाराणी
मूठ टपोर्या मोत्यांची.
हिरवा शालू नवसृष्टीचा
भूमातेला देते ती
मृदू कोवळ्या ऊनज्योती
भूमातेला ओवाळीती.
सरीसरींच्या सतारी
कधी मल्हारधून छेडती,
हिरवी बाले भूमातेची
इंद्रधनूवर झोके घेती.
निसर्गराजा गाली हसतो,
धरित्रीला तो कवेत घेतो
मग चित्रातूनी या अलगद उतरून
नाट्यामध्ये मी रमून जाते.
२९-८-१९९६
"तुझ्याकडून केवढ्या अपेक्षा होत्या आमच्या म्हणून आम्ही तुझ्याकडे राहायला येत होतो, तुला आमचा वापर करू देत होतो. पण तू एकदम अपेक्षाभंग केलस आमचा. "
मला ते सगळेच बोलत होते. आणि मी मान खाली घालून ऐकत होते.
खरं होतं ते. ते फार विश्वासाने माझ्याकडे आले होते. खरं तर मीच आर्जव करून त्यांना बोलावून घेतले होते. पण त्यांना बाहेर आणायची वेळ यायची तेव्हा मात्र मी कच खायचे. कधी आत्ता वेळच नाही तर कधी आत्ता खूप थकले आहे, कधी आत्ता शब्द नाहीत तर कधी आत्ता तुम्ही खूप विस्कळीत आहात तर कधी आत्ता सगळं असलं तरी लिहायला काही नाही पेन नाही, कागद नाही.
"त्या चार जणांना फाशीची शिक्षा सुनावली. तू सुटलास. तुझं वय लहान म्हणून तू सुटलास."
कोणीतरी त्याच्याशी बोलत होतं. पण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. त्याला त्याचा निकाल लागला तो दिवस आठवत होता.
कथा अप्रकाशित करीत आहे. कथा पूर्ण लिहून पुन्हा प्रकाशित करेन.
कथा अप्रकाशित करीत आहे. कथा पूर्ण लिहून मग पुन्हा प्रकाशित करेन.
आता उभे आहोत आम्ही
जीवनच्या उंबरठ्यावरती
खुल्या जागाच्या प्रांगणात
पदार्पण करण्यासाठी.
इतके दिवस आम्ही
खरंच खूप लहान होतो
आईबाबा शिक्षकांच्या
पंखाखाली सुरक्षित होतो.
नजरेचा धाक तरी
मुक्तपणे बागडत होतो
कळत नव्हत तेच बालपण
तरी स्वच्छंगपणे विहरत होतो.
जरा खुट्ट झालं तरी
सारे मोठे सावरत होते
झाल्या चुका विसरून मग
प्रेमाने अम्हाला थोपटत होते.
आता मात्र सारेच धोके
आमचे आम्ही ओळखायचे
बालपण विसरायचे
आणि जबाबदारीने वागायचे.
१२.४.१९९७
ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.
२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.
भाग १ - http://www.maayboli.com/node/44930
भाग २ - http://www.maayboli.com/node/44956
भाग ३ - http://www.maayboli.com/node/45054
******************************************