आधुनिक सीता - भाग २३

Submitted by वेल on 4 December, 2013 - 07:02

भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199
भाग २१ - http://www.maayboli.com/node/46297
भाग २२ - http://www.maayboli.com/node/46425

*****************************************************
रफिक पुरणपोळी खाऊन आपला आनंद सेलिब्रेट करत होता आणि त्याच क्षणी मी विचारात गढले होते. असा कसा हा? दोन टोकं गाठणारा? मनासारखं झालं तर इतकं लाघवी वागणारा आणि मनासारखं नाही झालं तर क्रूरपणा दाखवणारा. एखादी पर्सनॅलिटि डिसऑर्डर तर नाही ना? इथे मला डायग्नॉसिस करणं शक्यही नव्हतं आणि करून फारसा फायदाही नव्हता. समजा त्याला कोणताही मानसिक आजार असता तरी मी त्याला सायकिअॅकट्रिस्टकडे जा असा सल्ला देऊ शकत नव्हते. विचारातच माझे खाऊन झाले. रफिकचे मुळी लक्षच नव्हते माझ्याकडे. तो स्वतःच्याच आनंदात मला काही काही सांगत होता. आणि माझं लक्षच नव्हतं तो काय बोलत होता त्याकडे. मी हाच विचार करत होते हा असा कसा? ह्याच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता तर नाही ना? एवढ्या मोठ्या एम्पायरच्या मालकाचा एकुलता एक मुलगा म्हटल्यावर काय कमतरता असेल ह्याला आणि कशी? पण कोणत्याही निष्कर्षाला मी कशी पोहोचणार होते? मला रफिक बद्दल काहीच माहित नव्हतं. सागरकडून जेवढं ऐकलं होतं तेवढच, पण त्यात रफिकच्या स्वभावाबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल फारसं काहीच नव्हतं. मी इथे आल्यापासून माझ्याशी कोणीच वैयक्तिक गोष्टी बोललं नव्हतं. माझ्याशी बोलणारं तरी अशी किती लोकं होती. फातिमा आणि रफिक स्वतः. आणि पहिल्या दिवशी मी रफिकच्या चार आया आणि छोट्या बहिणीला भेटले होते तेवढच. भेटले सुद्धा किती वेळ होते फक्त काही मिनिटं. तसं तर मला आजचा दिवस कोणता तारीख कोणती महिना कोणता हेदेखील लक्षात नव्हतं. खरच काय तारीख आहे? दिवस कोणता? किती दिवस मी या राजमहाल सदृश्य तुरुंगात होते?

"रफिक.."
"हा बोल. अरे केव्हाचा मीच बोलतो आहे. तुला सुद्धा काही बोलायचं असेल. मी एकदा सुनिता बद्दल बोलायला लागलो ना की माझं मलाच कळत नाही."
म्हणजे हा सुनिताबद्दल बोलत होता. म्हणजे फारसं महत्वाचं नाही. पण महत्त्वाचं नाही कसं मी लक्ष दिलं असतं तर मला सुनिता कशा वागायची ते कळलं असतं.
"रफिक आज दिवस कोणता आहे रे?"
"काय फरक पडतो आहे तुला."
"फरक काहीच पडत नाही. सहज विचारलं."
"तो टीव्ही लावलास तर कळेल तुला दिवस कोणता तारिख कोणती."
"अरे खरंच की. मी आज काल टीव्ही पाहातच नाहीये. योग, मेडिटेशन, पुस्तकं ह्यातच वेळ जातो. पण टॅबवर सुद्धा डेट टाईम दिसत नाहीये."
"सेटींग बदलून देतो. पण तुला काय फरक पडतो किती वाजले? तुला सगळ्म तर हातात मिळतं. कोण्ता दिवस आहे त्याने काय फरक पडतो तुला काही इतरांसारखा ह्यादिवशी उपास किंवा ह्यादिवशी सगळे नमाज किंवा ह्यादिवशी चर्च मध्ये जाणे असा काही प्रश्न नाहीये."
"अरे मी माणूस आहे. इतकी वर्ष वेळ दिवस ह्याच्या तालावर नाचले आहे. आता असं वाटतय वेळ दिवस गायबच झालेत माझ्या आयुष्यातून."
"अरे चांगलं आहे ना, तुझ्या मेडिटेशन ला मदत. उद्याची चिंता नाही काल काय झालं विचार नाही. फक्त ह्या क्षणात जगायचं. अरे मला कोणी असं आयुष्य दिलं जगायला तर मी आनंदाने जगेन. रोजची धावाधाव नाही, उद्याचा विचार नाही. कोण माझ्याशी कसे वागेल ह्याची चिंता नाही. कोण काल कसे वागले त्याचा उद्यावर काय परिणाम होईल ह्याची चिंता नाही. माझं आणी सुनिताचं स्वप्न होतं असं जगायचं. उद्याची चिंता न करता, कालचा विचार न करता."
"तू तिला शोधायचा प्रयत्न नाही केलास का?"
"असं कसं न करेन मी. बिझनेस सांभाळायला लागल्यावर तिला काँटॅक्ट केलं. अगदी खूप शोधलं तिला. पण ती नाही सापडली. इंजिनियर होऊन कुठे गायब झाली माहित नाही. चल मी निघतो. माझं झालय खाऊन मला उशीर होतोय."
"चला ह्या निमिने तरी मी वेळेशी जोडली गेले."
"म्हणजे काय. म्हणजे तुला उशीर होतोय ना म्हणजे वेळेचा संबंध आलाच ना."
"कुठे कुठे काय काय विचार करतेस तू"
"डोकं रिकामं असतं ना दिवस्भर म्हणून."
"मी निघतो." असं म्हणून माझ्या गालावर ओठ टेकवून तो निघाला.

रफिक निघून गेला पण माझ्या मनात त्याच्या वागण्याबद्दलचा विचार नाही गेला. थोड्या वेळापूर्वी त्याने सुनिताबद्दल बोलता बोलता तिचा विषय बदलला होता. मला कसं कळेल त्याच्याबद्दल त्याच्या भूतकाळाबद्दल? त्याच्या घरच्यांबद्दल? कळेल हळू हळू म्हणून मी पुन्हा गप्पच बसले.

त्या दिवशी फातिमाचा रंग थोडा उडालेला दिसला. चेहर्‍यावर हसू नव्हतं तिच्या. त्या दिवशी ती माझ्याशी बोलली देखील नाही. इतर वेळी मी कोणती योगासनं करते, कशी करते हे ती विचारत असे. कधे कधी माझ्यासोबत एखादे मराठी किंवा हिंदी गाणेही ऐकत असे. तिला कळलं होतं का की रफिक माझ्या जवळ यायला लागला आहे. तिच्याशी बोलायला हवं होतं. कदाचित तिच्याकडून रफिकबद्दल समजलं असतं. पण तिच्याशी कसं बोलणार. तिचं इंग्रजी अगदीच मोडकं तोडकं होतं. तिच्याशी बोलायचं म्हणजे तिला इंग्रजी शिकवायचं किंवा मी अरेबिक शिकायचं. तिला इंग्रजी शिकवलेलं रफिकला चालेल का? मला अरेबिक कोण शिकवणार. म्हणजे मी इथे राहून कोणाशी काहीच बोलायचं नाही का? इतके दिवस काही वाटलं नव्हतं कारण पुस्तक वाचत होते, आता पुस्तक सुद्धा संपत आली होती. रफिक नवीन पुस्तकं आणोन देईल का? पण कितीही पुस्तकं आणून दिली तरी माणसाशी संवाद तो माणसाशी संवाद. त्याची तहान पुस्तकाने कशी भागेल?

काय करू मी अजून की मला इथे अधिक सुखदायी वाटेल. 'सुख हे मानण्यात असतं'.. हे माझ्या मनात उभं राहिलेलं वाक्य...पण मी मानतच होते ना जे चालू आहे त्यात सुख पण आता याहून अधिकची गरज वाटत होती.

(hyaapuDhachaa bhaag navyaane Taakalaa aaahe hyaa bhaaagaat

त्याच दिवशी लगेचच रफिकने टॅब वरचे सेटिंग बदलून तारीख आणि वेळ दिसेल असे करून दिले.
दोन दिवसांनी ऑक्टोबर महिना चालू होत होता. माझं सागरचं लग्न झालं मार्च महिन्यात मी सौदीला आले एप्रिलच्या शेवटी शेवटी आणि रफिकच्या घरात अडकले जून महिन्यापासून. म्हणजे मी चार महिने इथे होते जवळ जवळ. म्हणजे श्रावण, हरताळका, गणपती काहीच म्हणजे काहीच माझ्या लक्षात आलं नव्हतं. ऑक्टोबर म्हणजे दसरा जवळपासच होता? मी नवरात्रीचे नऊ दिवस उपास करायचे आई आजी सोबत. आजी म्हणायची आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेची शक्ती आपल्यात वास करू लागते.आता मला नवरात्र कधी आहे, दसरा कधी आहे हे विचारावं लागणार होतं रफिकला, सांगेल का तो मला?मी त्याला सांगितलं मला उपास करायचे आहेत तर काय म्हणेल तो?

तीन दिवस ह्याच विचारात गेले. बोलू का रफिकशी का नकोच.. दोन ऑक्टोबरला रफिककडे विषय काढलाच.

"रफिकएक विनंती होती. जरा नवरात्र कधी सुरु होतात हे मला सांगू शकशील?"
"नवरात्र म्हणजे ते नऊ दिवस सगळे मिळून गोल गोल फिरून डान्स करतात तेच ना? आता तू कुठे जाणारेस डान्स करायला."
"हो. त्याच नऊ दिवसांना नवरात्र म्हणतात. आणि गोल गोल फिरून डान्स करतात त्याला गरबा म्हणतात. मला गरबा करायला नाही जायचय कुठे. पण गेली अनेक वर्षे माझा उपास असतो नऊ दिवस. पूजा करण्याची इच्छा असली तरी मी नाही करू शकत माहित आहे मला, उपास तरी करायची इच्छा आहे. नवरात्र कधी सुरू होतात हे कळलं तर बरं होईल."
"उपास म्हणजे, ते कसे करणार तू. काही न खाता पिता उपास का खाऊन पिऊन उपास."
"उपासला मी पूर्वी दूध फळं आणि जमलच तर एक वेळ खिचडी किंवा बटाट्याची भाजी किंवा वरीच्या तांदळाचा भात किंवा रताळ्याचा किस किंवा शेंगदाण्याचा किंवा राजगिर्‍याचा लाडू, असं खायचे. इथे मला दूध फळं आणि शेंगदाण्याचा लाडू एवढे मिळाले नऊ दिवस तरी पुरेल. जमेल का?"
"साबुदाण्याची खिचडी. आहाहा - सुनीताची आई काय मस्त खिचडी करायची.. आपण दोघे मिळून खिचडी खाऊ आणि त्यावर थंड दही. वा वा वा. आणि त्यासोबत ना कसला तरी पापड असायचा तळलेला. अरे आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलय."
"बटाट्याचा पापड."
"मला खिचडी मिळावी म्हणून तरी मी नक्की सांगेन तुला नऊ रात्र कधी सुरु होते."
"मनापासून धन्यवाद. पण नऊ रात्र नाही, नवरात्र."

रफिकने मला नवरात्र कधी सुरू होते हे तर सांगितलेच पण वेगवेगळ्या देवींचे फोटो त्याने मला टॅबवर टाकून दिले. हा माणूस गेल्या जन्मी नक्की भारतीय होता असणार... माझ्या मनात विचार चमकून गेला. देवी सप्तशती ऐकून म्हणून आणि उपास करून मला अधिकाधिक मानसिक बळ येत होतं. रफिक रोज माझ्यासोबत सकाळचा नाश्ता करायचा.सकाळच्या नाश्त्याला बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी किंवा दह्यात भिजवलेला साबुदाणा असे. आलटून पालटून तेच. मी रात्री जेवत नव्हते त्यामुळे रफिक बुद्धीबळ खेळून परत जात होता. मीसुद्धा आता बराच चांगला बुद्धीबळ खेळत होते असे त्याचे मत होते.
नवरात्र संपत आली होती. मी अजून एक पाऊल पुढे टाकायचे ठरवले.

"रफिक, उद्या दसरा."
"हो हो उद्या दसरा. मी वाचलय दसर्‍याबद्दल. तुला काही चांगले कपडे वगैरे आणू का? मी फक्त एवढच करू शकतो. तुला पूजा वगैरे काही करायची असेल तर मी तुला मदत नाही करू शकणार."
"मला पूजा वगैरे काही नाही करायची. मला फक्त उन्हात जायचय बाहेर. अगदी तुझ्या घराच्या बागेत सुद्धा घेऊन गेलास किंवा तुझ्या घराच्या टेरेस मध्ये तरी चालेल. हव तर प्रिझनर्स ना घालतात तसे हँड्कफ्स घालून बाहेर नेलस तरी चालेल पण मला जरा मोकळ्या हवेत, मोकळ्या उन्हात जायचय. नेशील? हव तर डोळे बांधून ने. पण प्लीज मला मोकळ्या हवेत ने."

क्रमशः

http://www.maayboli.com/node/46887

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वल्लरी, मी ठरवले होते की आता पूर्ण गोष्ट एकदम वाचायची. पण पुढचा भाग बघितल्यावर रहावले नाही. Happy पण खरच खूपच छोटा भाग आहे Sad

कोणीतरी पूर्वी सांगितल्यासारखं आज पुढचा भाग रेकॉर्ड करते आहे. उद्या लग्गेच टाकेन. नक्की. प्रॉमिस .. Happy

thanks.. navin bahg post kelya baddal
vachnyachi khup ustukta hoti
lagech sampla mhnun thodi nirasha pan zhali
pan its ok
take u r time ani navin bhag post kara

खुपच छोटा झालाय हा भाग.....+१ (डिसेंबर २०१३ च्या आत कथा संपवा ही विनंती. मराठी मालिकांसारखी महिनोन्महिने चालवू नका )

वल्लरीच कथा छान लिहीताय, पण आता ती खुप रेंगाळल्यासारखी वाटत आहे. किती दिवस झाले गोष्ट अजुन तिथल्या तिथेच फिरत आहे. आता काहीतरी चांगलाच ट्विस्ट पाहिजे.

कथेतील नायिकेचे वागणे मला कितपत पटत आहे ते माहीत नाही. पण इतक्या दिवसात तिला स्वतःच्या नवरयाची एकदाही खुप मनापासुन आठवन येत आहे असे दिसत नाही. तिने खुप लवकर परिस्थितीला शरणागती पत्करली असे वाटते.जुन्या सीतेने देखील लवकर हार नाही मानली. हि तर आधुनिक सीता आहे.
कोण कोणता रफिक तिच्या आयुष्यात येतो काय, तिचे आयुष्य नासवतो काय. कारण काय तर कोणीतरी त्याची प्रेयसी कथानायिकेसारखी दिसते. अरे कोण बाबा तु... मी काय रसत्यावर पडली आहे. तुझ्यासारख्या
ऐरयागैरयासाठी माझा धर्म बदलायला. हे आपले माझे विचार....

तुमची कथा नायिका कदाचित वेगळा व फार पुढचा विचार करत असेल. ती लवकरात लवकर रफिकसारख्या सायको माणसाच्या तावडीतुन सुटुन सहिसलामत स्वतःच्या खरया रामाकडे गेली म्हणजे मिळवली. रच्याकने तिचा नवरा व भाउ तिची खरी परिस्थीती जाणुन तिला यातुन सोडविण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत का?
कि हिने जे पत्र पाठवुन सांगितले ते यांनी काही पडताळणी न करताच मान्य केले. अश्या स्थितीत भारतीय
अ‍ॅम्बिसिला लक्ष घालायला सांगितले पाहिजे. कथा नायिकेचा नवरा डॉक्टर आहे म्हणजे चांगलाच हुशार व
सुशिक्षीत आहे.त्याला सत्य परिस्थीती माहित आहे. तो असा कसा गप्प बसुन राहिल.

Happy

यशस्विनी अग कथा आहे ती. एम्बसी आली मधे इतक्या लवकर तर कथा कशी रंगेल. एम्बसी यायची होती मधे तर सीता वनवासात अडकल्या पासून लगेच यायला हवी होती.

वल्लरीताई, राग मानु नका मला यशस्विनीताईचे विचार अगदी बरोबर वाटतात.............................. माझ्या नावातच दादा हा शब्द आहे ना म्हणुन माझ्या सर्व बहिणीची काळजी तर करीन अगदी तुझीपण..........(फक्त काळजी करणे एवढेच माझ्या हातात आहे म्हणुन) यशस्विनीताईने आपले विचार छान सांगितलेत..................... फक्त थोडं चांगले ट्विस्ट पाहिजे .....!!!

फातिमाच सुनिता हाय का काय?????????????????? :?

लवकर्र्र्र येऊ दे ग पुढचा भाग.. आधीचे सगळे मोबाइइलवर वाचले म्हनुन प्रतीसाद नाही देता आला!

चांगली चाललिये कथा ,पण गेल्या एक दोन भागांत काहीच प्रगती झालेली नाहिये....प्लीझ आता पात्रांपैकी कुणालातरी काहीतरी हालचाल करायला लावाना...किती दिवस तिच्या मनातला गोंधळच दाखवणार आहात?

<फातिमाच सुनिता हाय का काय?????????????????? :<> मी कल्याणी हा माझा डुआयडी आहे काय हे चेक करून बघितले.....
सेम्म्म्म्म्म हाच विचार माझ्या डोक्यात आला होता..

लिहिते आहे लोक्स. वेळ द्या, कालचा प्रीमियर्च वृत्तान्त लिहित होते. आता थोडा वेळ काम करते आणि मग कथा पूर्ण करते.

मुग्धानंद - म्हणजे काय ग.

नमस्कार

खरच खूप छान लिहिताय आपण .

पुढील भाग लवकर येऊ द्या

मी प्रथमच प्रतिसाद देतेय …पण तुमची हि कथा खूप उत्सुकता वाढवतेय ​

Pages