आधुनिक सीता - २१

Submitted by वेल on 13 November, 2013 - 04:50

भाग १६ - http://www.maayboli.com/node/45780
भाग १७ - http://www.maayboli.com/node/45869
भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199

*****************************************

रफिक निघून गेला तरी त्याचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले होते. किती क्रूर प्रकारे बोलला तो. हा तोच रफिक होता का जो इतके दिवस मला जपत होता? मी कोसळले, ढासळले. मी स्वतःहून त्याला संगितलं होतं मी त्याच्या स्वाधीन होईन, त्याच्यावर प्रेमसुद्धा करायला सुद्धा लागेन. मग अचानक असं का बोलला तो? म्हणे मी त्याला रिस्पॉन्स दिला नाही तर तो माझे शारिरीक हाल करेल? आणि मला उपयोग नसलेल्या उंटासारखा वागवेल.. आणि त्याने खर्च केलेला सगळा पैसा मला घरकामाला किंवा इतर कोणत्याही प्रकारे वसूल करेल.....कसं शक्य आहे, हा इतका तर वाईट वाटत नव्हता मग का असा बोलतो आहे? तो स्वार्थी आहे, विचित्र पझेसिव्ह आहे पण म्हणून असा क्रूरपणा, असा विकृतपणा. मला थोडा वेळ का देऊ शकत नाहीये तो?

काय करावं सुचेना, त्याच्या स्वाधीन होणं मला मान्य होतं पण मी लगेच रिस्पॉन्स कसा देऊ शकेन त्याला मी काय रोबो आहे, कोड चेन्ज केला आणि प्रोग्राम चेन्ज झाला? आणि कसा द्यायचा रिस्पॉन्स, मनाने सोडा, शरिराने तरी अशा जबरदस्तीला कसा द्यायचा रिस्पॉन्स. आणि केवळ त्याला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून इतकी मोठी धमकी?

ह्याबद्दल त्याच्याशी बोलणं गरजेचं होतं. पण तो म्हणाला मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. उद्या येऊन तो अशीच जबरदस्ती करू लागला तर मला माझं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहोचवता येणारच नाही. काय करू मी कसे बोलू त्याच्याशी? मी विचार करत करत खोलीभर चकरा मारू लागले, अचानक माझी नजर टॅबवर गेली. मी ह्यावर रफिकला पत्र लिहून ते फातिमाकडे दिलं तर? जेव्हा पाणी अगदी गळ्याशी येतं तेव्हा पोहोता न येर्‍यालाही हात पाय मारावेच लागतात...

" प्रिय रफिक,

खरं तर हे पत्र मला लिहावं लागलं नसतं तर जास्त आवडलं असतं. पण आजच्या तुझ्या बोलण्यामुळे मला प्रश्न पडलाय, माझं काय स्थान आहे तुझ्या आयुष्यात? लहान मुलाला हवं असलेलं खेळणं त्याच्या घरच्यांनी त्याला दिलं नाही की तो दुसर्‍याकडून खेचून घेतो आणि ह्या खेचाखेचीत जर ते तुटलं तर त्याच्याशी न खेळता ते टाकून देतो. त्या खेळण्याची जागा आहे का माझी तुझ्या आयुष्यात? की मी तुझ्या आयुष्यात तुझी प्रेयसी सुनिता हीची जागा घेउन आले आहे?

तू मला माझ्या नवर्‍यापासून तोडलस मी मान्य केलं ते. त्याचा मार्ग मोकळा झाल्यास मी स्वतःहून तुझ्या स्वाधीन होईन, इतकच कशाला, धर्मसुद्धा बदलेन असा शब्द दिला होता ना मी? माझ्यावर एवढाही विश्वास ठेवू शकत नाहीस का? दोन दिवसापूर्वी सागरचं पत्र आलं आणि मी आज लगेच तुझ्याशी शारिरीक सलगी करावी इतकी निर्लज्ज वाटते का रे मी तुला. मला तुझा स्वभाव आवडायला लागला आहे, पण शारिरीक सलगीसाठी आणि तुला हव्या तशा रिस्पॉन्स साठी मला तुझ्याबद्दल प्रेम नको का वाटायला? आणि प्रेम वाटण्यासाठी आपल्यात एक हळुवार नातं निर्माण व्हायला नको का? प्रेम नसताना तुला हवा तो रिस्पॉन्स फक्त एखादी वेश्या देऊ शकते. मी नाही. आवड ते प्रेम हा रस्ता फार मोठा नाहीये, पण तो पार करायला वेळ द्यावा लागेल रे थोडासा. थोडासाच. मी तुला जवळ येऊ नको म्हणत नाही आहे, आपल्यात हळुवार नातं आणि प्रेम निर्माण होण्यासाठी जे करवं लागेल ते कर पण अशी जबरदस्ती नको करूस, त्याने प्रेम नाही निर्माण होणार, झालीच तर घृणा होईल. आणि तू मला इथे आणलस, इतका धोका पत्करलास, इतका खर्च केलास ते तू का केलस, तुला तुझ्या सुनितासारखी प्रेयसी हवी होती, तुझ्यावर प्रेम करणारी की मी तुझ्या मनासारखं तुला हवं तेव्हा केलं तर माझा राग राग करून माझ्यावर खुन्नस खायला? आणि असा खुन्नस खाल्लास तर तुझी प्रेयसी तुला परत मिळेल का? आणि नाही मिळाली तर तू स्वतःलाच दुखावणार नाहीस का?

रफिक मी तुला खूप समजुतदार आणि मॅच्युअर्ड समजते. तुझं आजचं बोलण्याने मी दुखावले आहे, अर्थात तुझ्याबद्दल जे वाटतं ते वाटणं, तुझ्याबद्दलचा तयार झालेला आदर आणि तुझा स्वभाव आवडणं हे कमी नाही झालय.

मला वेळ दे. थोडासा. माझा भूतकाळ विसरायला. किंवा मी तो विसरावा अशी औषध दे मला. किंवा खरच माझ्या धर्मांतराची तयारी कर, म्हणजे तो माझा नवीन जन्म समजून, जुन्या जन्मातल्या सगळ्य गोष्टी मागे टाकून मी तुझ्या सोबत चालू शकेन. मला तुझ्यासारख्या समजूतदार आणि बुद्धीमान मानसाची सहचारिणी व्हायला आवडेल फक्त थोडा वेळ दे, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी, रोमान्ससाठी. माझ्यावर विश्वास ठेव, शारिरीक जवळीकीसाठी मी कायमची तुझीच आहे.

तुझी होऊ इच्छिणारी
दुसरी सुनिता'

माझं पत्र लिहून झालं, मी फातिमाला हाक मारली. माझ्या हाकेसरशी लगेचच फातिमा माझ्या खोलीत आली.

"फातिमा, इज रफिक अ‍ॅट होम?"
"येस"
"कॅन यु गिव्ह हिम धिस?" आणि मी तिच्या हातात तो टॅब दिला. टॅब घेऊन ती निघून गेली. आता रफिकने ते वाचून मला उत्तर देईपर्यंत होती फक्त अनिश्चितता.

*******************************

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/46425

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

ओके ..... फार काही घडलं नाही या भागात. आधीच्या भयानक अनुभवानंतर कथानायिकेनं एक बुद्धीबळाची खेळी केली आहे असं दिसतंय. पुढे काय होणार याची उत्सुकता .......

तुम्ही खुप सुंदर लिहिता. प्रत्येक भागाबरोबर उत्सुकता वाढतेच आहे. पुढचे भाग लवकर टाकत चला. २० आणि २१ मध्ये फार गॅप गेली.
मस्त चालू आहे.

वल्लरी ताई,

लय भारी...especially तुझी होऊ इच्छिणारी दुसरी सुनिता'.................भारी खेळी खेळणार ही..... Happy
प्रचंड आवड्ते आहे तुमचे लिखाण !!!!!!!!

pudhchya bhagachya pratikshet ahot
please lavakr navin bhag post kara
tumche likhan khupch sundar ahe
navin bhagachi ustukta lagun rahili ahe