आधुनिक सीता - २०

Submitted by वेल on 7 November, 2013 - 07:19

सर्व माबोकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

भाग १५ - http://www.maayboli.com/node/45696
भाग १६ - http://www.maayboli.com/node/45780
भाग १७ - http://www.maayboli.com/node/45869
भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013

************************************************

रफिकने दोन्ही पत्र वाचली. तो ती दोन्ही पत्र वाचत असताना मी मात्र माझ्या बेडवर पडून रहिले होते. रफिकसाठी माझे डोळे बंद होते परंतु मी डोळे अर्धे उघडे ठेवून त्याच्याकडे पाहात होते. अपेक्षेप्रमाणेच त्याच्या चेहर्‍यावर कोणतीही भावना नव्हती. मी डोळे बंदकरून पडले आहे हे पाहून रफिक दोन पत्र माझ्याजवळ ठेवून एक स्वतःसोबत घेऊन निघून गेला. तो बाहेर गेल्या गेल्या मी डोळे उघडले. जागेवरून उठावेसे वाटत नव्हते. रफिक कोणते पत्र ठेवून गेला होता आणि कोणते घेऊन गेला होता? माझ्या अंदाजाप्रमाणे त्याने सागरचे पत्र स्वतःसोबत नेले होते. पण कशासाठी?

थोड्या वेळ मी अशीच पडून होते. खूप थकल्यासारखं वाटत होतं. मी केलं ते योग्य होतं ना? म्हणजे सागरला सोडवण्याचा माझा हेतू पूर्ण झाला होता आणि त्यामुळे घेतलेला निर्णय योग्य होता. पण मी जर हे पत्र पाठवलं नसतं तर भास्करदादाने काहीतरी करून मला शोधून काढलं असतं सोडवलं असतं. आता मी स्वतःचेच दरवाजे बंद केलेत. अगदी दादा आणि सागरने मिळून मला शोधायचा प्रयत्न केला तरी माझं पत्र वापरून रफिक माझ्या सगळ्या वाटा बंद करू शकतो. कसं लक्षात नाही आलं माझ्या? म्हणजे मी आता इथे कायमची अडकले? पुन्हा एकदा डोकं विचार करून दुखायला लागलं. मी उठले आणि रफिकने ठेवलेले कागद पाहिले. माझा अंदाज बरोबर होता. रफिक सागरचे पत्र घेऊन गेला होता, बाबांचे आणि आजीचे पत्र ठेवून गेला होता. मी पुन्हा एकदा आजीचे पत्र वाचले. मग वाचता वाचता सगळ्यांच्या आठवणीने रडू आलं. विचारशक्ती थोडी शाबूत होती त्यादिवशी. जोरात रडू फुटण्याआधी बाथरूममध्ये धावले मी. पाण्याचा नळ सुरू केला आणि पत्र वाचता वाचता मनसोक्त रडून घेतलं मी. खूप वेळ रडून झाल्यावर मग हलकं वाटलं, पण डोकं मात्र दुखतच होतं.

बाहेर येऊन मी पुन्हा एकदा गादीवर पडून राहिले. आजीचं पत्र हातातच होतं. खूप रडल्यावर आता मला झोप येऊ लागली होती. अर्धवट झोपेत असताना पत्राचे आजीचे विचार डोक्यात फिरतच होते. आणि त्या विचारातच मला स्वप्न पडलं. मी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून पडले होते, आणी आजी माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. आजी म्हणाली, "एकदा जे ठरवलं आणि केलं त्याचा विचार नाही करायचा चूक का बरोबर, पुढे काय हे ठरवायचं. प्रत्येक गोष्ट लगेच होत नसते. भात मऊ शिजायला सुद्धा वेळ लागतोच. तसा वेळ द्यायचा. प्रयत्न करायचा पण प्रयत्नाला यश नाही आलं तर रडत नाही बसायचं." आजी, माझी आजी. खरच होती का माझ्या बाजूला?

डोक्याला कोणाचा तरी स्पर्श झाला म्हणून मी उठले. फातिमा माझ्याशेजारीच उभी होती. हाताने मला थोपटत होती. मी डोळे उघडलेले पाहून तिने मला एक उबदार स्माईल दिलं. बाजूलाच गरम गरम सूपाचा वाडगा होता. तिच्या हातात औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप होती. तिने मला खूणेनेच सांगितलं माझं अंग गरम होतं ... खरच माझं अंग गरम होतं. तिने दिलेली गोळी मी गुपचूप घेतली. माझे सूप पिऊन होईपर्यंत फातिमा बाहेरून माझे जेवण घेऊन आली. ताटलीत गरम गरम वरण भात होता. माझे डोळे पुन्हा पाण्याने भरून आले. सोबत होती बटाट्याची भाजी. माझा मूड खराब असेल तर, मला बरं नसेल तर मला हेच जेवण आवडायचं. इथे आल्यापासून प्रथमच मला वरण भात बटाट्याची भाजी खायला मिळत होती. कोणामुळे? कोणी ही माहिती रफिकला पुरवली? आजीने तर नाही न सांगितलं रफिकच्या माणसाला? ह्या जेवनामुळे दूर असली तरी मला माझी आजी खूप जवळ असल्यासारखं वाटत होतं.

रोज मला जेवताना सोबत करणारा रफिक आज माझं जेवून झालं तरी आला नव्हता. माझी मानसिक अवस्था ठीक असेल हे समजून नव्हता आला का तो? ह्या चांगुलपणाबद्दल आभार मानायला हवेत का त्याचे की तो अजून दोन दिवस तरी दिसू नये म्हणून प्रार्थना करायची.

खरं तर हे सगळं एखाद्या सिनेमा सारखं चाललं होतं पडद्यावर दिसतं तेवढंच खरं बाकी त्याच्या मगे काय काय असेल काय माहित.

रफिक मला भेटायला येऊ नये ही प्रार्थना न करताच तो दोन दिवस आला नव्हता. आता त्याच्या चांगुलपणाबद्दल खरच आभार मानायला हवे होते.

या दोन दिवसात मी खूप सावरले पुन्हा रुटिनला लागले. योगासनं, श्लोक, गाणी, मेडिटेशन, वाचन पुन्हा सुरु केलं. फातिमा वेळच्या वेळी यायची जेवण ठेवून कामापुरतं बोलून निघून जायची.

दोन दिवसांनी रफिक आला, संध्याकाळी. त्याने बुद्धीबळाचा पट आणला नव्हता. मुळात तो बुद्धीबळ माझ्याकडेच ठेवून का जात नसे मला माहित नाही, मीही कधी त्याला विचारलं नव्हतं. मला बुद्धीबळात खूप इंटरेस्ट आहे हे मला त्याला दाखवायचं नव्हतं.

"काय म्हणते आहेस, मूड चांगला आहे ना आता, घरच्यांना तुझी खुशाली कळली. तुला घरच्यांची. सागर तुरुंगातून सुटला, त्याच्यावरचा आरोप तुझ्या बाबांनी मागे घेतला. आणि हो तुला एक बातमी सांगायची होती, सागरने ते पैसे वापरायचं मान्य केलं आहे."

"काय? नक्की? तुला कसे कळले?"

"तुला काय करायच आहे मला कसं कळलं. खूप जास्त नाक नको खुपसू प्रत्येक गोष्टीत. गरज नाहीये त्याची."

मला कळेना अचानक हे असं उत्तर?

"आता सागरनेही मान्य केलं आहे तू इथे राहाण्याबद्दल, पत्रातून आणि पैसे घेऊन. आता मला ...." आणि त्याने पॉझ घेतला.

"??" माझ्या चेहर्‍यावर फक्त प्रश्नचिन्ह.

आणि मला काही कळण्यापूर्वी तो माझ्या जवळ आला, त्याने माझा चेहरा त्याच्या दणकट हातात पकडला आणि मी त्याला कसे थांबवावे ह्याचा विचार करू न देता त्याने माझे दीर्घ चुंबन घेतले. एका हाताने मला कवटाळून धरून त्याचा दुसरा हात माझ्या पाठीवरून, शरिरावरून फिरत होता, मला ठिकठिकाणी स्पर्श करत होता, माझे शरीर कवळत होता. त्याक्षणी नको वाटत होता तो स्पर्श. इतकी काय घाई होती ह्याला. मला थोडा वेळ दिला असता तर मी त्याला वश झाले नसते का? मला काही चॉईस नव्हता दुसरा, मी मनापासून त्याला वश व्हायला तयार होते, हे कसं सांगायचं त्याला मला कळेना. पण मला अजून थोडा वेळ हवा होता. त्याक्षणी त्याला जोरात मागे ढकलावेसे मला वाटत होते, पण त्याच्या पुढ्यात माझी ताकद अगदीच कमी पडली असती. आणि अशा रानटी मनस्थितीत त्याने मला इजा करण्याचीही शक्यता होती. मी काहीही प्रतिसाद न देता शांत दगडासारखी उभी होते. मी काहीच प्रतिसाद देत नव्हते हे त्याला काही मिनिटांनंतर त्याला जाणवले. त्याने मला ज्या आवेगाने जवळ घेतले त्याच वेगाने दूर केले.

"हे बघ सरिता, आज वर मी तुझ्यावर जबरदस्ती केलेली नव्हती, पण तू जर मला प्रतिसाद दिला नाहीस तर मग ... मला जस प्रेम करता येतं तशी मला जबरदस्ती करता येते हे मी तुला दाखवून देईन."

"रफिक पण माझं ऐकून तर घे."

"मला ऐकायचं नाहीये, इतके दिवस तुला राणीसारखी ट्रीटमेण्ट दिली ती काय फुकट येते काय? फातिमाने काय कमी सेवा केली आहे का तुझी, तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे ती. तिच्याच वडिलांच्या पैशावर माझे व्यवसाय उभे राहिलेत आणि ती तुझ्या दासीसारखी तुझ्या मागे पुढे करते आहे. इथे भारतीय शाकाहारी जेवण किती महाग मिळतं माहित आहे का? तुझ्या घरच्यांना तुझी खुशाली कळवायला मी माझा खास माणूस पाठवला, ते लोक तुला उत्तर द्यायला तयार नव्हते, त्यांच्या हातापाया पडून माझ्या माणसाने उत्तर आणलं, सागरला पैसे दिले .. हे बघ, मी म्हणेन तसं तुला वागावं लागेल, तुला मला खूष ठेवावं लागेल नाहीतर ... आजवर तू माझा चांगुलपणा पाहिला आहेस, आता मी किती टोकाला जाऊ शकतो ते पाह्शील. सुनिताने एकदा माझ्यासोबत गोव्याला यायला नाही म्हटलं होतं तिची आई नाही म्हणते म्हणून. त्यावेळी ती घरात राहिली आईच्या इच्छेने पण हात तोडून.. . विसरू नकोस."

"रफिक ..."

"जास्त दिवस लाड करणार नाहिये मी तुझे. तुला विचार करायला मी तुला एक दिवस देतो, आजचा. आणि उद्याच्या उद्या तू माझ्या म्हणण्यासारखं वागलं पाहिजेस. ते वागलीस तर तुझे सगळे लाड चालू राहतील नाही तर मग उद्यापासून दिवस बघणार नाही की रात्र, तू मला चांगला रिस्पॉन्स देईपर्यंत तुझ्यावर सतत जबरदस्ती करत राहेन. समजलं? आणि एवढं होऊनसुद्धा जर तू मला सुखी केलं नाहीस तर मग मी तुझं काय काय करू शकतो त्याची तुला कल्पनासुद्धा नाहीये. आमच्याकडे काम न करणार्‍या उंटाला गोळी घालून मारून टाकतात आणि मग त्याच्या शरिराच्या प्रत्येक भागाचा फायदा करून घेतात, केलेल्या खर्चाची वसूली म्हणून. त्याच्या शरीराचे काही भाग विकून टाकतातजसं त्याचं मास, त्याची स्किन.. तुझ्यावर केलेल्या खर्चाची वसूली करायला मला तुला मारायची गरज नाहीये. माझ्याकडे इतर खूप मार्ग आहेत. तू माझं ऐकलस तर राणी नाहीतर खुन्नस आणि पैसा वसूलीसाठी माझ्या आणि इतर अनेक घरांची दासी. मग तू घरकाम कर किंवा इतरांना गादीत सुख देऊन माझा पैसा वसूल करून दे काय?"

एवढं बोलून रफिक निघून गेला.

******************

क्रमशः

pudhachaa bhaag - http://www.maayboli.com/node/46297

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*****

वल्लरी गं!!!!

असं नको ना करुस! कध्धीची वाट पहातोय आम्ही या भागाच्गी आणि आज दिसला तर अर्धवट! Sad

छान.

माबोकरांनो हा भाग पूर्ण करायला वेळ लावला म्हणून मला उदार मनाने माफ करा.

पुढे नक्की काय लिहायचं (कथेत ट्विस्ट कसा आणयचा) हा विचार करायला खूप वेळ लागला आणि वेळ लागला लिहायला. मध्ये मध्ये गटग, आणि हितगूजचे बाकीचे ग्रूप्स ही वेगवेगळी अ‍ॅट्रॅक्शन्स होतीच.

ह्याच्या पुढचा भाग लवकर टाकेन.

ड्रीमगर्ल, येणारेस ना गटग ला?

वल्लरी ताई.....
खास भाग !!!
अनपेक्षीत twist !!!!
तो रफिक आलाच शेवटी आपल्या अरबपणावर Happy

झाले सर्व भाग वाचुन. आत्ताचे वळण पण बाप रे! आहे.
पण एकुण कथा, कथेतले विचार छान आहेत. आता आम्हीपण इतरांच्या लायनीत आलो (म्हणजे पुढचा भाग कधीच्या रांगेत) Happy

हा ट्विस्ट पटला नाही. रफीकसारखा पझेसिव माणूस "माझा एक अरब मित्र येत जाईल" हे म्हणणे पटले नाही. तो तिच्यावर जबरदस्ती करू शकेल (इन फॅक्ट ते अपेक्षितच होते) पण दुसर्‍यांना त्यात सामिल करून घेऊन वगैरे थोडं जड गेलं.

नेक्स्ट भागाच्या प्रतिक्षेत.

" रफीकसारखा पझेसिव माणूस "माझा एक अरब मित्र येत जाईल" हे म्हणणे पटले नाही. तो तिच्यावर जबरदस्ती करू शकेल (इन फॅक्ट ते अपेक्षितच होते) पण दुसर्‍यांना त्यात सामिल करून घेऊन वगैरे थोडं जड गेलं.

नेक्स्ट भागाच्या प्रतिक्षेत." >> +१

विद्या.

नंदिनी, विद्या, - ह्याच करता मला वेळ लागत होता ..... मला ठरवता येत नव्हतं की रफिकच्या व्यक्तिमत्वात पीळ दाखवायचा का नाही...

पुढे पुढे वाचत राहा.

वल्लरी, असे (मराठी मालिकांच्या लेखकांसारखे) आयत्या वेळी सुचेल तसे लिहू नकोस. अन्यथा इतका गुंता होइल की सोडवता येत नाही. उदाहरणासाठी माझी जुन्या माय्बोलीवरची "रेहान" वाचून घे. त्याच्यात इतके गोंधळ झाले की नंतर मी डोकेफोड करायची शिल्लक ठेवली होती. सुदैवाने तेव्हच नवीन माय्बोली चालू झाली आणि ते प्रकरण तिथेच राहिले. Happy

आधी कथा पूर्ण आखून घे. चॅप्टरवाईज ब्रेक डाऊन कर आणि नंतर लिहिताना डीटेल्स भर. प्रत्येक चॅप्टरमधे कथा कुठे नेऊन थांबली पाहिजे याचा तुला अंदाज आला पाहिजे.

यकदम बेश्टच सांगितलस ग तू.. लक्ष्यात ठेवीन. शॉल्लीड डोकॅलिटि.

खरतर मी विचारच करत होते काही तरी राहतय.. हरवतय..

तुझ्या रेहानची लिंक दे ना.. Wink .. थोडी कन्फ्युज होऊन घेते, मग कळेल कसं कन्फ्युज नाही व्हायचं. Happy

थोड्या दिवसापूर्वी मी एक कथा मायबोलिवर टाकली होती. ती माझ्याकडे ड्राफ्ट्मधे ६ महिने पडून ह्ओती. प्रत्येकवेळी लिहायला घेतली की काहीतरी कमी वाटायचं. पण पूर्ण केल्यावर भारी वाटलं. पात्रांमधे आणि त्याण्च्या व्यक्तिमत्वाची कल्पना नसेल तर गोन्धळ नक्कीच होतो.
पु.ले. शु.
विद्या.

वल्लरी, समुद्रकिनारा लिहिते आहे ना, ते ओरिजिनल "रेहान"एच आहे. पण आता नक्की काय लिहाय्चं हे क्लीअर ठेवून लिहितेय. म्हनून झोल होतच नाहीत.

असं ब्रेक डाऊन करून पूर्ण केलेली मोरपिसे. कितीही उशीर झाला तरी लिखाण पूर्ण करता येतं त्यामुळे.

Pages