१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच) 
फिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.


ही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.
दसरयाच्या शुभेच्छा ….!!!!!
साधारण चार वर्ष उलटली असतील अजूनही तशीच जशी पहिल्यांदा पहिली होती. तोच भरजरी काठ, तेच नाचरे मोर सात. अनेक साड्यांच्या गर्दीत आपले अस्थित्व जाणवून देणारी "पैठणी"
एकाच गोष्टीची खंत, सरत्या काळात वापर फक्त दोनदाच. एकूणच महिलावर्गाच गणित अजूनकाही पुरुषवर्गाला उलगडलेलं नाही. आईची हि पैठणी नवीन रूपाच्या प्रतीक्षेत असावी कदाचित ……………………
विजयादशमी-दसरा शुभेच्छा
Happy Dussehera TO All Of You!!!


हे स्केच ४-५ वर्षांपूर्वी काढलं आहे…
सुरुवात केली ती पेन्सील ने पण पेपर ग्लोस्सी असल्याने हवा तसा डार्कनेस चा इम्प्याक्ट मिळत नव्हता,
शेवटी काळया बॉलपेन ने शेडींग केलं, आणि हवा होता त्यापेक्षा वेगळाच इफ्फेक्ट मिळाला…
हि स्कॅन कॉपी नसून मोबाईल वरून फोटो काढल्याने जरा अस्पष्ट आलय…
हे मी केलेलं आणखी एक ग्लास पेंटींग.
उमर खय्याम सिरीज मधली ही एक भावमुद्रा !!

हा सरळ काढलेला फोटो.... दिनेश आणि दाद साठी
ह्यात फ्लॅश चमकलाय म्हणून टाकला नव्हता.

कृपया कोणी सांगेल का की केसांना लावायचे ब्रॉच याचे डिझाईन पुस्तक मुंबई किंवा पुणे ईथे कोठे मिळेल. मी नेट वर खुप शोधले पण नाही मिळले.
सुख अतिच जाहले
सुख सोसवत नाही
भरुन वाहुन चालले
हाती मावतही नाही
केली माया गोळा
मोठे इमले बांधले
गेली पिले उडुनिया
घर एकटे राहीले
धन जाळाया नवे
नको नको ते उपाय
खोवूनिया मोरपिस
काक लागले नाचाया
लोभ सत्ता संपत्तीचा
सर्व हवे फक्त मला
सारा कल्लोळ उत्सवाचा
मुका, आवाज आतला
चहुकडे मांडला
सुखासिनतेचा बाजार
कष्ट नाही शरीराला
भेटे नवा नवाच आजार
नाही थांबायाला वेळ
उरीपोटि धावताना
हे सारं कशासाठी
स्वत:लाच विचाराया
मला काय आवडते
मनाला ठाऊक नाही
हवे हवेच्या ध्यासात
दूसरे काही सुचत नाही
ह्या वेगाच्या वेडात
सुखामागे लागायचे
लक्ष्मीच्या उपासनेत
सरस्वतीला विसरायचे