जयवी

डायनिंग टेबल चेअर बॅक्स

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 19 August, 2014 - 10:19

हे नुकतेच तयार झालेले डायनिंग टेबल चेअर बॅक्स !

सुरवातीला केसमेंटचं कापड आयाताकृती कापून त्याला क्रोशाने बॉर्डर करुन घेतली. मग बॅक वर्कने आत दोन आणखी बॉर्डर्स करुन घेतल्या. क्रोशाचीच छोटी फुलं करुन त्यावर एकेक मणी टाचून घेतला Happy

IMG_5232.JPGIMG_5234.JPGIMG_5675-001.JPGIMG_5676-001.JPG

विषय: 
शब्दखुणा: 

डायनिंग टेबल मॅट्स

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 31 March, 2014 - 02:01

ह्या क्रॉसस्टीच ने भरलेल्या डायनिंग टेबल मॅट्स !! आधी क्रोशाने बॉर्डर करुन घेतली आणि मग डिझाईन केलं.

IMG_5224.JPGIMG_5225.JPGIMG_5229.JPGIMG_5230.JPGIMG_5205.JPG

विषय: 

दिवाळी स्पेशल - गुलाबाचे चिरोटे

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 1 November, 2013 - 01:18
gulabache chirote
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
पाककृती प्रकार: 

ग्लास पेंटींग

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 29 October, 2013 - 01:43

हे मी केलेलं "उमर खय्याम" सिरीज मधलं आणखी एक ग्लास पेंटींग.

2013-06-11-149.jpg

विषय: 

क्रोशे बुक मार्क

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 October, 2013 - 00:10

हे एक डिझाईन नेटवर मिळालं. त्याचा कसा उपयोग करावा हा विचार करता करता हा "बुकमार्क" तयार झाला Happy

DSC02802-003.JPG

हा नेटवर मिळालेला कृतीचा फोटो.

echarpe-5-jpg.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

उमर खय्याम - ग्लास पेंटींग (समोरुन फोटो)

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 8 October, 2013 - 02:46

हे मी केलेलं आणखी एक ग्लास पेंटींग.
उमर खय्याम सिरीज मधली ही एक भावमुद्रा !!

2013-06-11-146.jpg

हा सरळ काढलेला फोटो.... दिनेश आणि दाद साठी Happy ह्यात फ्लॅश चमकलाय म्हणून टाकला नव्हता.

2013-06-11-144.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

थैमान

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 June, 2013 - 07:24

बाहेर पावसाने, थैमान घातलेले
हृदयात आठवांचे काहूर पेटलेले

झड लागली कधीची, थांबेचना कशाने
आक्रोश हा घनांचा, आभाळ फाटलेले

अश्रूस पूर येता, दु:खास कोंब आले
बहरेल दु:ख माझे, अश्रूत पोसलेले

वैराण भावनांच्या, होळीत खाक झाले
डोळ्यात आटलेल्या, नवस्वप्न पोळलेले

दु:खात वेढलेल्या, या झोपडीत माझ्या
परतेल का पुन्हा सुख, दारात थांबलेले

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - जयवी