बरं

बरं वाटतंय का आता?

Submitted by _आनंदी_ on 21 September, 2025 - 12:03

बरं वाटतंय का आता?
हो आहे खरी शांतता ..
पाश तुटले का सगळे?
संपल्या का अपेक्षा?

किती ते शब्द मनात जपलेले ..
किती त्या आठवणी खोलवर रुजलेल्या ..
अंकगणिताच्या हिशेबाने कमीच
पण मनात ठाण मांडून बसलेल्या ..

संपलं का मग सगळं ?
इतका सोप्पं होता का?
वेळ सगळं ठीक करते का?
हेचं औषध असतं का?

जाऊ दे झाल बरंच झालं .. त्रासातून मुक्ती . .
नकोच ती तगमग. . अंगाची लाही लाही.

हातात उरलं तर काहीच नाही . .
तसही होतच कुठे कुठल्या काळी . .
रीते हाथ रीते मन. .
स्पर्शून मात्र गेले काहीतरी विलक्षण

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बरं