
परवा ऋतुराज यांच्या भांड्याकुंड्यांच्या धाग्यावर माझ्या नवीन मित्राचा हा फोटो टाकला होता:
तिथे हल्ली क्रोशाचा छंद जडल्याचा उल्लेख केला होता. मग वाटलं तो 'पुराव्याने शाबित' करावा.
सहज मुलाबरोबर क्राफ्ट स्टोअरमध्ये गेले असताना खूप सवलतीच्या दरात दिसली म्हणून लोकर, सुई आणि हा मित्र घरी आला, आणि आता तोच लाडका विरंगुळा होऊन बसला आहे!
हे सगळं अगदी नवखं, 'चिमखडे बोल' पातळीवरचं काम आहे. 'क्राफ्ट' आत्मसात करते आहे, आर्टच्या लेव्हलला कधी जाईल, न जाईल, माहीत नाही.
सध्या निरनिराळे टाके समजून घेणं आणि यूट्यूबवरच्या तयार आज्ञावली पाहून छोट्या छोट्या गोष्टी तंतोतंत जमवायचा प्रयत्न करणं सुरू आहे.
पण मला फार मजा येते आहे! दिवसभराचं काम संपलं की हात सुई धरायला शिवशिवतात! टाके विणले जातात तशा मनाच्या गाठी सुटत जातातसं वाटतं.
आय नो, आय नो, फार चीजी झालं. थांबते आणि फोटोंना बोलू देते.
छोटे प्राणी, सेल फोन पाउचेस आणि बुकमार्क्स मित्रमैत्रिणींना भेटींदाखल दिले - आपल्या हाताने केलेली छोटीशीसुद्धा वस्तू देताना छान वाटतं.
आता आरसे जडवलेले ग्रॅनी स्क्वेअर्स करायला शिकते आहे. मग त्यांच्या पर्सेस किंवा श्रग्ज वगैरे बडे ख्याल गाता येतात का पाहू!
हे कोस्टर्स आणि त्यांच्यासाठी छोटीशी बास्केट:
मस्त झालं आहे.
मस्त झालं आहे.
खूपच छान स्वाती.
खूपच छान स्वाती.
अजून सुंदर सुंदर कलाकृती घडायला शुभेच्छा.
ते कुत्रा आणि मांजर किती गोड
ते कुत्रा आणि मांजर किती गोड झाले आहेत..
पुरावा पुरेसा नाही म्हणून
पुरावा पुरेसा नाही म्हणून साक्षिदार हजर आहेत. मनीमाऊ होम-ऑफिसमध्ये विराजमान आहे सध्या.
वा Amigurumi मस्त जमलेय
वा Amigurumi मस्त जमलेय
तो ताल जमला की मेडिटेशनच!
>>टाके विणले जातात तशा मनाच्या गाठी सुटत जातातसं वाटतं.<< कितीही चिजी वाटलं तरी फॅक्ट आहे ती
स्वागत क्रोशाविश्वात.
अरे हा. तो कप भारी आहे
अरे हा. तो कप भारी आहे
छान आहेत कलाकृती.
छान आहेत कलाकृती.
I am counting my stitches
टाके विणले जातात तशा मनाच्या गाठी सुटत जातातसं वाटतं>>>>> धागा खरच सुखाचा आहे
खूपच छान कलाकृती. नवखेपणा
खूपच छान कलाकृती. नवखेपणा अजिबात वाटत नाही
सुंदर! मला grany square फार
सुंदर! मला grany square फार आवडतात.
भारी आहे हे
भारी आहे हे
ट्रेन मध्ये बऱ्याच जनी काही बाही विनताना दिसतात. .
तुमचे बघून मलाही शिकावेसे वाटते आहे
मस्त आहे नवा धागा ते भुभू
मस्त आहे नवा धागा
ते भुभू माऊ फ्रॉग वगैरे फारच क्यूट!!
तो भूभू क्यूट आहे खूप.
तो भूभू क्यूट आहे खूप.
लोकर, मणी यांच्यापासून अशा सुंदर वस्तू बनवणारे लोक नात्यात आहेत. त्यांच्याबद्दल आधी आदर वाटायचा, आता त्यांचा हेवा वाटतो. छंद किती आनंद, शांती देऊ शकतात हे आताशा कळायला लागले आहे. इतर छंदांना स्थळ-काळाचे बंधन असते, तसे या छंदाचे नाही. कधीही, कुठेही उघडा पिशवी आणि लावा समाधी - हेवा वाटणारच ना.
टाके विणले जातात तशा मनाच्या गाठी सुटत जातातसं वाटतं. >> क्लिशे असलं तरी सत्य आहे.
माधव ह्यांना अनुमोदन... असा
माधव ह्यांना अनुमोदन... असा काही तरी छंद असला की मन आपोआपच शांत होतं.
स्वाती मस्त केलं आहेस सगळच. भु भू सर्वात आवडला पण.
छान. तुमचा समाधीप्रवण मित्र
छान. तुमचा समाधीप्रवण मित्र आवडल्याची पोचपावती पुन्हा एकदा.
पुरावे = 👏
पण तो क्रोकरी धागा माझा नसून ऋतुराजचा आहे. ज्याचं दान त्याला
प्रोत्साहनासाठी सर्व
प्रोत्साहनासाठी सर्व प्रतिसाददात्यांची अतीशय आभारी आहे!
हो - असे छंद therapeutic असतात खरंच! विणता विणता वस्तू आकार घ्यायला लागते तेव्हा जादू झाल्यासारखं वाटतं!
हात बसेतो लोकरीचे सहज विलगणारे पेड, सुईची फ्रिक्शन वगैरेंबद्दल तक्रार केली जाते, निरनिराळ्या मटेरिअलच्या, जाडीच्या लोकरींचा स्वभाव समजायला वेळ लागतो. तेच हात बसला की जणू सुई, लोकर आणि हात ही सगळीच अवजारं जणू कोणी तिसरीच अदृश्य शक्ती चालवत असावी तसे झरझर चालतात.
मग जनीचं दळण करणारा विठ्ठल आणि कबिराचे शेले विणणारा कौसल्येचा राम ओळखीचा वाटायला लागतो.
अवलने वापरलेला 'ताल' शब्द अगदी नेमका आहे. ताल सापडायला हवा कुठल्याही अॅक्टिविटीचा - मग चालणं पदन्यास होऊन जातं आणि बोलणं कविता! असो.
>>> क्रोकरी धागा माझा नसून ऋतुराजचा आहे
अर्र! असं झालं का! सॉरी, ऋतुराज!
अनिंद्य, मला सांगा जरा, तो आंब्याच्या धाग्याचा थम्बनेल कसा दिला आहे तुम्ही? मी कालपासून प्रयत्न करते आहे, पण मला साधलं नाही.
थंबनेल ?
थंबनेल ?
लेखाच्या title च्या बाजूचे चित्र ? “लेखनाचा धागा”सुरु करतांना त्याखाली “मुख्य चित्र/फोटो” येते त्या खिडकीत फोटो डकवला मी.
दुसरे काही असेल तर नैमालूम मेरे कू.
हो, मी तेच ट्राय केलं, पण
हो, मी तेच ट्राय केलं, पण माझा फोटो नाही दिसत यादीत!
बघते, शोधते.
आता दिसतोय मला तरी
आता दिसतोय मला तरी 👍
आता दिसतोय फोटो....
आता दिसतोय फोटो....
अरे वा! मस्तच.
अरे वा! मस्तच.
येस येस, जम्या!!
येस येस, जम्या!!
साइज लहान केला.
मस्त!
मस्त!
therapeutic >>>> खरं आहे. मला हल्ली लॉन मोविंग, तण काढणे, एकंदरीतच बागकाम therapeutic वाटायला लागलं आहे.
गोडुले आहे सगळेच.
गोडुले आहे सगळेच.
अरे वा. स्वाती तुला पण जोवर
अरे वा. स्वाती तुला पण ज्वर चढला की. फार सुबक काम केलं आहेस.
दिवसभराचं काम संपलं की हात सुई धरायला शिवशिवतात! टाके विणले जातात तशा मनाच्या गाठी सुटत जातातसं वाटतं. >>> हे अक्षरशः खरं आहे. खोटं वाटेल पण मला लोकरीचे रंगेबिरंगी गुंडे, पॅटर्न्स, दिवसभरात पिंटरेस्ट आणि युट्यूबवर पाहिलेल्या छान छान वस्तू स्वप्नात यायचे. कधी एकदा सकाळ होतेय आणि सुया हातात घेऊन विणतेय असं व्हायचं. सकाळच्या चहाबरोबर थोडंतरी विणकाम केल्याशिवाय चैनच पडत नसे. Rehabilitation ला जाण्याची वेळ आली होती म्हणेनास.
नवीन प्रतिसादकांचे आभार!
नवीन प्रतिसादकांचे आभार!
अवल आणि मामी या क्रोशे मास्टर्सच्या शाबासकीमुळे मला स्पेशल हुरूप आला आहे.
सिंडे

पराग, ज्याच्या-त्याच्या हरखण्यासारखी ज्याची-त्याची थेरपी.
स्वाती, ही काय अशी किट मिळते
स्वाती, ही काय अशी किट मिळते का?
मलाही आवडेल प्रयत्न करून पाहायला.
पण झिरो पासून शिकवायला लागेल.
भारतात मिळते का?
किट्स मिळतात, पण मी या
किट्स मिळतात, पण मी या सुट्ट्याच लोकरी आणून यूट्यूबवरची ट्युटोरिअल्स पाहून हे प्रकार केलेत.
भारतातही क्राफ्ट स्टोअर्समध्ये मिळायला हवीत.
अवल सांगू शकेल - मला वाटतं ती शिकवतेही.
स्वाती , सुंदर केले आहे .
स्वाती , सुंदर केले आहे . रंगसंगती उत्तम !! नवखेपणा अजिबात वाटत नाही. मीही मोत्याच्या तोरण , महिरपी , कागदी फुले करते. जसे जसे वस्तू आकार घेत जाते , तसे आपल्याला ही मस्त वाटते.
रंगसंगती खाऊन टाकावे असे
रंगसंगती खाऊन टाकावे असे वाटणारी आहे. जस्ट डिलिशिअस. सर्व कलाकृती सुंदर आहेत. भुभू, माऊ, घुबड, बेडुक - फार गोड.
कलाकृती तर सुंदर गोडुल्या
कलाकृती तर सुंदर गोडुल्या आहेतच, पण त्याची मीमांसा तुम्ही फारच छान केलीये स्वाती. छंद नि आनंद हे समानार्थी होऊन जातात त्या माणसाकरिता.
Pages