कला
क्रोशे आणि इतर काही
क्रोशेची साथ आली आहेच तर आपणही आपली कला रसिक मायबोलीकरांसमोर मांडावी या हेतूनं धागा काढत आहे.
एक धागा सुखाचा
रॉक बॅलन्सिंग आर्ट - लगोरीचे अपग्रेड वर्जन
गेल्या महिन्यात मी एक वर्कशॉप अटेंड केले. रॉक बॅलन्सिंग वर्कशॉप
रॉक बॅलन्सींग म्हणजे एकावर एक दगड रचून साधलेला बॅलन्स. आपण लहानपणी लगोरी खेळलोय ते आठवतय? एक प्रकारचे रॉक बॅलन्सिंगच ते देखील. पण तिथे एक उतरंड होती. आता जो प्रकार शिकायला गेले होते तिथे असा क्रम असायलाच हवा असे बंधन नव्हते.
एका ओळखीच्या व्यक्तीच्या वॉलवर रॉक बॅलन्सिंगचे फोटो बघून उत्सुकता चाळवली आणि हे वर्कशॉप घेणाऱ्या व्यक्तीला शोधून फेसबुक मेसेंजर वरुन सरळ मेसेजच केला आणि मग तिथून त्याच्या व्हॉट्स ॲप ब्रॉडकास्ट गृपवर दाखल झाले.
Twisted Tales नी च्या दशकपूर्तीनिमित्त कलाप्रदर्शन
Twisted Tales
मी 'नी' हा तारांपासून बनवलेल्या दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. त्याला आता लवकरच १० वर्ष पूर्ण होतील. आधी दागिने मग तार हे माध्यम घेऊन wearable art असा होत गेलेला प्रवास आता ताराचित्रे व मिक्स मिडिया इथपर्यंत आला आहे.
तर दशकपूर्ती निमित्ताने मी माझ्या ताराचित्रे व मिक्स मिडिया चित्रांचे पहिले आणि एकल प्रदर्शन करते आहे.
कधी: 8-13 एप्रिल.
सकाळी 11 ते संध्याकाळी 8.
उदघाटन: 8 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता.
स्थळ: पी. एन. गाडगीळ & सन्स, हॅपी कॉलनी शाखा, कोथरूड, पुणे
जरूर या!
कलाकलांचे सांगणे
मनोज मोहिते
कलानिर्मितीची प्रक्रिया ही तशी देखणी नसते. पण त्यात सौंदर्य असते. देखणी या अर्थाने की, कला पूर्ण रूप आकार घेते तेव्हा ती सुटीसुटी असते. तिच्याभोवती अस्ताव्यस्तपणा असतो. तिच्यात अस्ताव्यस्तपणा असतो. कलावंत अस्ताव्यस्त असतो. अस्ताव्यस्तपणा फारसा कुणाला आवडत नाही. देखणेपणा हवाहवासा असतो. पण, या अस्ताव्यस्ततेचा अर्थ ज्याला पुरेसा ठाऊक असतो, यातले सौंदर्य जो शोधतो, तो त्यात रमतो. न ठाऊक, तो कलेत रमण्यापासून वंचित राहण्याचा धोका उद्भवतो.
दृष्यावरून गाणे ओळखा-५
बिएनवेनिदोस अ कोलंबिया
कोलंबिया म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यात लगेच काय येतं तर तिथली गुन्हेगारी आणि ड्रग्जसाठी ओळखला जाणारा एक बदनाम देश. कोकेन बनवणारा सगळ्यात मोठा देश आहे हा.
सोशल मीडिया ट्रोलिंग: दुर्लक्ष हाच यशाचा मार्ग
सोशल मीडियावर ट्रोलिंग हा विषय गेल्या काही दिवसांत आणि काही वर्षांत खूपच चर्चेचा बनला आहे. कोणत्याही लेखकासाठी किंवा सर्जनशील व्यक्तीसाठी सोशल मीडिया एक महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म ठरतो, कारण त्यावरून तो लोकांशी जोडला जातो, त्याच्या कामाची दखल घेतली जाते आणि प्रतिक्रियाही मिळतात. मात्र, या प्लॅटफॉर्मसोबत ट्रोलिंगचं विळखा घेणारं स्वरूपही येतं, जे अनेक वेळा व्यक्तीला मानसिक तणावात टाकतं.
डबल स्टँडर्ड्स- ऑब्जेक्टिफायिंग मेन vs वुमन
आजकाल मायबोलीकर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, काही सहजगत्या तर काही गंभीरपणे विचार करण्यास लावणाऱ्या. असाच एक धागा ( मराठी चित्रपट) वाचताना लक्षात आलं की काही महिला काही मराठी पुरुष अभिनेत्याच्या सिनेमातील शॉवर सीनबद्दल चर्चा करत होत्या, आणि त्याबद्दल अधिक पाहण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. त्याच धाग्यावर पुढे एका पुरुषानेही अशा प्रकारच्या दृश्यांबद्दल टिप्पणी केली होती- की हा अमुक अमुक चित्रपट मधे अजून एक सिन आहे त्या अभिनेत्याच्या अंघोळीचा… मनात सहज प्रश्न आला—ही कामुकता (sexualization) आहे का? आणि जर आहे, तर ती फक्त महिलांबद्दल बोलली गेल्यावरच कामुकतेची व्याख्या होते का?
