नाही, म्हणजे काय लिहायचे या माणसाबद्दल!
एक पिढी की काही पिढ्या बनवल्या!
KBC बघताना दिसणारा तो बघून आपल्या पुढच्या पिढीला कदाचित खरेच वाटणार नाही.
बाकी त्याचा इतिहास करोडो लोकांना पाठ आहे. जंजीर, दीवार, शोले वगैरे!
लुडुबुडू, गुळगुळीत नायकांची सद्दी कशी संपली ते कोणीही सांगू शकतो.
कोणत्या भूमिकेचा विशेष उल्लेख करायचा हा प्रश्नही पडत नाही.
एरवी हिंदी चित्रपट गीते बघताना सहसा सुंदर सुंदर अभिनेत्री भुरळ पाडतात. हा एक मनुष्य असा, की गाणे बघतानासुद्धा त्याच्याचकडे तमाम प्रेक्षक बघायचे.
उंची, डोळे आणि आवाज याचा सर्वाधिक परिणामकारक वापर करणारा अभिनेता! देहबोली अत्यंत प्रभावशाली! कॉमेडी? उत्तम! नृत्य? उत्तम!
ज्याच्यासाठी कथानके लिहिली गेली असा तो!
दुर्दैवाने काही angree टाळकी उपजली असतीलही समाजात, पण तो स्वतः मुळात तसा नाही. त्याच्यासारखे होणे म्हणजे वाटेल तसे वागणे नव्हे, हे न कळणारे लोक सोडून देऊ.
अपघात झाला, बहुगुणांना हरवले, नुकसान झाले, सगळे कर्ज फिटले, अजूनही कार्यरत!
अनिल कपूर एकदा एक टेक देत असताना हा काही कारणाने सेटवर आला. ह्याला पाहून अनिल कपूर नर्व्हस झाला आणि सेट सोडून निघून गेला. असले याचे वजन! हम, अग्नीपथ पर्यंत हिरो म्हणून वावरला. नंतर जरा वयानुसार भूमिका घेतल्या तरी हिरो तोच!
काही टुकार सिनेमे, काही टुकार भूमिका या असतीलही! मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकसंख्या सातत्याने प्रभावित करणे व मनात रुजणे हे अफाट!
पुण्यातील नटराजला त्याकाळी अक्षरशः एकापाठोपाठ एक याचेच चित्रपट येत.
दिलीप कुमार, प्राण, संजीव कुमार, खरे तर सगळ्यांनाच आजही पुरून उरलेला अभिनेता!
निसर्गाने आपल्याला जे काही दिले आहे त्याचे प्रतिभेत रूपांतरण करून दोनशे टक्के परत देणारा माणूस!
निदान माझ्यातरी पिढीचा कायमचा महानायक!
अमिताभ बच्चन!
=====
-'बेफिकीर'!
निदान माझ्यातरी पिढीचा कायमचा
निदान माझ्यातरी पिढीचा कायमचा महानायक!>> अनेक पिढ्यानंचा.
लेखाशी सहमत.
लेखाशी सहमत.
सुरेख. अमिताभ , अमिताभ,
सुरेख. अमिताभ , अमिताभ, अमिताभ. माझाही लाडका.
माझ्या पिढीसाठी फक्त दोनच
माझ्या पिढीसाठी फक्त दोनच सुपर्रस्टार... त्यात एक अमिताभ!
अमिताभ आणि अनिल कपूर यांचे एकत्र पिक्चर सुद्धा आठवत नाहीत फार.. एक अरमान म्हणून होता पण तो बंडल होता. दोघांच्या जातकुळीतील नव्हता.
पूर्ण सहमत ! व इतकं असूनही
पूर्ण सहमत ! व इतकं असूनही मूर्तिमंत सौजन्य !! त्रिवार सलाम !!!
पूर्ण सहमत ! व इतकं असूनही
पूर्ण सहमत ! व इतकं असूनही मूर्तिमंत सौजन्य !! त्रिवार सलाम !!! > पूर्ण सहमत !
पूर्ण सहमत!
पूर्ण सहमत!
अॅक्टिंग बिक्टिंग ओके. पण ती
अॅक्टिंग बिक्टिंग ओके. पण ती फक्त अॅक्टिंगच. खरा आहे तो कणा नसलेला माणूस. सत्तेसमोर वाकून चाटूगिरी करणारा. टोटली मातीचे पाय..
लेख चांगला आहेच आणि बहुतांश
लेख चांगला आहेच आणि बहुतांश सहमतही आहे. कशाच्या निमित्ताने - काही नवीन पिक्चर आलाय का?
नटराज बद्दल - माझ्या डोक्यात अमिताभचे असोसिएशन मंगलाशी जास्त आहे.
>>> कशाच्या निमित्ताने - काही
>>> कशाच्या निमित्ताने - काही नवीन पिक्चर आलाय का?
काल रात्री 'वो मूकद्दर का सिकंदर' गाणे बघत होतो. तो काळ आठवला. लिहावेसे वाटले. तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही. नटराजला एकापाठोपाठ एक त्याचे पिक्चर येत असत. बाहेर लागलेली पोस्टर्स बघण्यात खूप जण खूप वेळ घालवत.
मंगलालाही येत असतीलच.
ओह ओके. ते गाणे आणि तो पिक्चर
ओह ओके. ते गाणे आणि तो पिक्चर तर ऑल टाइम फेवरिट आहेच.
मला त्याची दोन गाणी व्हिडिओवर
मला त्याची दोन गाणी व्हिडिओवर बघायला आवडतात =
खैके पान बनारसवाला...
पद घुंगरु बांध मीरा नाची रे.
सिनेमे बघण्याइतका पेशन्स नाही/
या संदर्भात एक गमतीदार कथा
या संदर्भात एक गमतीदार कथा ऐकण्यात आली होती. तिची सत्याsसत्यता पडताळून पाहिलेली नाही पण निश्चितच ऐकण्यासारखी आहे.
अमिताभ बच्चन यांचा जंजीर रिलीज झाला होता त्या काळात एकदा आपल्या कारमधून मेट्रो सिनेमा जवळून चालले होते आणि अचानक रस्त्यावर गर्दी उसळली. अमिताभचा ईगो एकदम सुखावला त्याने ड्रायव्हरला विचारले "मेट्रोला माझा सिनेमा चालू आहे का रे?" तेव्हा ड्रायव्हरने त्याला सांगितले "तुमचा सिनेमा चालू आहे पण आत्ता ही गर्दी मॅटिनी सुटल्यानंतरची आहे "
लगेच अमिताभ ने विचारले "मग मॅटिनीला कुठला सिनेमा चालू आहे?"
तेव्हा ड्रायव्हरने सांगितले "राजेश खन्नाचा आराधना!! "
आणि आराधनाचा हा अकरावा किंवा बारावा रन होता.
अमिताभ म्हणातात की सुपरस्टार म्हणजे काय असतो याची चूणूक मला त्या वेळेला मिळाली !
पूर्ण सहमत +१
पूर्ण सहमत +१
अॅक्टिंग बिक्टिंग ओके. पण ती
अॅक्टिंग बिक्टिंग ओके. पण ती फक्त अॅक्टिंगच. खरा आहे तो कणा नसलेला माणूस. सत्तेसमोर वाकून चाटूगिरी करणारा. टोटली मातीचे पाय..
कलाकारांची कला आणि त्यांचे वैयक्तीक जीवन यात फार तफावत आढळते. आपणही वैयक्तीक आयूष्यात कलाकार तसेच चांगले असावेत अशी अपेक्षा करतो. ही आपली चूक नव्हे काय? उदाहरण द्यायचे झाले तर जया बच्चन एकदम सोज्वळ व साध्या असतील असा समज होता पण काही व्हीडीओ पाहिले आणि वैयक्तीक आयूष्यात एकदम रागीट बाई आहे हे लक्षात येते. रणबीरसिंग वैयक्तीक आयूष्यात एकदम उथळपणे वागतो. चित्रविचित्र कपडे, फार फार माकडचेष्टा करतो. पण पडद्यावर अभिनय चांगला करतो.
अमिताभ विषयी पण एका डॉक्टर कडून ऐकले आहे. हा डॉ. काही काळ अमिताभला ट्रिटमेंट देणार्या पथकात होता. माणसांना, नोकरांना हा महानायक एकदम तुसडेपणाने वागवतो. जसे प्रत्यक्षात किंवा पडद्यावर केबीसीमध्ये हसत खेळत असल्याचे दाखवतो तसा तो अजिबात नाही. अर्थात आपण तो तसा असावा अशी अपेक्षा करतो. काही आलेल्या अनुभवामुळेही ह्या लोकांचे स्वभाव तसे झाले असावेत.
ऐकीव माहितीनुसार काही कलाकार मात्र प्रत्यक्ष जीवनात एकदम साधे रहातात व लोकांशी चांगला व्यवहार करतात.. उदा. जॅकी श्रॉफ, जितेंद्र, रजनीकांत.
एकदा एका विमानतळावर अमिताभ
एकदा एका विमानतळावर अमिताभ बसलेला होता. कोणीतरी पायलट तिथून जात होता. त्याने अमिताभला बघितले व त्याच्यासमोर जाऊन म्हणाला:
"हाय, हाऊ आर यू सर?"
त्यावर 'एक कोणतेतरी मासिक' वाचत असलेल्या अमिताभने एकदा त्या पायलटकडे बघून परत मासिकात डोके खुपसले. याचा त्या पायलटला राग आला व चिडून जाऊन अपमान करायचा म्हणून त्याने अमिताभला विचारले:
मे आय नो युअर गुडनेम?
यावर अधिकच संतापलेला अमिताभ दुसरीकडे जाऊन बसला.
आता सगळेच अश्या लोकांना सतत छळत असले तर हे लोकही असेच वागणार.
मात्र, त्या पायलट च्या हिंमतीलाही दाद द्यावीशी वाटते. नुसते स्मितहास्य करायला हरकत नव्हती. मात्र, कदाचित अमिताभ आधीच प्रचंड वैतागलेला असेलही.
फार पूर्वी कधीतरी वाचलेला किस्सा, खरे खोटे माहीत नाही.
मागे कुठेतरी वाचलेले की अमोल
मागे कुठेतरी वाचलेले की अमोल पालेकर हे खरया आयुष्यात पडद्यावरचे अमिताभ आहेत आणि अमिताभ हे खऱ्या आयुष्यात पडद्यावरचे अमोल पालेकर..
अर्थात या लेव्हलच्या सेलिब्रिटींना सेफ गेम खेळावे लागत असेल तर यात त्यांची काही चुकी नाही असेही वाटते.
मग तो अमिताभ असो की सचिन तेंडुलकर.. आणि एखाद्या धर्माने मुस्लिम असलेल्या शाहरुखबाबत सिच्युएशन किती क्रिटिकल असेल याचा विचारच न केलेला बरे..
बाकी किस्से जे आपण ऐकतो ते काय खरे आणि काय खोटे हे कधीच समजू शकणार नाहीत त्यामुळे त्यावर न बोललेलेच बरे.
लेख आवडला. छान लिहिलेय.
लेख आवडला. छान लिहिलेय.
अमिताभ फेवरीट आहेच. तो ऐन भरात होता तेव्हा मी टिनेजर होते. त्याचा चित्रपट थेटरात पाहुन आल्यानंतर पुढचे आठ पंधरा दिवस त्याचे गारुड उतरायचेच नाही डोक्यावरुन. अगदी मंतरल्यासारखे वाटायचे. काय जादू होती देव जाणे पण होती हे नक्की.
छान लेख... अमिताभ आवडता
छान लेख... अमिताभ आवडता अभिनेता आहेच.
<< काल रात्री 'वो मूकद्दर का सिकंदर' गाणे बघत होतो. >>
---- गाणे तसेच चित्रपट डोळ्यासमोर आला. शोले, जंजिर, कालापत्थर, दिवार, आनंद आवडीचे चित्रपट.
छान छोटेखानी लेख!
छान छोटेखानी लेख!
महानायकावर असे लेख अधुन-मधुन येत रहावेत, प्रतिसादांतले ट्रिव्हिआ वाचयला मजा येते 👍
अगदी 100% सहमत.... शाळेत
अगदी 100% सहमत.... शाळेत असल्यापासून आतापर्यंत त्याची fan आहे.... कुठलीही भुमिका...मग ती गंभीर असो, विनोदी असो, तरूणाची असो, म्हाताऱ्याची असो, ज्या ताकदीने वठवतो ते शब्दातीत आहे. आणि भाषेचं सौंदर्य, आदब काय राखतो... आहाहा!
बच्चनसाहेबांचा स्वॅग खर्या
बच्चनसाहेबांचा स्वॅग खर्या अर्थाने शॉटगन समोर (काला पत्थर, दोस्ताना मधे) ठळकपणे जाणवला. एस्पेशली, काला पत्थर मधल्या सिगरेट सुप्रमसी आणि चाय सुप्रमसी या सिन्समधे...
बच्चन ईज बेस्ट.
बच्चन ईज बेस्ट.
माझेहि आवडते कलाकार.. खर्या
माझेहि आवडते कलाकार.. खर्या आयुष्यात काहि का असेनात ती त्यांची पर्सनल स्पेस आहे.. पडद्यावर किवा इतर ठिकाणी त्यांचा आदबच पाहिला आहे.
अभिनंदन!
अभिनंदन!
आवडणारा महानायक! आवाज, रुबाब,
आवडणारा महानायक! आवाज, रुबाब, डोळ्यांतून अभिनय, शरीरातून अभिनय सांडतो. मुर्तीमंत उदाहरण अभिनयाचे.
पर्सनल लाईफ मधे तसे नरोत्तम नसावेत ह्याला अनुमोदन. टॅक्स वाचवण्यासाठीची केविलवाणी धडपड, घेतलेल्या कुठल्याही तीनपाट अॅड्स, जया ला पुर्वी काय दुर्लक्ष & त्रास भोगावा लागला असेल रेखा प्रेकरणामुळे.. वगैरे. पण हे लोक इतके निर्लज्ज असतात की त्याचेही भांडवल बनवतात (सिलसिला)
आणि हे त्यात काम करतात
आणि हे त्यात काम करतात