बँकींग

छावणी - ९

Submitted by स्पार्टाकस on 29 November, 2014 - 01:35

जथा पुढे निघाला होता! मागे राहीलेल्यांना कायमचे मागे ठेवून.

पूर्वीचा उत्साह आता नावालाही शिल्लक नव्हता. वास्तविक मुरीदके इथल्या छावणीत त्यांना दोन दिवस पूर्ण विश्रांती मिळाली होती, परंतु छावणीवर झालेल्या हल्ल्यामुळे जो मानसिक धक्का बसला होता आणि जे आप्तेष्ट गमवावे लागले होते, त्याची कसर कोणत्याही उपायाने भरुन निघणारी नव्हती. आला तो दिवस आपला म्हणत हिंदुस्तानच्या सीमेकडे चालत राहायचं एवढं एकमेव लक्ष्यं प्रत्येकासमोर उरलं होतं. एखाद्या गोळीवर, एखाद्या तलवारीवर आपलं नाव असलं तर मुकाट बळी पडावं, नाहीतर उरलेले भोग भोगत पुढे जात राहवं इतकंच हातात होतं.

विषय: 

तिसरी मुंबई : good for real estate ?

Submitted by काउ on 24 November, 2014 - 17:32

सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.

सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.

पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..

sea link शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.

सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.?

बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग

नवे अएर्पोर्ट

सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.

फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

शब्दखुणा: 

छावणी - ४

Submitted by स्पार्टाकस on 23 November, 2014 - 21:53

ग्रँड ट्रंक रोड हा उत्तर हिंदुस्तानातील वाहतुकीचा सर्वात जुना मार्ग. प्राचीन काळी सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या काळात या मार्गाच्या काही भागाचं बांधकाम झालं होतं. तेव्हा हा मार्ग उत्तरपथ म्हणून ओळखला जात असे. मौर्यांची राजधानी असलेल्या पाटलीपुत्र (पटना) पासून ते वायव्य सरहद्द प्रांतातील तक्षशीला शहरापर्यंत हा मार्ग होता. १६ व्या शतकात शेर शहा सुरीने या प्राचीन मार्गाचं पुन्हा बांधकाम केलं. मुघलांच्या काळात या मार्गाचा वायव्येला खैबर खिंडीतून काबूलपर्यंत आणि पूर्वेला चितगावपर्यंत विस्तार झाला. ब्रिटीश सरकारने या मार्गाचा विस्तार आणि पुनर्बांधणी केली.

विषय: 

बँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 02:15

नमस्कार!

बँक व तत्सम कचेर्‍या (एल आय सी, शासकीय कर भरणा केंद्रे) येथील अनुभव, माहिती, त्याबाबतची मतमतांतरे, सुचवण्या ह्या धाग्यावर एकत्रीत करूयात.

बॅंकीग संगणक प्रणाली: काही प्रश्न, अनुत्तरीत....

Submitted by चौथा कोनाडा on 20 March, 2014 - 05:18

मागील महिन्यात बॅंकीग क्षेत्रात खळबळ माजवणारी घटनेने वृत्तपत्रांचे मथळे व्यापले. दुप्पट तोटा अन खुप प्रमाणात वाढलेली अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) या मुळे भारतातील एक महत्वाची प्रमुख बॅंक, युनाइटेड बॅंक ऑफ इंडिया अचानकपणे चर्चापटलावर आली.

याची चर्चा चालू असतानाच, बॅंकेच्या चेयरपर्सन/एमडी अर्चना भार्गव स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. पदाची कारकीर्द दोन वर्षांनी पूर्ण होण्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. जाता-जाता त्यांनी वाढीव एनपीएचे खापर “फिनॅकल” या बॅंकीग संगणक प्रणालीवर फोडले (संदर्भ: दै.लोकसत्ता, अर्थसत्ता, २२ फेब्रु २०१४)

करांची कटकट कमी होईल का?

Submitted by विजय देशमुख on 6 January, 2014 - 22:23

कर देणे हे जवळपास प्रत्येकालाच कटकट वाटत असावी. त्यात फक्त कर-कन्सल्टंटच फक्त अपवाद असावा. Happy
माझ्या मते, त्यात करांच्या कटकटी जास्त आणि फॉर्मस, वेगवेगळे कलमं यामुळे जास्तच त्रासदायक वाटतो. ज्याला कर प्रणाली समजते, कदाचित त्यांना ते सोपं वाटत असावं.
नुकतच रामदेव बाबांनी कर प्रणाली संपवा (किंवा सोपी करा) असं म्हटलं. त्यावरुन काही प्रश्न डोक्यात आले. मला अर्थकारणातलं काहीच कळत नाही, त्यामुळे अधिक सोपं करुन लिहिलं तर उत्तमच.
१. एकाच प्रकारचा किंवा कमीतकमी प्रकारचे कर असावे, हे योग्य आहे का?
२. वॅट चा उगम हाच होता ना? त्यातही एका वस्तूवर एक तर दुसर्‍यावर दुसरा % आहे ना?

बँकेत लॉकर उघडण्याबाबत...

Submitted by दिपु. on 15 July, 2013 - 06:32

नमस्कार ..
दागिने सुरक्षेचा उपाय म्हणून मला एक लॉकर ओपन करायचे आहे. त्यासंबंधी काय प्रोसेस असते, रेट काय असतो, डिपॉझीट काय असते, कुठली बँक विश्वासपात्र आहे, या संबंधी माहिती हवी आहे. आपल्या पैकी बरयाच जणांचे लॉकर असतील म्हणून ईथे विचारत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

बँक ऑफ महाराष्ट्र - १७ जून- संप.

Submitted by विप्रा on 16 June, 2013 - 01:59

उद्या १७ जून रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचारी एक दिवसाचा संप करीत आहेत.
माबोकरांना विनंती , सोबत दिलेली लिंक जरुर वाचावी .
प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येईल.

http://www.thehindu.com/news/national/to-fix-whistleblower-bank-moves-fr...

विषय: 

होम लोन प्रोटेक्शन प्लान की टर्म प्लान?

Submitted by यक्ष on 15 May, 2013 - 03:20

होम लोन घेतांन्ना कुठला होम लोन प्रोटेक्शन प्लान योग्य?
की सरळ टर्म प्लान घ्यावा?

विषय: 

सादरकर्ते चिदंबरम...!

Submitted by शिवम् on 12 March, 2013 - 14:17

अर्थाचा संकल्प नवा
मंत्र्याचे कर्तव्य परम्,
जुन्या तांदळाची नवीन 'इडली' ,
सादरकर्ते चिदंबरम्...!

गोंधळ होता सभागृही,
सभापती होतात नरम,
करांसाठीचे 'उथप्पे' नवे,
सादरकर्ते चिदंबरम...!

अब्जावधींची तुट भराया,
लादले नवे 'कर'म,
कोटींचा हा 'डोसा',
सादरकर्ते चिदंबरम..!

सामान्यांना वार्यावर सोडा,
विकासदर यांचा धरम,
गरम सांबरी 'मेदूवडा',
सादरकर्ते चिदंबरम...!

मनमोहन-मॉटेक संगे,
थाटले 'उडपी' हॉटेलम्,
कोटींच्या कोटी उड्डाणे,
गाठणार चिदंबरम...!

-शिवम पिंपळे,औरंगाबाद.

Pages

Subscribe to RSS - बँकींग