भारतीय क्रेडिट/डेबिट कार्ड वापरुन अमेरिकन डॉलरमधे पेमेंट (उदा. जी आर ई साठी) करता येते का?

Submitted by mansmi18 on 29 November, 2014 - 11:34

नमस्कार,

भारतीय क्रेडिट/डेबिट कार्ड वापरुन अमेरिकन डॉलरचे पेमेंट करता येते का?

नुकताच माझ्या भाच्याने जी आर ई साठी अर्ज करताना पेमेंट साठी भारतीय क्रेडिट कार्ड वापरले तर ते चालले नाही.
(जी आर ई साठी फक्त US$ चेच पेमेंट लागते).
काही प्रश्नः
१. बाय डीफॉल्ट भारतीय कार्ड फक्त भारतातच आणि रुपी साठीच चालते असे आहे का?
२. ते अमेरिकन डॉलर (किंवा इतर फॉरीन करन्सी) साठी वापरायचे असेल तर कस्टमर सर्विस ला कॉल करुन काही सेट अप करुन घ्यावे लागते का?
३. यात FERA चे काही असते का? (पेमेंट $१९५ चे होते म्हणजे तसे मामुली त्यामुळे त्याचे काही नसावे?)

कृपया आपले अनुभव लिहाल का?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रेडीट कार्ड का चालले नाही Uhoh mastercard/visa असेल तर बहुतेक ठिकाणी चालले पाहिजे. फक्त वेगळ्या चलनात व्यवहार करताना transaction fee द्यावी लागते. आता GRE वाल्यांनी नियम बदलले असतील तर कल्पना नाही.

डेबिट कार्ड नक्कीच चालायला हवे. १ डिसेंबरनंतर वेगळे चिप डेबिटकार्ड लागणार आहे इंटरनॅशनल ट्रांजॅक्शनसाठी. बहुतेक हे 'बॉर्न इन कस्प' टाईप असावे.

सहसा भारतातून (रुपयामधे वापरण्याचे) क्रेडिट कार्ड असेल तर ते कुठल्याही चलनात (फक्त अमेरिकन डॉलर्सच नाही) खरेदी करण्यासाठी/पैसे भरण्यासाठी वापरता येते. तुमच्या व्यवहाराचे सममूल्य रुपयात (त्या दिवशीच्या दरानुसार) तुमच्या खात्यातून वळते होते असा सर्वसाधारण अनुभव आहे.

परंतू प्रत्येक बँकेचे आणि त्यातही तुमचे कुठल्या प्रकारचे क्रेडिट कार्ड खाते आहे यानुसार नियम बदलतात.

१) काही बँका परकीय चलनावर त्या दिवशीच्या दराशिवाय अधिक किंमत आकारतात. (Foreign Transaction fee) हे फक्त भारतीय बँकाच नाही तर परदेशी बँकाही रुपयाच्या खरेदीवर (परदेशी नागरिकांनी भारतात केलेल्या रुपयातल्या खरेदीवर) आकारतात. सहसा तुमचे एका विशिष्ट प्रकारचे खाते असेल तर ही फी माफ असते.

२) काही बँका क्रेडीट कार्डावर परकी चलनात व्यवहार करू देत नाहीत पण डेबीट कार्डावर करू देतात. काही डेबीट कार्डावर करू देत नाहीत पण क्रेडीट कार्डावर करू देतात.

३) काही क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड हे फक्त भारतीय चलनात व्यवहार करण्यापुरते मर्यादीत असतात.

४) काही क्रेडीट/डेबीट कार्डावर परकी चलनात व्यवहार करता येतात पण दर दिवशी जास्तीत जास्त अमूकच किंमतीचा व्यवहार करता येईल अशी मर्यादा असते.

५) काही क्रेडीट्/डेबीट कार्डावर परकी चलनात व्यवहार करता येतात पण कुठल्या प्रकारच्या व्यवहारासाठी ते वापरता येतील/काय विकत घेता येईल यावर मर्यादा असतात.

सहसा तुमचे बँकेत जितके जास्त पैसे असतील (मुदत ठेवी किंवा इतर प्रकारचे) तितके हे नियम शिथील होत जातात.

हा प्रश्न सर्वसाधारण प्रश्न नसून "माझ्याकडे अमुक बँकेचे अमुक प्रकारचे क्रेडीट कार्ड आहे ते जी आर ई साठी चालेल का" असा जास्त योग्य होईल. कारण काही बँकांच्या काही प्रकारच्या क्रेडीट कार्ड साठी हे चालेल पण दुसर्‍या बँकेच्या (किंवा त्याच बँकेच्या दुसर्‍या प्रकारच्या) क्रेडीट कार्ड साठी हे चालणार नाही.

इंटरनॅशनल क्रेडीट/डेबिट कार्ड असेल तर सहसा ते चालले पाहिजे. तुम्ही चालले नाही म्हणताहात तर न चालायचे कारणही दिले असेल वेबसाइटने. मी भारतीय क्रेडिट कार्ड वापरून युरोपातलं हॉटेल बूकिंग केलंय. माझ्या भाच्यानं सप्टेंबर २०१३ मधे भारतीय क्रेडिट कार्ड वापरून जीआरईची फी भरली होती.

पण काही वेळा काही वेबसाइटस ठराविक कार्डस नाकारतात (हे मी युरोपमधे बघितले आहे. स्पॅनिश रेल्वेची वेबसाइट ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन कार्डस घेत नाही). तसे तर काही नाही ना हे त्यांच्याच कस्टमर कॉल सेंटरला विचारून बघा.

तुमच्या कार्डवर इंटरनॅशनल ट्रॅन्झॅक्शन्स अलाऊड आहेत का ते पाहा. नसतील तर फोनबँकिंग ला कॉल करून चालू करता येतं. नेटबँकींग ला जर तुमचं क्रेडिट कार्ड अ‍ॅड केलेलं असेल तर नेट्बँकिंगमधूनही क्रेडिट कार्ड चे इंटरनॅशनल ट्रॅन्झॅक्शन्स चालू करता येतील. आजकाल सगळ्याच कार्डस वर हे सुरू नसतं, त्यामुळे एकदा चेक करा. किती लिमीट इंटरनॅशनल ट्रॅन्झॅक्शन्स करता हवी/लागेल तीही सेट करता येते.

बरेच महिन्यांपूर्वी हा अनुभव आयट्यून्स मध्ये पर्चेसेस करतांना आला होता (त्यावेळेला आयट्यून्स चं भारतीय दुकान नव्हतं).

दुसरा एक पर्याय म्हणजे (जर तुम्हाला तुमची कार्ड एन्फॉर्मेशन द्यायची नसेल तर...); व्हर्च्युअल कार्ड क्रिएट करता येते. नेट्बँकिंगच्या थ्रु हव्या तेव्हढ्या रकमेच कार्ड व्हर्चुअली तयार होतं. त्याला प्रॉपर कार्ड नंबर, सिव्हीव्ही कोड सगळं असतं. २४/४८ तासांकरता हे व्हर्चुअल कार्ड व्हॅलिड असतं. न वापरेली रक्कम पुन्हा खात्यात जमा होते. ही सर्वीस फुकट असते (अ‍ॅट्लीस्ट एचडीएफसी बँक तरी देते).

हा पर्यायही वापरून झालेला आहे एकदा. यात कटकट ते कार्ड बनवायचीच काय ती अस्ते...

इंटरनॅशनल क्रेडीट/डेबिट कार्ड असेल तर सहसा ते चालले पाहिजे >>> होय, पण तरीही शक्यतो बँक्स आजकाल इंटरनॅशनल ट्रॅन्झॅक्शन्स डिसेबल करतात, तुमच्या कार्ड ट्रॅन्झॅक्शन्स हिस्टरीवरून. सो, एकदा व्हेरीफाय करा. Happy

आजकाल क्रेडिट वा डेबिट कार्डाला कॉन्टेक्तलेस म्हणून एक नवीनच फेसिलिटी आपोआप आली आहे

म्हणजे कार्ड नुसते स्वाईप केले तरी आपोआप व्यवहार होतो

ना पिन , ना मोबाईल कोड , मग हे डेंजरस नाही का ?

हे नेमके कसे कार्य करते ?

असला भम्पक ऑप्शन मुळात निर्माण का केला ? पैसे देण्या घेण्याची इतकी कोणती घाई असते ?
त्याला वाय फाय कार्ड म्हणतात म्हणे

@ब्लॅककॅटः स्वाइप पुर्वी करायला लागत असे. मग कार्ड मशिनमध्ये इन्सर्ट करणे गरजेचे केले.

तुम्ही म्हणत आहात ते कॉन्टॅक्टलेस फीचर म्हणजे जिथे तुम्ही कार्ड मशिनवर हलके टॅप करायला लागते ते. https://en.wikipedia.org/wiki/Contactless_payment
हे नीअर फिल्ड कम्युनिकेशन किंवा आरएफाअयडी तत्वावर चालते. पेमेंट होण्यासाठी तुम्हाला कार्ड मशिनच्या अगदी जवळ जाउन टॅप करावे लागते. तुमच्या खिशात कार्ड असताना वगैरे आपोआप पेमेंट होऊ शकणार नाही. अमेरिकेत - कॅनडात अश्या प्रकारच्या पेमेंट करताना लिमिट असते. उदा. १००डॉलरपेक्षा अधिकची खरेदी करत असाल तर या पद्धतीने पेमेंट करता येत नाही किंवा पिन टाकावा लागतो. कार्डाऐवजी तुम्ही तुमचा मोबाइल फोनदेखील वापरू शकता. अ‍ॅपल पे, गूगल पे ही अ‍ॅप्लिकेशन एनएफसी तत्वावर पेमेंट करताना वापरू शकता, त्यासाठी तुमच्या फोनम्ध्ये पण ती सुविधा हवी.

पण आपले कार्ड कुणी घेऊन गेला तर किंवा चोरीला गेले तर , आणि त्याने चार दोन ठिकाणी वापरले तर

मी फक्त दोनदाच वापरले होते , सर्वात पहिले एक नवीन कार्ड मिळाले होते , ते एकदा सिनेमाला 300 रुला वापरले होते , तेंव्हा आश्चर्य वाटले होते

तेंव्हापासून ते कार्ड मी स्वाईप ला वापरायचे सोडून दिले
तर आता दुसरे एक कार्ड नवीन बदलून आले , तेही एकदा तसेच पर्वा 300 रु ला झाले

भारतात 2000 रु चे लिमिट आहे म्हणे

आजकाल क्रेडिट वा डेबिट कार्डाला कॉन्टेक्तलेस म्हणून एक नवीनच फेसिलिटी आपोआप आली आहे
>>
आपोआप नाही आली. टार्गेट अचिव्ह करण्याच्या निमित्ताने जबदरस्ती गळ्यात मारली आहे. मी पण नवीन कार्ड घेताना स्पष्ट सांगितले होते कॉन्टॅक्टलेस नको. तरी जबरदस्ती तेच दिले.

म्हणजे कार्ड नुसते स्वाईप केले तरी आपोआप व्यवहार होतो
>>
स्वाईप नाही, नुसते मशिनला स्पर्श करायचा.

ना पिन , ना मोबाईल कोड , मग हे डेंजरस नाही का ?
>>
२००० किंवा त्यापेक्षा कमी रकमेसाठी पिन नाही. नुसते टच करायचे.

हे नेमके कसे कार्य करते ?
>>
NFC. https://en.wikipedia.org/wiki/Near-field_communication अनेक फोन मधेही हे असते आजकाल.

काही खास बनवलेले पाकीटं मिळतात. त्यांना अशा लहरी ब्लॊक करण्याचे आवरण बसवलेले असते.
किंवा साध्या पाकिटात, स्वयंपाकघरात वापरली जाणारी अ‍ॅल्युमिनियमची फॉईल कार्डाच्या आकाराची कापुन त्या कार्डाला गुंडाळुन ठेवली तरी चालते.

मोठे हॅकर काही करणार नाहीत. कारण एकावेळेला किती रक्कम खर्च करु शकतो ते लिमिट खुप कमी आहे.

गर्दीच्या ठिकाणी वापरणे टाळतो. एकाचे दुस-याल असे झाले तर काय? व ब्लॅककॅट यांनी उपस्थित केलेली शंकाही रास्त आहे.