बँक व इतर संस्थांमधील अनुभव व माहिती

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 02:15

नमस्कार!

बँक व तत्सम कचेर्‍या (एल आय सी, शासकीय कर भरणा केंद्रे) येथील अनुभव, माहिती, त्याबाबतची मतमतांतरे, सुचवण्या ह्या धाग्यावर एकत्रीत करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला 'त्वरीत व मैत्रीपूर्ण सेवा' ह्या निकषावर आय सी आय सी आय ह्या बँकेचा चांगला अनुभव आला. तुलतेन बँक ऑफ महाराष्ट्रचा अनुभव थोडा थिटा वाटला.

काही बँकांमध्ये 'कस्टमर ओरिएन्टेशन' चे वर्ग घ्यावेत अशी अवस्थाही असते. बँकिंग हा एक व्यवसाय आहे हे काही बँकांच्या कर्मचार्‍यांच्या अजून नीटसे ध्यानात आलेले नसावे असेही वाटते.

बेफिकीर, मला वाटतं तुम्ही "उत्तररंग" मधल्या धाग्यांच्या हेडरमध्ये ज्येनांच्या संदर्भातील धागे हे तुम्हाला योग्य वाटेल त्या शब्दांत अधोरेखित करा. हे धागे सार्वजनिक असल्याने कुठल्या ग्रूपमध्ये ते आहेत ह्याकडे दुर्लक्ष होऊन कुणी हे जनरल धागे आहेत असं समजू शकतं आणि धाग्यांचा मूळ हेतू बाजूला राहील.

माझा एक प्रश्न -

आपण पैसे सुट्टे करून घेण्यासाठी (उदा. हजाराच्या नोटा १०० च्या नोटांत मोडून घेण्यासाठी) कोणत्याही बँकेत / कोणत्याही शाखेत जाऊ शकतो का? की त्या बेंकेत, त्या शाखेत आपले खाते असणे गरजेचे असते?
आयसीआयसीआय मध्ये पैसे सुट्टे करून घेण्याचा अनुभव नेहमीच चांगला आला आहे. (तेथे 'तुमचे आमच्या बँकेत खाते आहे का,' इतकेही विचारत नाहीत.) पण एस्. बी. आय. मध्ये 'तुमचे आमच्या बँकेत खाते आहे का?' आणि 'हो' म्हटल्यावर, 'आमच्या ब्रँचमध्ये खाते आहे का?' असे अतिशय दरडावणीच्या सुरात विचारले जाते. आणि 'नाही' असे सांगितले तर. 'ठीक आहे... आता आलाच आहात तर देतोय तुम्हाला सुट्टे पैसे...' तेही 'आता आमुक अमुक नोटा नाहीत, हेच आहेत, हेच घ्या.' असा जणू त्यांच्या विहिरीवर चोरून पाणी भरायला गेलो आहोत असे फिलींग देणारा अविर्भाव असतो.

>>काही बँकांमध्ये 'कस्टमर ओरिएन्टेशन' चे वर्ग घ्यावेत अशी अवस्थाही असते. बँकिंग हा एक व्यवसाय आहे हे काही बँकांच्या कर्मचार्‍यांच्या अजून नीटसे ध्यानात आलेले नसावे असेही वाटते.<<
ये हुवी ना बात!

लेखन इतरही करणारच. अडचण काहीच नाही. मी देखिल ज्येना वयापासून खूप लांब असूनही त्या धाग्यांवर लिहितेच आहे. पण बँका किंवा इतर पैश्यांचे, गुंतवणुकीचे व्यवहार ह्यांबद्दल चर्चा ज्येनांना केंद्रस्थानी ठेवून असावी असा ह्या धाग्यांचा हेतू आहे असं मला वाटलं, म्हणून मी वरची पोस्ट लिहिली. अर्थात काही व्यवहार ज्येना आणि अजून जे ज्येना नाहीत अश्यांसाठी कॉमन असणारच. उदा. वरची गजाची पोस्ट. ह्याचं उत्तर मिळालं तर ही ज्येना आणि नॉनज्येनांना उपयुक्त आहे.

हो, माझंही तेच अंडरस्टँडिंग होतं की जरी ज्येनांच्या ग्रूपमध्ये धागा असला तरी सर्वांना लाभदायक असावा.

पेन्शन अकाऊंटला
१. एटीएम् कार्ड मिळते का? (मबॅ मधे मिळत नाही),
२. इंटरनेट बँकिंग असते का? (मबॅ मधे नाही)

इतर बँकांबद्दल माहिती मिळेल का?

<< तुलतेन बँक ऑफ महाराष्ट्रचा अनुभव थोडा थिटा वाटला.<<
अगदी अगदी. आमच्या स्टाफच्या मते बँ.ऑ.म. वाले अजिबात कोऑपरेटीव्ह नाहीत.
मला एच डी एफ सी, गणेश सहकारी बँक इ. बँकेत खुप चांगला अनुभव आला. पण ते एच डी एफ सी वाले समोर आलेल्याला बकरा समजुन बँकेचे प्रॉडक्ट्स गळ्यात मारु पहातात ते आवडले नाही.

बँ.ऑ.म म्हणजेच मबॅ मधे नियम कडक आहेत आणि इतरत्र नाही असे असते का? की सर्ब बँकाना (रा. कृत) एकच नियम असतात?

@ पुण्याची विनिता
पेन्शन अकाउंट हे एस बी प्रकारचे च असते. महाबॅ़केत दोन्ही सुविधा आहेत. माझे स्वत:चे आहे तिथे पेन्शन अकाउंट. मी सुरवातीपासून दोन्ही सुविधा वापरतो.

प्रतिथयश नॅशनलाईज्ड बँकेत एक आजोबा काउंटरवर विचारत होते..अमुक अमुक कामासाठीचा काउंटर "माडीवर" आहे ना. (माडी = वरचा मजला.) ...त्यांना मदत न करताच फिदिफिदी हसणारे काऊंटरवरचे महिला मंडळ पाहून वाईट वाटले.

<<महाराष्ट्र ब्यांकेत शोधून - शोधून बिनडोक लोकांची भरती करतात की काय कुणास ठाऊक<< अगदी अग्दी.. एकेक नग भरलेले आहेत तिथे.

पेन्शन अकाऊंटला
१. एटीएम् कार्ड मिळते का? (मबॅ मधे मिळत नाही),
२. इंटरनेट बँकिंग असते का? (मबॅ मधे नाही)

<<< SBI बँकेसाठी दोन्ही प्रश्नांसाठी 'हो' असे उत्तर आहे.

बँक आणि त्यांचे कर्मचारी 'व्यक्ती तितक्या प्रकृति' गटांत मोडतात. अमूक एक चांगली आणि वाईट असं काही नसतं, बरेचसे शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी ह्यांच्या माईंड्सेट वर अवलंबून आहे.

पेन्शन अकाउंट हे एस बी प्रकारचे च असते. महाबॅ़केत दोन्ही सुविधा आहेत. माझे स्वत:चे आहे तिथे पेन्शन अकाउंट. मी सुरवातीपासून दोन्ही सुविधा वापरतो.>> बाजीराव रोड, पुणे (चितळे मुख्य दुकाना समोर) आम्हाला (आईला) चक्क दोन्हीसाठी नाही सांगण्यात आले आहे, काय करावे?

@गजानन >>SBI बँकेसाठी दोन्ही प्रश्नांसाठी 'हो' असे उत्तर आहे. धन्स हा पर्याय चांगला वाटतोय, पण सरकारी परमिशन आणावी लागेल बँक बदलायला!

शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी ह्यांच्या माईंड्सेट वर अवलंबून आहे.
<<
एका महान शाखा व्यवस्थापकांनी, गाडीचे लोन सँक्शन केल्यानंतर गाडी "इन्स्पेक्शन" साठी आणा म्हटले. त्यानंतर पेढे घेऊन गेलो नवी गाडी घेऊन.
साहेब म्हटले एक चक्कर द्या आम्हाला.
म्हटलं चला.
हीरो जाऊन बसले स्टिअरिंगवर.
मग स्पष्ट शब्दांत सांगावं लागलं, की भाऊ, खाली उतरा. कर्ज ब्यांकेने दिलेलं आहे. अन पैसे मी फेडणार आहे. तुम्हाला आजपर्यंत एकदाही ४ चाकी चालवताना पाहिलं नाहिये. ही नवीकोरी गाडी तुमच्यासाठी नाही.

ज्येना. च्या भल्यासाठी 'नो एटीएम कार्डची सोय' आहे. निरक्षर व्यक्तिला एटीएम कार्ड मिळत नाही. खाते उघडताना 'नो एटीएम कार्ड' असे अंडरटेकिन्ग दिले असेल तरी एटीएम कार्ड मिळत नाही.

इब्लिस इतर धाग्यावर बँकवाले म्हणतायत की ग्राहकांची देहबोली चांगली नसली की असे होते.. तुमची नव्हती वाटते Lol

राजसी ही शक्यता नाही.
हे मबॅ वाले तर वर्षानुवर्षै खाते असणा-या ग्राहकाला, पेन्शन अकाऊंट उघडताक्षणी निरक्षरच समजत असले तर माहिती नाही.
(आम्ही तर असा कुठलाही ऑप्शन दिला नव्हता, कारण या सुविधांचे महत्व आम्हाला त्या अस्तित्वात आल्या तेव्हापासून माहिती आहे)

तुम्ही कारण विचारले आहे का तुमच्या बँकेला एटीएम कार्ड न मिळण्याचे, स्पष्ट शब्दांत ? शाखा व्यवस्थापकपर्यंत जाऊन शहानिशा करायचा कारणाचा. त्यांची पॉलिसी नसेल पेन्शन खात्याला एटीएम कार्ड देण्याची तर तुम्हाला मिळणार नाही.

एक काम करु शकता! माझ्या साबांच्या पेन्शन अकाउंटसाठी आम्ही हे केलं आहे. बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रुक्शन्स देऊन ठेवल्या आहेत की त्या अकाउंटमधले दर महिन्याला ठराविक पैसे दुसर्‍या जॉइंट एसबी अकाउंटला जमा करावेत. त्या जॉइंट एसबी अकाउंटचे ATM कार्ड घेऊन ठेवावे. म्हणजे पेन्शन अकाउंटमध्ये दर महिन्याला थोडीच रक्कम अडकली जाते आणि पैसे काढायचे असल्यास सोपे जाते.

बँकेत अधून मधून पेन्शन्/डीए वाढला आहे का ह्याची चौकशी करावी. साबांच्या बाबतीत पेन्शन वाढलेले असूनही त्यांना जुनंच पेन्शन कित्येक दिवस मिळत होतं. एकदा शंका आल्यावर बँकेच्या अधिकार्‍यांकडे आम्ही मुलासुनेने पाठपुरावा केल्यावर त्यांनी सरकारी खात्याकडे विचारणा केली. मग त्यांना वाढीव पेन्शन मिळू लागले. ते मिळू लागेपर्यंत साबांना टेन्शन आले होते.

राजसी अनेकवेळा विचारले आहे, ते म्हणतात पेन्शनरना एटीएम व नेट बँकिंग नाहीच आहे कुठल्याही बँकेत नसते. अशक्य उत्तरे देतात.

अके चांगली उपाययोजना आहे, धन्स आईशी बोलते.

<< बरेचसे शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारी ह्यांच्या माईंड्सेट वर अवलंबून आहे. >> हें जितकं खरं आहे त्यापेक्षांही ह्याची दुसरी बाजू अधिक महत्वाची असावी; अनेक शासकीय, खाजगी कंपन्याच्या कार्यालयाना व कारखान्याना मला माझ्या कामामुळे भेट द्यावी लागत असे. माझ्या असं लक्षात आलं कीं प्रत्येक शासकीय विभागाची [ 'खात्याची', म्हणूं ,हवं तर], खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांची, कारखान्यांची हळूहळू पण निश्चितपणे एक पारंपारिक कार्यसंस्कृति तयार होत असते. [ तुम्ही कोणत्याही महसूल खात्याच्या कार्यालयात गेलात - अगदीं तलाठ्याच्या कचेरीपासून ते जिल्हाधिकार्‍याच्या कार्यालयात - तर तुम्हाला याची प्रचिती येईल. तसंच एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांत गेलात तरीही त्या बँकेच्या एकंदर कार्यसंस्कृतिचं प्रत्यंतर येतंच]. त्यामुळे, अशा शासकीय विभागात, कार्यालयात, बँकात इ. काम करणार्‍या कर्मचारी/ अधिकारी यांचा 'माईंडसेट' घडवण्यात या पारंपारिक कार्यसंस्कृतिचाच सिंहाचा वाटा असतो. एखाद्या शाखा व्यवस्थापकामुळे सबंध कार्यालयाचा 'माईंडसेट ' बदलल्याचीं उदाहरणंही मीं पहिली आहेत पण अगदींच अपवादात्मक व तात्पुरता प्रभाव असलेली. [ उदा., श्री. भाटिया [आयएएस] या जिल्हाधिकार्‍याने जिल्हा कार्यालयाचं आमूलाग्र, अंतरबाह्य परिवर्तन केलं व 'भाटिया पॅटर्न' म्हणून त्याचं खूप कौतुकही झालं; पण तो बदल त्याच्या जिल्ह्यापुरता व तात्पुरताच राहिला !]

काही बँकांमध्ये 'कस्टमर ओरिएन्टेशन' चे वर्ग घ्यावेत अशी अवस्थाही असते. बँकिंग हा एक व्यवसाय आहे हे काही बँकांच्या कर्मचार्‍यांच्या अजून नीटसे ध्यानात आलेले नसावे असेही वाटते.>> अगदी पटले.

या बाबतीतला केनरा बँकेचा अलिकडेच आलेला अनुभव सांगते.

माझ्या सा.बा.चा पेन्शन अकाउंट आहे तिथे. पहिल्या आठवड्यात सा.बा. माझ्या मुलासोबत (वय वर्षे ९) बँकेत गेल्या असताना, पहिल्या काउन्टर्वरील व्यक्तीने " सिस्टिम बंद आहे, उद्या या" असे अंगावर खेकसत स्वागत केले. परत जाता जाता मुलगा आजीला बोलला कि हे काका आपल्याला "छुट्टा नही है आगे जाओ" असेच सांगत आहेत असे वाटले.

<< काही बँकांमध्ये 'कस्टमर ओरिएन्टेशन' चे वर्ग घ्यावेत अशी अवस्थाही असते.>> खरंच बँकानी आतां हे गंभीरपणे मनावर घ्यायलाच हवं. या महिन्याच्या सुरवातीला रविवार ते बुधवार बँका बंद असणार होत्या. म्हणून शनिवारीं मी पैसे काढायला बँकेत गेलों. खालींच रखवालदार सगळ्यांच्या अंगावर अक्षरशः खेंकसत होता, " पैसा निकालना है तो वापस जाओ; दूसरा कुछ काम होगा तोही उपर जानेका!". खूप आरडाओरड झाली तेंव्हा बँकेचा एक कर्मचारी खालीं आला व निर्विकारपणे म्हणाला, " स्टाफ कमी आहे म्हणून कॅश आणलेली नाही. हवं तर एटीएममधून पैसे काढा ". दिलगिरी नाही, 'कॅश आणण्याचे प्रयत्न करतोय पण यशस्वी होतील असं वाटत नाही', असं सांत्वनपर बोलणं नाही, कसलीही अधिकृत, लिखीत सूचना बाहेर लावलेली नाही ! कुणा अधिकार्‍याला खाली येवून ग्राहकाना समजावून सांगण्याचं सौजन्यही नाही !! इतकी बेफिकीरी, ग्राहकाना असं गृहीत धरणं व तेंही राष्ट्रीकृत बँकेत !!! Sad

puresa uddhatpana angaat nasel ani samor chya wyakti la ekdum tuchha samanaje jamat nasel tar nationalised bank madhe nokari milat nahi...

Devnagari type hot nahiy Windows IE madhe.... Sad

Pages